सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

बौद्धिक संपदा अधिकाराची ओळख आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंध

बौद्धिक संपदा अधिकाराची ओळख आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंध

आज आपण आपल्या सर्वात जवळच्या विषयावर बोलूया ते म्हणजे अधिकार.

मानूस कोणत्याही पदावर असो वा नसो त्याला हक्क अधिकार पाहिजे असतात, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाला आपल्या मालकीच काहीतरी हवं असत. जस कि घर, गाडी, संगणक, मोबाइल इत्यादी.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मालकीची आहे हे सिद्ध करण्यासाठीच दस्तऐवज, उदाहण : घराचे कागतपत्र, गाडीचे नोंदणीपत्र, मोबाईलची पावती इ. हे सगळे आपल्या मालमत्तेची मालकी सिद्ध करतात.या झाल्या सर्व भौतिक गोष्टी.

बौद्धिक संपदा म्हणजे काय ? ( What is intellectual property ? )

पण समाजा एखादा शोध असेल किंवा एखादी कल्पना असेल तर त्याची मालकी कशी सिद्ध करणार ? याच प्रश्नातू उगम होतो बौद्धिक संपदा अंधकाराचा आणि यालाच Intellectual Property Rights ( I.P.R. ) असं म्हणतात.

यामध्ये आपला लावलेला एखादा शोध, आपण तयार केलेल आणि वापरात असलेलं एखाद चिन्ह, जगासमोर आणलेली एखादी कल्पना हि आपलीच आहे यासाठी आपल्याला कायद्याने हक्क मिळावा म्हणून बौध्दिक संपदा अधिकार म्हणजेच I.P.R. निर्माण झाला आहे.

बौद्धिक संपदा अधिकारांमध्ये कोणकोणते अधिकार मिळतात ? (What rights include in I.P.R ? )

१. एकस्व अधिकार ( Patent Rights ) हा अधिकार शोधकर्त्याला त्याचा शोध, प्रक्रिया यासंदर्भातील हक्क मिळावा यासाठी संरक्षण देतो.

२. चिन्हाचा अधिकार ( Trademark Rights ) हा अधिकार एखादा व्यापारी, कंपनी यांना आपल्या उत्पादनावर मालकीहक्क मिळण्यासाठी संरक्षण देतो.

३. व्यावसायिक साचा ( Industrial Design Rights ) एखादी वस्ती कशी दिसेल व त्याचे स्वरूप कसे असेल यासाठीच्या कल्पनेला संरक्षण देण्यासाठी वापरतात.

४. स्वामित्व अधिकार ( Copyrights ) हा अधिकार एखाद लिखाण, कल्पना, कला वा तत्सम गोष्टी कोणी चोरू नये यांसारखे मालकी हक्कांना संरक्षण देण्यासाठी वापरतात.

बौद्धिक अधिकारांचा वैद्यकीय क्षेत्राशी संबंध कसा ? ( How medical field and I.P.R are relative ? )

शोधकर्ता ( Scientist ) हा आपल्या शिक्षणाचा, अनुभवाचा आणि मौल्यवान वेळेचा उपयोग करून एखाद औषधचा शोध लावतो. या आपल्या शोधला अधिकारांचा वापर करून संरक्षक करून घेतो. तसेच त्याच्या निर्मितीसाठी आणि ते औषध सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी कोणत्याही कंपनीशी करार करू शकतो, यामध्ये नियमांची परवानगी मिळवली जाते.

याची गमतीशीर गोष्ट अशी कि भौतिक मालमत्ता अधिकार आपल्याला सकारात्मक अधिकार देते जस कि, मालमत्ता विकणे किंवा गहाण ठेवणे इ.साठी . पण बौद्धिक संपदा अधिकार हा आपल्याला नकारात्मक आणि अनैतिक अधिकार देतो. जस कि, आपण लावलेला शोध, कल्पनेने केलेली वा मांडली गोष्ट कोणी चोरू नये म्हणून याला संरक्षण मिळते पण हे फक्त मर्यादित कालावधीसाठीच. आणि याचा अधिकाराचा अनैतिक उपयोग करून शोध करता साखळीत सामील होऊन आपल्या अक्षरशः पिळवणुनीला सामील होतो.

आणि वैद्यकीय क्षेत्रात या अधिकाराचा वापर आपल्या सामान्य माणसांची पिळवणूक करण्यासाठी खूप केला जातो.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.