सप्टेंबर 20, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

या विषाणुमुळॆ सिंहाची संख्या कमी झाली

काही प्राण्यांचे भारतीयांना एक विशेष आकर्षण राहिले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सिंहाचे जरा जास्तच, नावमध्ये सिंह लावून बढाया मारणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भेटतील. परंतु सिंह आणि संबंधित बाबीचे कोणाला कुठेही सोयरसुतक नसते. 10 ऑगस्ट रोजी असणाऱ्या जागतिक सिंह दिनानिमित भारतात सापडणाऱ्या सिंहाबद्दल माहिती असणे पर्यावरणीय आणि भौगोलिक दृष्टीने माहित असणे महत्वाचे ठरते.

भारतात कोठे सापडतात सिंह ?

आपल्या भारतातही सिंह सापडतात याबद्दल थोडं आश्चर्यच वाटत असेल. कारण डिस्कवरी चॅनलवर जेव्हा जेव्हा आपण सिंह पाहिलेलते म्हणजे आफ्रिकेतीलच. आफ्रिकेच्या विशाल सव्हणा गवताळा प्रदेशात ऐटित फिरणाऱ्या वनराजांची प्रतिमाच आपल्या मनात कायमची राहिली आहे. मात्र भारतातही सिंहाचा नैसर्गिक आधिवास आहे. येथेही हजारो वर्षांपासून भारतात सिंहाचे वास्तव असल्याचे पाहण्यात येते. आपल्या लोककथा, लोकसंगीत, धार्मिक प्रतिमा, मूर्ती लेण्या यांमध्ये सिंहाचे स्थान कायमच वरचे आणि विशेष राहिले आहे. एवढेच काय भारताच्या राष्ट्रीय चिन्हावर चार केसरी रुबाबात उभे असल्याचे पाहायला मिळतात. मात्र एकेकाळी भारतभर विशाल क्षेत्रफळामध्ये पसलेला अधिवास आज फक्त गुजरातमधील गिर अभयरण्यापुरते मर्यादित राहिले आहे.असे का झाले तर?

कारण काय?

Canine Distemper Virus हा अशियायी सिंहाच्या मृत्यूमागील प्रमुख कारण झाले आहे. २०१८ या व्हायरसचा साथीत जवळपास २० सिंह दगावले होते. भविष्यात अश्या साथी मोठ्या प्रमाणात आल्यास फक्त एकच अभयारण्यपुरती मर्यादीत असलेली प्रजाती नामशेष होऊ शकते.
२०१३ मध्ये सुप्रीम कोर्टाने वरील केंद्र सरकारला काही सिंह हे मध्यप्रदेशात स्थलांतरीत करण्याचा आदेश दिला आहे. गीर अभयरण्यातील गर्दी टाळण्यासाठी काही सिंह मध्यप्रदेशातील कुनो-पालपुर अभयारण्यात पाठवावेत असा प्रस्ताव सारखा चर्चेत असतो. कुनो-पालपुर हे अभयारण्य चित्यांचे पूनरप्रस्थापण करण्यासाठी निवडण्यात आले आहे.

गुजरातचा विरोध कशासाठी ?

सिंह हा आता गुजरातच्या अस्मितेचा विषय झाला आहे. गुजरात सरकारणे सिंहांना नवीन जागी पाठवण्यास सुरवातीपासूनच विरोध केला आहे. नवीन मध्यप्रदेशमधील जागा सिंहांना मानवणार नाही, तिथे शिकारीचा धोकाही जास्त आहे अशी कारणे गुजरात सरकार कडून दिली जातात. तर सिंहाचा योग्य तो पाहुणचार करण्यास आम्ही सक्षम असल्याचे मध्य प्रदेश सरकार कडून सांगितले जाते. सिंहांना घर दयायचे असेल तर पोरबंदर जवळील बर्डा अभरण्यात त्यांना पाठवावे असे गुजरातचे म्हणणे आहे.परंतु बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडला असेल की सिंह फक्त गुजरात येथील गीर अभयारण्यात का सापडतात.

गीर अभयारण्यात का सापडतात सिंह?

ब्रिटिश भारतात सिंहाचे वास्तव हे पंजाब, गुजरात, राजस्थान हरियाणा, बिहार ते अगदी मध्यप्रदेश पर्यंत होते. मात्र ब्रिटिश मात्र सहज उपलब्ध असणाऱ्या आधुनिक हत्याऱ्यामुळे त्यांच्या शिकारी मध्ये वाढ झाली. ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय राजे यांना सिंहाच्या शिकारी करण्याची हौस. याच हौसेखातर भारतातून अनेक वनराजांच्या जाती नाहीशी झाल्या. १८५७ च्या बंडामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जवळपास ३०० सिंह मारले होते. एकविसाव्या शतकात फक्त जुनागढ़ जिल्हयात डझनभर सिंह शिल्लक राहिले. शतकाच्या उत्तरार्ध जुनागड नवाबाच्या जंगलात फक्त सिंह संरक्षित राहिले.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.