सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

फॅमिली मॅन २ च्या विरोधापाठीमागे राजीव गांधी यांच्या हत्येचा इतिहास कसा लपला आहे?

फॅमिली मॅनच्या पहिल्या सीजनला तुफान प्रतिसाद मिळाला होता. मागच्या एक वर्षांपासून याचा दुसरा भाग येणार म्हणून चर्चा होती. शेवटी दुसऱ्या सीजनचा ट्रेलर आला. हा व्हिडिओ इतका चर्चेत आला कि नंबर एकला ट्रेंडिंग होता. ऍमेझॉन वरील आतापर्यंत सर्वात जास्त पाहिलेली ही वेब सिरीज आहे. तरी सुद्धा दुसऱ्या सीजनवर बंदी करण्याची मागणी वाढू लागली. तसे हॅशटॅग पण चालवले गेले. लाखो जणांनी ऑनलाईन ही मागणी लावून धरली आहे. या सीरिजला विरोध होण्यापाठीमागे महत्वाचे कारण आहे ते तामिळ बोलणारा खलनायक रूपात दाखवला आहे. विरोध करणाऱ्यांचं म्हणणे आहे कि ही वेब सिरीज तामिळ लोकांच्या विरोधात आहे. हा प्रश्न समजून घेण्यासाठी श्रीलंकेतील तामिळ आणि सिंहली हा वाद समजून घेतला पाहिजे आणि यातून भारतातील राजकारणावर विशेषतः तामिळ लोकांवर होणारा परिणाम समजून घेतला पाहिजे.

सिंहली आणि तमीळ वाद कधीपासून सुरु झाला ?

श्रीलंकेत भारतासारखेच अनेक राज्यकर्ते होऊन गेले, त्यातील शेवटचे राज्यकर्ते होते ब्रिटिश. ब्रिटिशांची सत्ता असताना आजचा श्रीलंका ज्याचं पूर्वीच नाव शिलॉंग होतं तिथे सिंहली लोकांची संख्या जास्त होती. . त्या तुलनेत तामिळ लोकांची संख्या कमी होती. पण ब्रिटिशाना कामासाठी लोक पाहिजे होते. त्यांनी तामिळ लोकांना श्रीलंकेत मोठ्या संख्येने आणलं. तामिळ लोकांना श्रीलंकेत आणायचं महत्वाचं कारण होतं ते चहा. ब्रिटिशाना चहाच्या व्यापारातून चांगलाच व्यवसाय होतं होता. त्यांचा व्यवसाय अधिकाधिक वाढावा म्हणून वरचेवर तमीळ लोक श्रीलंकेत आणले जाऊ लागले. हे बहुतेक तामिळ तेव्हाच्या मद्रास प्रांतातून आणले जातं आणि हे बहुतेक हिंदू आहेत. तमीळ लोक हळूहळू ब्रिटाशांच्या भाषा बोलायला शिकले. यामुळे ब्रिटिशांना तमीळ लोकांकडून काम करवून घेणे अजून सोपे होऊ लागले. यातूनच ब्रिटिशांचा कल थोडा तमीळ लोकांकडे राहिला. ब्रिटिशांना तमीळ जनतेची काळजी होती असं यातून अजिबात अर्थ घेऊ नका. हा सर्वोतपरी व्यवहारी दृष्टिकोन होता. पण यातून सिंहली लोकांच्या मनात तमीळ लोकांबद्दल आकस वाढत गेला. सिंहली जनतेला बहुसंख्य बुध्दीष्ठ असूनही अस्तित्व नसल्यासारखे वाटू लागले.

सिंहली आणि तमीळ हा वाद दोन्ही गटांमध्ये सुप्त वाढला होता पण ब्रिटिश काळात कुठेही हिंसा झाली नव्हती. सिंहली लोकांचा राग दिवसेंदिवस वाढत चालला त्याला अजूनही बरीच कारणे आहेत. ब्रिटिशांनी तमीळ लोकांना प्रशासकीय सेवेत जास्त प्रमाणात घेतले. कारण तमीळ हे सुरवातीपासून ब्रिटिशांना सोयीस्कर काम करत होते. ब्रिटिशांना त्यांच्याशी व्यवहार करायला सहज जातं होतं. ज्या तमीळ लोकांनी चहाच्या शेतीचा नाद सोडून दिला त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिला. दरम्यान ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षणासाठी ठिकठिकाणी मिशनरीजच्या माध्यमातून प्रचार प्रसार वाढवला. शाळा वाढवल्या. याच काळात श्रीलंकेत धर्मांतर पण अधिक झाले. तमीळ लोकांच्या शिक्षणाचं प्रमाण १९ व्या शतकात श्रीलंकेत सर्वाधिक होतं. या कारणामुळे ब्रिटिशांचा समजा असा झाला कि तमीळ हे सिंहली लोकांपेक्षा अधिक अग्रेसर किंवा पुढारलेले आहेत. यातून सिंहली लोकांमध्ये दुय्यम असल्याची भावना अधिक तीव्र झाली.

