सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

किरीट सोमय्यांचा ५८ कोटींचा क्राउडफंड घोटाळा, नेमका काय आहे घोटाळा ?

संजय राऊत आणि भाजपचे किरीट सोमय्या हे दोघे महारष्ट्राच्या राजकरणात नेहमीच चर्चेत असतात. दोन दिवसापूर्वी किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली. सुमारे १ हजार ३४ कोटींची त्यांची संपत्ती होती. साहजिकच संजय राऊत ईडीच्या कारवाई मुळे खुश नव्हते. संजय राऊत सोमय्यांवर रागावले आहेत. त्यांच्यासाठी अपशब्दांचा वपर करताना संजय राऊत हातचं राखत नाहीत. काल एबीपी माझाशी बोलताना त्याचा प्रत्यय आला.

संजय राऊत यांचं प्रकरण शांत होत नाही तोपर्यंतच संजय राऊत आणि शिवसेनेने किरीट सोमय्यांचे नवे प्रकरण बाहेर काढले. हे प्रकरण आहे २०१३ ते २०१५ च्या दरम्यानचे. भारतीय नौसेनेतील आयएनएस विक्रांत नांवाची मोठी मालवाहू जहाज वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले होते. हे सगळे पैसे आपल्याला राज्यपालांकडे द्यायचे असल्याचे किरीट सोमय्यांनी देणगी देणाऱ्या लोकांना सांगितले होते. पण मागच्या काही दिवसापूर्वी कोणी तरी राज्यपाल कार्यालयाकडे किरीट सोमय्यांनी किती पैसे दिले याची माहिती मागितली होती. माहिती अधिकाराच्या माहितीतून मिळालेली माहिती खूप धक्कादायक आहे. राज्यपाल कार्यालयाने सांगितले कि किरीट सोमय्यांनी आम्हाला आयएनएस विक्रांतसाठी काहीही पैसे दिले नाहीत. पैसे राज्यपाल कार्यालयाकडे दिले नाहीत म्हणजे नक्कीच ते पैसे सोमय्यांच्याकडेच आहेत. ह्या सर्व प्रकाराला आपण घोटाळा म्हणून शकतो कारण वेगेळे कारण सांगून गोळा केलेलं पैसे त्यांनी स्वतःच्या कामासाठी वापरले आहेत. ठाण्यात सोमय्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. एक महिन्या आधी प्रसिद्ध पत्रकार आणि गुजरात फाईल्सच्या लेखिका राणा अय्युब यांच्यावर देखील असेच आरोप झाले होते. सोमय्यांनी आणि अय्युबनी नेमकं काय केलं याचा आढावा घेऊ.

कोव्हीडच्या काळात राणा अय्युबने १.६७ कोटी जमा केले

२०२० च्या मार्च मध्ये कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन लागले. लॉकडाऊनमुळे मुंबई पुण्यात आणि इतर मोठ्या शहरात मजूर आणि कामगार अडकून पडले. त्यांच्या जेवणाची सोय त्यांना करणं शक्य नव्हतं. त्यावेळेस अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकतें त्यांच्या मदतीला पुढे आले. त्यातच होत्या पत्रकार राणा अय्युब. त्यांच्या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरीब लोकांना मदत केली.
मदतीसाठी राणा अय्युब यांनी कीटो अँप वरून मदत मागितली होती. तर राणा अय्युबना १.६७ कोटीची मदत मिळाली होती. त्याबद्दल कोणाला माहिती नव्हती पण मागच्या महिन्यात ईडीकडून राणा अय्युब यांच्या घरावर धाड पडली. ईडीकडून सांगण्यात आले कि राणा अय्युबनी जमा केलेला पैसे त्यांचे वडील आणि बहीण यांच्या नावावर केले आहेत. लोकांकडून जमा केलेला पैसे स्वतःसाठी घेणे भारतात गैर आहे. ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

किरीट सोमय्यांनी ५८ कोटी जमा केले.

नौसेनेची आयएनएस विक्रांत नावाच्या जहाज वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी लोंकांकडून पैसे घेतेले. घेतलेल्या पैश्यातून आयएनएस विक्रांतला मदत करायची ठरले होते. पण किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल यांनी ते पैसे स्वतःसाठी घेतले. संजय राऊत यांच्या आरोपानुसार सोमय्या पिता पुत्रांनी ५८ कोटी रुपये जमा केले होते. ठाण्यात सोमय्या पिता पुत्राच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

महाविकास आघाडी सरकार सोमय्यांना अटक करू शकते अश्या बातम्या येत आहेत. जर तुम्ही संजय राऊत याना त्रास देणार असाल तर आम्ही किरीट सोमय्यांना उचलू असं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणताना दिसत आहेत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.