सप्टेंबर 18, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

पोट दुखतय ? टीबी तर ना , होय असू शकतो टीबी.. काय आहेत लक्षणे वाचा.

Abdominal Tuberculosis TB

पोटाचा टीबी (Abdominal Tuberculosis TB) शरीराच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टीममध्ये म्हणजेच जठरांत्र प्रणालीमध्ये तयार होतो आणि त्याचा परिणाम पेरिटोनियम, ओटीपोटातील लिम्फ नोड्स आणि काहीवेळा आतड्यांवर होतो. सोप्या भाषेत त्याला आतड्यांची टीबी (Intestinal TB) असे देखील म्हणतात. त्याचा परिणाम रुग्णाच्या आतड्यांवर होतो परंतु काही गंभीर प्रकरणांमध्ये पोटाचा टीबी किडनी, लिव्हर आणि स्वादुपिंडावर देखील परिणाम करू शकतो. पोटाच्या टीबीचा धोका कोणाला आहे? हा रोग मोठी माणसं आणि मुलं दोघांनाही असू शकतो आणि हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

कारण यामुळे आतड्यांतील तीव्र अडथळा किंवा आतडी तुटणे यासारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात, जे काही प्रकरणांमध्ये जीवघेणे ठरू शकते. टीबीची लक्षणे कोणती? जर तुम्हाला पोटात दुखत असेल किंवा जुलाब होत असतील, तुम्हाला एनोरेक्सिया किंवा वजन वाढलेले दिसत असेल तर ते पोटातील टीबीमुळे असू शकते. तुम्ही पोटाशी संबंधित कोणतीही गंभीर लक्षणे हलक्यात घेऊ नयेत. टीबी आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला त्याची लक्षणे, कारणे, निदान आणि उपचार याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

पोटाचा टीबी होण्याची कारणे

एनसीआरबी च्या रीपोर्ट नुसार पोटातील टीबीचे मुख्य कारण टीबीच्या जंतूंची वाढ असू शकते. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की टीबी फुफ्फुसातून थेट आतड्यांपर्यंत पसरू शकतो. ही समस्या कोणासाठीही धोकादायक समस्या बनू शकते. यामुळे तुमच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

पोटाच्या टीबीची लक्षणे

पोटाच्या टीबीची काही लक्षणे इतर सामान्य आजारांसारखीच असू शकतात. यामुळेच पोटाशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पोटाच्या टीबीमुळे वजन कमी होणे आणि सतत पोटात दुखणे यासोबत पोटात सूज येणे, बद्धकोष्ठता किंवा जुलाब यांसारखी लक्षणे दिसू शकतात. कधीकधी जुलाब रक्तस्राव होणारे किंवा त्याशिवाय होऊ शकतात.

त्यासोबतच जर तुम्हाला पोटात प्रचंड दुखत असेल आणि त्यात ताप, जुलाब, एनोरेक्सियाची लक्षणे दिसत असतील आणि तुमचे वजन कमी होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटावे. कधीकधी पोटात गाठ असल्यासारखं जाणवू शकतं. एकदा तुम्हाला या प्रकारच्या टीबीची कोणतीही असामान्य लक्षणे दिसली की अधिक विलंब न करता त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

पोटाच्या टीबीचं निदान

अल्ट्रासाऊंड, एंडोस्कोपी आणि बायोप्सी किंवा पेरिटोनियल द्रवपदार्थाची तपासणी पोटाच्या टीबीच्या निदानाची पुष्टी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या चाचण्यांच्या मदतीने, पोटाच्या टीबीचे निदान करण्यासाठी टीबीचे जंतू पचनमार्गातून वेगळे केले जाऊ शकतात. याशिवाय, टीबीच्या जंतूमुळे पोटाच्या भागात होणारे बदल शोधण्यासाठी पोटाचा एक्स-रे, अल्ट्रासाऊंड आणि पोटाचा सीटी स्कॅन देखील केला जाऊ शकतो.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.