सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

अफगाणिस्तान मध्ये अमेरिका हरली !

९/११ वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ‘वॉर ऑन टेरर’ सूरू केलं होतं. या मोहिमेच्या योजनेनुसार अमेरिकेने अफगाणिस्तानात आपले सैनिक घुसवले कारण ९/११ चे हल्लेकरी अफगाणिस्तानात असल्याची माहिती होती. तिथून सुरू झालेलं हे अमेरिका आणि तालिबानी यूद्ध संपत आलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ‘जो बायडन’ यांनी जाहिर केलं की या वर्षीच्या सप्टेंबर मध्ये अमेरिका अफगाणिस्तानातून आपले सैनिक परत बोलावून घेईल. अमेरिका तालिबान युद्धात अमेरिका हरला आहे, कारण तालिबान ने परत जवळजवळ सर्व अफगाणिस्तान काबीज केलं आहे. यामुळे अमेरिका ‘जो बायडन’ यांच्या नेतृत्वात अफगाणिस्तानात हरली असाच इतिहास लिहिला जाईल.

अफगाणिस्तानात काय होतंय ?

अफगाणिस्तान आज पूर्ण तालिबानच्या हातात गेलं आहे. ह्या सर्वासाठी जो बायडन हे जबाबदार आहेत, कारण लष्करी अधिकारी, अभ्यासक इशारे देत होते की जर अमेरिका अफगाणिस्तानातून आता बाहेर पडली तर तालिबान अफगाणिस्तान परत काबीज करेल. बायडन यांनी अमेरिकी सैनिकांना अफगाणिस्तानातून बाहेर करून तालिबानला रस्ता मोकळा करून दिला. तालिबानने फक्त अफगाणिस्तानची राजधानी काबुल तेवढी काबीज करायची बाकी ठेवली आहे. बाकीचे सर्व महत्त्वाची शहरे तालिबानने जिंकली आहेत. इतिहासात पहिल्यांदा एका दहशतवादी संघटनेच्या पुढे खुप मोठी महासत्ता असलेली अमेरिका कमजोर वाटत आहे.

अमेरिकेने या १ जुलैला अफगाणिस्तानातल्या सैनिकी कारवाया थांबवल्या आणि सर्व जबाबदारी अफगाणिस्तानच्या सैनिकांच्या हाती सोपवली. “बारागम हवाई तळ” त्यांनी अफगाणी सैनिकांना सोपवले, तेथूनच ते तालिबानच्या विरोधात कारवाया करायचे. खर तर अमेरिकेने अफगाणिस्तान सोडलं नाही तर ते पळून गेले आहेत. त्यांनी जबाबदारी एकदम झटकली आहे. अमेरिकेच्या अश्या वागण्याने अफगाणिस्तान लष्कर खुप कमजोर झाले आहे. त्यामुळेच अफगाणी सैनिक तालिबानी दहशतवाद्यांपेक्षा जास्त असून पण तालिबान जिंकत चाललं आहे. अमेरिकेच्या ह्या निर्णयामुळे अफगाणिस्तानच भविष्य अंधारात ढकलले गेले आहे.

बायडन यांचं स्पष्टीकरण

‌सगळ्यांनी टिका केल्यावर आणि अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय चुकल्यावर जो बायडन म्हणतायेत आम्ही अफगाणिस्तानमध्ये कायमस्वरुपी आलो नव्हतो. बायडन अगदी खरच बोलले त्यांना अफगाणिस्तान सोडून जावंच लागणार होतं. अफगानी लोकांची पण तशीच इच्छा होती पण ती वेळ अमेरिकेने चुकवली आहे. चुकीच्या वेळेवर अमेरिका अफगाणिस्तानातून पळून गेली आहे. नक्कीच अमेरिकेचा तो अधिकार होता पण सामान्य अफगाणी नागरिकांना दहशतवादी लोकांच्या हातात सोडणे हे जबाबदारीच वागणे नक्कीच नाही. अमेरिका ही एक महासत्ता आहे त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं.

व्हिएतनाम युद्धाचा अनुभव !

या अगोदर अमेरिकेने व्हिएतनाममध्ये याच प्रकारे सैनिक बोलावून घेतले होते. व्हिएतनाममध्ये कम्युनिस्ट सरकार पाडण्यासाठी गेलेल्या अमेरिकेचा पराभव झाला होता. पाच सहा वर्ष व्हिएतनाम युद्ध केल्यावर अमेरिकेच्या लक्षात आलं आपलं जिंकणं खुप महागात पडत आहे. व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणात अमिरेकी सैनिक मरत होते. त्यांची शव रोजच अमेरिकेत जात होती सामान्य नागरिक या युद्धाच्या विरोधात गेले होते. युद्ध खरचं गरजेचं आहे का म्हणून प्रश्न विचारत होते. तेव्हा व्हिएतनाममधून अमेरिकाने पलायन केले. व्हिएतनाम लोकांना त्यांच्या आहे त्या परिस्थितीत सोडलं. पण याचे खुप भयंकर परिणाम सामान्य व्हिएतनाम नागरिकांना भोगावे लागले. व्हिएतनामी कम्युनिस्ट लोकांनी ८० हजार सामान्य व्हिएतनामी लोकांना मारून टाकले. सगळी अनागोंदी माजली होती. आता चाळीस वर्षांनंतर अगदी तसाच धोका अफगाणिस्तानमध्ये उद्भवला आहे. अमेरिका गेल्याने काहीच आठवड्यामध्ये तालिबानने सगळी कडे अनागोंदी माजवली आहे. जे लोक अमेरिकेला मदत करत होते किंवा त्यांचे समर्थन करत होते त्यांचा धोका वाढला आहे. तालिबान त्यांचा नरसंहार करू शकतं. अगोदर केलेल्या चुकांमधून बायडन शिकले नाहीत. व्हिएतनाममध्ये जो नरसंहार झाला तो अफगाणिस्तान मध्ये थांबवता आला असता पण आता त्याची शक्यता संपली आहे. कारण अमेरिकीने आपले हात वर केले आहेत‌. बायडन यांनी अफगाणी लोकांना मरायला सोडलं आहे.

तालिबान जिंकलं, अमेरिका हरली !

खर तर अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडायचा प्रयत्न खुप अगोदर पासून करत होती पण त्यांना जमलं नाही. बराक ओबामा यांच्या सरकारमध्ये हालचाली चालू होत्या कारण अमेरिकेला अफगाणिस्तानात फार काही मिळवता आलं नाही. ओबामा यांच्या सरकारमध्ये जो बायडन हे उप अध्यक्ष होते. तेव्हा पासून ते अफगाणिस्तान सोडण्याच्या समर्थानात होते. अमेरिकेने आपले सैनिक हळूहळू कमी केले होते. २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प सरकार मध्ये आले. ओबामा यांच्या पावलावर चालत ते एक पाऊल पुढे गेले. डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी तालिबान सोबत कतारच्या राजधानी डोहा येथे बोलण्या केल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची तारीख सुद्धा जाहीर केली होती. तालिबान फसवणूक करत आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी निर्णय बदलला. डोनाल्ड ट्रम्प यांनी टाळलेली चूक मात्र जो बायडन यांनी केली. अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानातून बाहेर काढले. अमेरिकेचे संरक्षण सल्लागार रॉबर्ट गेट्स यांनी जो बायडन यांच्या बद्दल लिहिलं होतं की, “बायडन यांचे परराष्ट्र धोरण मागच्या चार दशकांपासून सतत चुकले आहे. आता बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अफगाणिस्तान धोरणावरून ते स्पष्ट झालं आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.