तमीळ लोकांवर अन्याय करणारा कायदा पास झाला.

श्रीलंका स्वतंत्र झाल्यांनतर १९५५ ला तत्कालीन श्रीलंकेचे अध्यक्ष यांनी तमीळ आणि सिंहली या दोन्ही भाषांना समान दर्जा देण्याची घोषणा केली. पण या निर्णयावर सिंहली जनतेनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट तमीळ भाषेचा विरोध सुरु केला. सत्ता आल्यांनतर केवळ सिंहली लोकांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली. त्यासाठी निदर्शने चालू झाली आणि मग १९५६ मध्ये दुसऱ्या अध्यक्षाने केवळ सिंहली हीच अधिकृत भाषा असल्याचा कायदा पास केला. असा कायदा बनवणे म्हणजे तमीळ लोकांवर मोठा अन्याय होता. इथून पुढे तमीळ लोकांवर शासकीय आणि खाजगी पातळीवर अन्याय सुरु झाला. परिणामी तामिळी जनतेचा शासकीय सहभाग मोठ्या प्रमाणावर कमी झाला. पुढच्या दहा पंधरा वर्षात तमीळ मुख्य प्रवाहापासून दूर झाले. एवढ्यावर श्रीलंका सरकार थांबले नाहीत. बुद्धिस्ट धर्माला १९७० नंतर सरकारी पातळीवर दर्जा देण्यात आला. यानंतर सिंहली लोकांनी तामिळींच्या जागेवर आक्रमण सुरु केले. यातून सिंहली आणि तमीळ वाद टोकाचा वाढला. १९७८ ला सरकारने दोन्ही भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा दिला, पण या दोन गटातील असंतोष काही केल्या थांबायचं नाव घेत नव्हता. साहजिकच यातून एक सशस्त्र सेना असलेली संघटना उदयास आली. तामिळींच्या हक्कासाठी लढणारी म्हणून LTTE (लिब्रेशन ऑफ तमीळ टायगर ईलम) ही संघटना उभी राहिली. LTTE ही संघटना श्रीलंकेतील काही तरुण तमीळ मुलांनी सुरु केली होती. तामिळींचा स्वतंत्र ईलम देश निर्माण करण्याच्या हेतूने ही संघटना हिंसक कारवाया करू लागली. १९८० मध्ये LTTE आणि श्रीलंकन सरकार यांच्यात सतत हिंसक हल्ले होता राहिले. १९८३ मध्ये LTTE ने काही श्रीलंकन शिपायांना मारलं. बदल्यात श्रीलंकन सरकारने खूप मोठा हिंसाचार घडवला. अनेक तमीळ लोकांची घरे बेचिराख करून टाकली. कित्येकांच्या हत्या झाल्या. इथे तामिळी नागरिकांना श्रीलंकन सरकार आपल्याला न्याय देऊ शकत नाही ही भावना तीव्र झाली. स्वतंत्र तमीळ राष्ट्राशिवाय आपलं अस्तित्व सिद्ध होणार नाही हे लोकांना पटायला लागलं. आजही या हिंसाचाराला तमीळ लोक ‘काळा जुलै’ म्हणतात. इथून पुढे तमीळ तरुणांचा LTTE कडे ओढा वाढला. LTTE ही संघटना आली म्हणजे तमीळ लोकांचे प्रश्न कमी झाले असा गैरसमज अजिबात करू नका. LTTE ने अनेक तरुणांना बळजबरीने सामील करून घेतले. ज्यांना संघटनेत यायचं नव्हतं त्याच्या कडून पैशाची लूट सुरूच ठेवली. LTTE हे समांतर सत्ता केंद्र चालवू लागले. श्रीलंकेतील मोठा भाग त्यांनी ताब्यात ठेवला. काही प्रमाणात तिथे शिक्षणाची पण सोय केली. पण दुर्दैवाने तामिळी लोकांचं आयुष्य दुहेरी संकटात सापडलं.

श्रीलंकेतील हा प्रश्न भारतीय राजकारणावर परिणाम केल्याशिवाय राहणार नव्हता. भारतातील स्थानिक तमीळ लोकांना भारत सरकारकडून काहीतरी ठोस पाऊल अपेक्षित होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या प्रश्नात लक्ष घातले. एवढंच नाही तर भारताने LTTE साठी ट्रेनिंग कॅम्प भारतात सुरु केले. स्वतंत्र तमीळ ईलमला भारताचे समर्थन होते यातून दिसून येते. पण तेव्हा परराष्ट्र खात्याचं म्हणणं होतं कि भारताचा स्वतंत्र तमीळ ईलम राष्ट्राला समर्थन नव्हतं. तर LTTE ला समर्थन देऊन श्रीलंकेतील तामिळींच्या प्रश्नावर श्रीलंका सरकारवर दबाव आणणे हा उद्देश होता. भाषेच्या आधारवर राष्ट्र निर्मितीची मागणी इंदिरा गांधींना परवडणारी नव्हती. कारण यामुळे इतर राज्यांनी भाषेच्या आधारावर नवीन देशाची मागणी सुरु केली असती.

