सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मोबाईल प्रोसेसर बनवणारी कंपनी अडचणीत, मोबाइल कंपन्यांनी वॉरंटीचा कालावधी का वाढवला?

कोणत्या बातमीने पैसे वाचणार तर का प्रोसेसरचा का भासतोय तुटवडा. टेक संबंधी या पाच महत्वाच्या घडामोडी थोडक्यात समजून घेण्यासाठी खाली वाचा.

१) क्वॉल्कॉम कंपनी अडचणीत !

मोबाईल चिप बनवणारी कंपनी क्वॉल्कॉम ही सध्या अडचणीत सापडली आहे. जागतिक चीप तुटवड्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. सध्या कंपनीकडे बजेट व मिड रेंज प्रोसेसर साठी निधीच उरलेला नाही या कारणामुळे ही कंपनी सध्या फक्त फ्लॅगशिप प्रोसेसर निर्माण करेल अशी संभावना वर्तविण्यात येत आहे. काही महिन्यांपासून संपूर्ण जगामध्येच प्रोसेसरची कमतरता भासत आहे. चिप बनवण्यासाठी लागणारी वाळू तसेच इतर कच्चा माल हा साठा कमी होत चालल्यामुळे प्रोसेसरच्या किमतीवर व उत्पादनावर याचा परिणाम झालेला आहे.

२) बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया कडून आनंदाची बातमी

बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया या मोबाईल गेम्सच प्रि रजिस्ट्रेशन १८ मे ला सुरू होणार आहे. पूर्व नोंदणी करणाऱ्यांना काही स्पेशल बक्षिस (रिवॉर्ड) मिळणार आहे, आणि हे फक्त भारतीय नागरिकांसाठी मर्यादित असणार आहे. हा गेम जूनमध्ये लॉन्च केला जाईल. गेमच्या फाईलची साईज दोन जीबी पेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामधील मॅप कसे असतील व अजून कोणते नवीन फिचर यामध्ये मिळतील हे पाहण्याची उत्सुकता नक्कीच सर्व मोबाईल गेम प्रेमींमध्ये आहे.

३) LeEco कंपनी करू शकते पुनरागमन

LeEco ही चायनीज कंपनी आहे,आणि ह्या कंपनीने सर्वप्रथम भारतामध्ये २०१५-१६ च्या दरम्यान त्यांचा मोबाईल लॉन्च केला होता त्यानंतर या कंपनीने यशाच्या शिखराकडे वाटचाल केली .आणि शाओमी सारखच अतिशय उत्तम बजेटमध्ये चांगले स्मार्टफोन टीव्ही लॉन्च केले होते पण काही कारणास्तव ही कंपनी नंतर डुबली व त्यांनी भारतामधून त्यांचा व्यापार काढून घेतला गेला. आता अशी माहिती मिळत आहे की ही कंपनी पुन्हा एकदा मोबाईल, टीव्ही, स्मार्टवॉच अशा कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये परत पदार्पण करायची तयारी करत आहे .

४) मोबाईल कंपन्यांनी वॉरंटीचा कालावधी वाढवला

आधी पोको मग विवो या मोबाईल कंपन्यांनी तीस दिवस त्त्यांच्या मोबाईलची वॉरंटी वाढवली आहे. ज्या ग्राहकांची वॉरंटी या महिन्यामध्ये संपणार होती पण लॉकडाउनच्या कारणामुळे सध्या सगळीकडे शोरुम रिपेअर सेंटर बंद असल्या कारणाने या दोन मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या कस्टमर साठी एक महिना वॉरंटी एक्सटेंशन दिलेला आहे. याच प्रमाणे बाकीच्या कंपन्यांनी सुद्धा त्या दिशेने पाऊल उचलले पाहिजे जेणेकरून ग्राहकांना त्याचा फायदा शकेल.

५) Realme 8 5G भारतातील सर्वात स्वस्त 5 जी मोबाईल

Realme 8 5G हा मोबाईल आता भारतातील सर्वात स्वस्त 5 जी टेक्नॉलॉजी असणारा मोबाईल आहे. हल्लीच यामध्ये ४ जीबी रॅम मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये इंटरनल स्टोरेज ६४ जीबी असणार आहे. बाकी सगळे वैशिष्ठय सारखेच असणार आहे. याची किंमत ही १३,९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. रियल मी इंडिया चे सीईओ माधव सेठ यांनी सांगितलं होतं की रियल मी ही कंपनी या क्षेत्रामध्ये क्रांती करणार आणि कमीत कमी किमतीमध्ये ही टेक्नॉलॉजी सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आणि त्याच दिशेने कंपनी आता काम करताना दिसत आहे. येत्या काळात लवकरच १०,००० रुपये व त्यापेक्षा कमी मध्ये सुद्धा आपल्याला रियल मी कडून 5 जी मोबाईल बघायला मिळतील.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.