सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

के. एल. राहुल आणि राशिद खान वर एक वर्षाची बंदी ?

IPL २०२२ साठी खेळाडूंचा मुख्य लिलाव येत्या जानेवारी मध्ये होणार आहे. मुख्य लिलाव होण्याअगोदर पूर्वीच्या आठ संघाला त्यांचे चार खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी BCCI कडून मिळाली आहे. सर्व संघाला त्यांच्या आवडीचे खेळाडू कायम ठेवण्यासाठी ३० नोव्हेंबरला एक छोटा लिलाव होत आहे. ह्या लिलावात आपापल्या टीम मधून चार खेळाडू ते त्यांच्या साठी कायम ठेवतील. खेळाडू कायम ठेवण्यासाठी होणाऱ्या लिलावाच्या अगोदरच के. एल. राहुल आणि राशिद खान वादात सापडले आहेत. त्यांच्यावर एक वर्षाची बंदी आणली जाऊ शकते.

के. एल. राहुल आणि राशिद खान यांचा IPL इतिहास

के. एल. राहुल आणि राशिद खान हे दोघे पण IPL मधील स्टार खेळाडू आहेत. के. एल राहुल पूर्वी बँगलोर संघाकडून खेळायचा, बँगलोरसाठी राहुल ओपनिंग करायचा. २०१८ च्या लिलावामध्ये बँगलोरने राहुलला सोडले आणि राहुल २०१८ पासून पंजाब संघाकडून खेळत आहे. २०२० च्या IPL ला आर. अश्विनने पंजाबचे कर्णधार पद सोडल्यावर के. एल. राहुल पंजाब संघाचा कर्णधार झाला.

राशिद खान अफगाणिस्तानचा IPL मध्ये खेळणारा पहिलाच खेळाडू आहे. राशिद खान हा २०१५ पासून हैद्राबाद संघाकडून खेळत आहे. हैद्राबाद संघासाठी राशिद खान महत्वाचा खेळाडू बनला आहे. भुवनेश्वर कुमारच्या सोबतीने राशिद खान हैद्राबाद संघाची गोलदांजी सांभाळतो.

का होऊ शकते राहुल आणि राशिद वर एक वर्षाची बंदी ?

२०२२ च्या IPL साठी लखनौ आणि अहमदाबाद हे दोन संघ वाढले आहेत. लिलावाच्या अगोदर कुठल्याही खेळाडूला संघ व्यवस्थापनशी बोलण्याची परवानगी नसते. लिलाव पारदर्शक होण्यासाठी BCCI ने अशी नियमावली बनवली आहे. मात्र २०२२ IPL साठी होणाऱ्या लिलावाच्या अगोदरच के. एल. राहूल आणि राशिद खानने लखनौ संघाशी बोलणी केली आहे. राहूलला लखनौ संघाकडून कर्णधार पदाची ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. लिलावाच्या अगोदर दुसऱ्या संघ व्यवस्थापनशी बोलणी केल्यामुळे पंजाब आणि हैद्राबाद संघाने अनुक्रमे राहूल आणि रशिद खान यांची तक्रार BCCI कडे केली आहे. राहूल आणि राशिद खान यांनी नियमांचे पालन न केल्यामुळे त्या दोंघावर पण एक वर्ष IPL बंदीची टांगती तलवार आहे. BCCI राहूल आणि राशिद खान याना एक वर्षासाठी आपलं खेळण्यास बंदी घालते कि दंड ठोकावते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.