सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

औषधांचा मानवी चाचणी प्रयोग आणि त्याची प्रक्रिया

औषधांचा मानवी चाचणी प्रयोग आणि त्याची प्रक्रिया

नवीन औषध किंवा लस यांच्या शोधा मधला सर्वात महत्वाचा टप्पा. एक डोळयाला न दिसणारा सुक्ष्म विषाणू निर्माण काय झाला आणि आज प्रत्येकाच्या जगण्याच्या व्याख्या बदलून गेल्या आहेत. कोणत्याही महा-भयाण संकटाला न थांबणारी मुंबई आज पूर्ण ठप्प झाली आहे.

सर्व शक्तिमान देश, जगाची महासत्ता अमेरिका या पुढे हतबल झालेली दिसते आहे. आज पर्यंत सर्वानीच आरोग्य या विषयाला दुय्याम दर्जा दिला आहे, परंतु आज सर्वजन भौतिक सुखाच्या खोट्या बंधनातून बाहेर येत फ़क्त जीव वाचावा एवधिच माफ़क अपेक्षा ठेवून आहे. गरिब, श्रीमंत, जात पात , धर्म , देश सर्व कक्षा सोड़ून प्रत्येकाची लढ़ाई जगने यासाठी चालू आहे. प्रत्येकाची नज़र कोरोना या रोगाच्या औषध किंवा लस कधी येईल यावर लागून आहे.

वैतागुन काहींना जगभरातील वैद्यानिक काय करताहेत की नाही ? असाही प्रश्न पडत असेल. यातूनच इंटरनेट वर जगभरातील सर्च इंज़िन मध्ये सध्या CORONA DRUG (कोरोना औषध) किंवा CORONA VACCINE (कोरोना लस) ही गोष्ट ट्रेंडिंग आहे. जेव्हा माहितीजाळयात हा शोध घेतला जातो, तेव्हा त्या माहिती मध्ये आमुक कंपनी, तमुक कंपनी. Clinical Trial (मानवी चाचणी ) लवकरच चालू करेल अस समोर दिसत. तर काय असते औषधाची मानवी चाचणी म्हणजेच Clinical Trials?

औषधांची मानवी चाचणी म्हणजे काय ? ( What is Clinical Trial ? )

हा विषय ज़रा खोलात जाऊन पाहुयात, कोणतही औषध एखाद्या रोगाचा उपचार म्हणून वापर करण्याआधी त्याच विशिष्ठ टप्प्यावर कड़क व कटेकोर निरीक्षण केल जात. तर, विषय असा आहे की मोठ-मोठ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्था आशा प्रयोगांसाठी पैसा लावत असतात. यासाठी काही खासगी कंपनी वा आरोग्य संस्था पुढ़ाकर घेतात, काही विशिष्ठ पदार्थाचा गुणधर्म कसा एखद्या रोगावरील औषध म्हणून उपयोग होवू शकतो याच गणित काग़दावर मांडल जात. मग काही प्रयोग केले जातात. त्यात मानवी शरीररचनेशी काही प्रमाणात साम्य आसणाऱ्या प्राण्यांवर प्रयोग केले जातात. त्याचे निष्कर्ष आपेक्षित असतील तर पुढील सर्वात महत्वाची चाचणी चालू होते , ती म्हणजेच आपला सर्वाचा प्रश्न मानवी प्रयोग ( Clinical Trials ) .