भारतीय सेना या कारणामुळे तमीळ लोकांमध्ये बदनाम झाली.

भारताचा LTTE ला पाठिंबा असल्याचं एकदम उघडकीस आलं ते १९८७ ला. यावर्षी श्रीलंकेने एक ऑपेरेशन सुरु केलं. या अंतर्गत LTTE चा बालेकिल्ला वड्मराच्ची इथे श्रीलंकन आर्मीने सैन्याने हल्ला केला. या हल्ल्यात कित्येक सामान्य नागरिक मृत्युमुखी पडले. अतिशय वाईट अवस्था झाली. यावेळेस नागरिकांच्या मदतीसाठी समुद्रीमार्गे भारताने औषधे आणि इतर मदत पाठवली. ही मदत अडवण्यात आली. यानंतर भारताने हवाई मार्गाने मदत पाठवली. या घटनेनंतर भारताची भूमिका एकदम उठून LTTE समर्थनार्थ दिसली. यावेल्स श्रीलंकेला हा बाब खटकली. श्रीलंकेने शेजारील राष्ट्रांशी याच काळात अधिक जवळीक साधली. ही बाब भारतासाठी पण धोकादायक होती. श्रीलंकेत मदत पाठवून एकप्रकारे भारताने श्रीलंकेला इशारा ही दिला होता. परिस्थिती अधिक बिघडल्यास भारत पॆक्षा अधिक कठोर कारवाई करू शकतो. भारताने यांनतर श्रीलंकेशी शांतता करारावर सही केली. यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते. या करारामुळे भारत जाफना जिथे सर्वाधिक तमीळ राहतात तिथे सैनिकांची एक तुकडी पाठवेल. युद्ध विराम करण्याच्या दृष्टीने हे सैनिक काम करतील असा हा करार होता. पण यामुळे परिस्थितीने वेगळीच कलाटणी घेतली. भारताने आजपर्यंत LTTE ला समर्थन दिले होतं तोच भारत देश शस्त्रसंधी व्हावी म्हणून LTTE विरोधात गेला. भारतीय सेना इथे तरीही हिंसा रोखू शकली नाही. जाफना मधील अनेक सामान्य नागरिकांना हिंसाचारामुळे भयंकर त्रासाला सामोरे जावं लागलं होतं. त्यातच भारत ही LTTE च्या विरोधात गेल्याने. तमीळ लोकांमध्ये भारतीय सेना बदनाम झाली. या मोहिमेत हजारच्या वर भारतीय सैनिक मारले गेले. भारताला आपलं सैन्य माघारी बोलवावं लागलं.

राजीव गांधींच्या हत्येचा कट नाही थांबवता आला.

LTTE च्या विरोधात गेल्याने भारताला खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी १२ मे १९९१ मध्ये निवडणूक रॅली साठी तामिळनाडू मध्ये आले होते. यावेळेस एक महिला राजीव गांधींना हार घालण्यासाठी पुढं येत असताना पोलिसांनी तिला रोखलं. राजीव गांधींनी त्या महिलेला येऊ द्यायला सांगितलं. तिने राजीव गांधींना हार घातला. पाया पाडण्यासाठी म्हणून ती खाली वाकली आणि तिच्या कंबरेभोवती असणाऱ्या विस्फोटकाचा ट्रिगर तिने दाबला. या स्फोटात राजीव गांधींची हत्या झाली. या महिलेला पहिली आत्मघाती बॉम्बर म्हणून सुद्धा ओळखतात. LTTE आणि श्रीलंका वादात भारताला मोठी किंमत मोजावी लागली. यांनतर भारताने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. तरीही श्रीलंकेतील नरसंहार चालूच राहिला. LTTE ने श्रीलंकेतील दोन अध्यक्षांना मारण्याचा प्रयत्न केला. यापैकी एक अध्यक्षांना मारण्यात LTTE यशस्वी झाली. २००९ मध्ये श्रीलंकेने LTTE व्याप्त परिसर काबीज केला. LTTE प्रमुख प्रभाकरन यात मारला गेला. तरीसुद्धा श्रीलंकेत शांतता प्रस्थपित होऊ शकली नाही.

हा सगळा इतिहास समजल्यावर हे लक्षात येईल कि भारतातील तमीळ लोकांचा श्रीलंकेतील तमीळ लोकांना प्रचंड पाठिंबा आहे. कोणत्याही सिनेमात तमीळ लोकांची खलनायक अशी भूमिका दाखवणे म्हणजे श्रीलंकेतील तमीळ लोंकाच्या प्रश्नांबद्दल असंवदेनशील राहणे किंवा त्यांच्यावर अन्याय केल्यासारखेच आहे, अशी विरोध कारण्याऱ्यांची भूमिका आहे. हीच बाब फॅमिली मॅन सीजन २ च्या भागात दाखवली असल्याने भारतीय तमीळ नाराज आहेत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.