औषधांची मानवी चाचणी प्रक्रिया कशी असते ? ( What is the procedure of Clinical Trial ? )

टप्पा क़्र: १

मानवी शरीरावरील पहिला टप्पा यामाध्ये अगदी नगण्य म्हणजे काही डझन ६-१० सुद्रृढ, कोणताही आजर नसलेली स्वयंस्पूर्तिने समोर आलेले स्वयंसेवक यांना पूर्व कल्पना देवून त्यांची परवानगी घेवून यांच्यावर प्रयोग केला जातो. यामध्ये मुख्यत: तयार झालेल्या औषधाचा मानवी शरीरात पाठवण्याचा मार्ग व औषध प्रमाण किती असाव ? याच निरीक्षण केल जात व या टप्प्यामध्ये वैज्ञानिकांना आणि डॉक्टरांना बनवलेल्या औषधाचा मानवी शरीरावर काय परिणाम होतॊय याचा अभ्यास करण्यासाठी केला उपयोग होतो. या टप्प्यात जे निष्कर्ष समोर येतात यावर पुढील चाचणी अवलंबून असते.

टप्पा क़्र: २

पहिल्या टप्प्यातील चाचणीच्या अभ्यासात सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतर दुसऱ्या टप्यात हि चाचणी स्वयंसेवकांच्या किंवा रुग्णाच्या मोठ्या गटावर म्हणजेच साधारतः ५०-१०० रुग्णांवर केली जाते हे औषध दिल जात. याचा परिणाम कसा होतो आहे याचा बारीक निरीक्षण केल जात. बहुतेक वेळेस उपचाराच्या वेगवेगळ्या डोसांमध्ये भिन्न प्रभाव पडतो कि नाही हे या टप्प्यात निर्धारित केले जाते. रुग्णांना बनवलेल्या औषधाचे विविध डोस दिले जातात आणि त्यातील प्रभावांची तुलना करण्यासाठी आणि सर्वात सुरक्षित आणि प्रभावी डोसिंग पथ्ये निर्धारित करण्यासाठी बारकाईने परीक्षण केले जाते.

टप्पा क़्र: ३

हा औषधाच्या चाचणीमधला खुप महत्वाचा टप्पा मानला जातो, यामध्ये वेगवेगळया भागातील वेगवेगळे सामाजिक व आर्थिक स्थरातील जवळ ३००-३००० रुग्णांवर नवीन औषधचा परिणाम तपासला जातो. याची बारीक निरीक्षण आहवाल तयार केला जातो. या अभ्यासामध्ये पूर्वीच्या टप्प्यांप्रमाणेच एक किंवा अधिक ‘उपचार शस्त्रे’ सामील होऊ शकतात, ज्यामुळे नवीन तपासणी औषधाची सुरक्षा आणि कार्यक्षमता इतर उपलब्ध उपचारांशी तुलना करता येऊ शकते किंवा इतर थेरपीच्या संयोजनाने चाचणी घेता येऊ शकते. यामधील निष्कर्ष अपरिणामकारक वा चुकिचे आहेत, हे जाणवल्यास पुढील चाचणीसाठीची परवानगी नकारली जाते.

टप्पा क़्र: ४

पहिल्या ३ टप्प्यांचे निष्कर्ष योग्य व अपेक्षित असतील, तर हा टप्पा चालू होतो. ज्यामध्ये हा सर्व रीसर्च करणाऱ्या कंपनीला वा संस्थेला, मोठ्या प्रमणात याच उत्पादन व विक्रिसाठी परवानगी दिली जाते. या नंतरही नवीन औषधाचा परिणाम-दुष्परिणाम यावर काही वर्ष नज़र ठेवली जाते .

एवढा सगळा पल्ला गठावा लागतो एखाद नवीन औषध वापरात यायला. आजची निर्माण झालेली कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये यासर्व गोष्टी लवकर करणेसाठी ख़ास बाब म्हणून परवानगी दिली जाईल, परंतु कटेकोर निरीक्षण व प्रत्येक टप्प्यांवरच बारीक मूल्यांकण यात अजिबात तड़जोड होणार नाही हे नक्की आहे. यासर्वांमधे खुप मोठ जागतिक राजकारण व आर्थिक गणिते, आंतरराष्ट्रीय व्यापारी कायदा आणि सर्वांचा केंद्र बिंदु म्हणजे आपण. नुसता गुंता-गुंतिचा खेळ आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.