सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

कोरोना लस चाचणी अचानक का थांबवण्यात आली ?

कोरोना लस चाचणी अचानक का थांबवण्यात आली ?

औषध कंपनी, ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोरोना विरोधी लसचा मानवी चाचणी प्रयोग टप्पा क्रमांक- ३ हा जगभरात चालू आहे. जगभरातील कोरोना लसच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्डची लस एक महत्वपूर्ण स्पर्धक मानली जाते. त्यांनी तयार केलेल्या लसीचे परिणाम चांगले दिसत आहे. म्हणून कोरोना विरोधी लढाईत यांच्या संशोधकांकडे एक आशेचा किरण म्हणून संपूर्ण जग आस लावून आहे.

ज्या लोकांवर कोरोना ची चाचणी झाली त्यांच्या आरोग्यावर अस्पष्ट परिणाम झाला आहे

परंतु दोन दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये या चाचणी मध्ये सहभागी स्वयंसेवकांमध्ये अस्पष्ट शारीरिक आजराची नोंद झाली आहे. याची गंभीरतेने दाखल घेत हे संशोधन थांबवण्याचा निर्णय व्यवस्थापकांनी घेतला आहे. या स्वयंसेवकांच्या आरोपाची सखोल तपासणी करून , यामागचे कारण शोधून काढले जाईल. संशोधनातून निर्माण झालेल्या या अडचणी जोपर्यन्त दूर होत नाही तोपर्यंत यावर काम करणे धोक्याचे आहे.

यावर भाष्य करताना ॲस्ट्राझेनेका या कंपनीचे प्रवक्ते, मिशेल मेक्सिझेल, यांनी स्पष्ट केले आहे की , “मानवी चाचणीच्या प्रयोगामध्ये अशा गोष्टी घडणे ही सर्वसामान्य बाब आहे. संशोधन चालू असलेली औषध वा लस हि अधिक सक्षम असावी, तसेच आरोग्यास अपायकारक नसावी, यासाठी बारीक व काटेकोर परीक्षण होणे गरजेचे असते.”

काही संशोधकांच्या मते, चाचणी दरम्यान देण्यात येणाऱ्या लसीच्या कमी अधिक प्रमाणामुळे कदाचित असे दुष्परिणाम दिसून येतात. जास्त विषाणू प्रमाण असेल तर असं होऊ शकते. काहींच्या मते हा केवळ योगा योग असेल. कदाचित या लसीव्यतिरिक्त इतर कारणानेही आजार होऊ शकतो. या संदर्भात सखोल आरोग्य तपासणी झाल्यावर योग्य माहिती समोर येईलच.

पुण्यातील सिरम संस्थेचा या संशोधनात महत्वाचा सहभाग आहे.

दरम्यान भारतामध्ये या लसीची चाचणी अस्ट्राझेनेका व ऑक्सफोर्ड विद्यापीठ यांच्या सोबत, सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया हि संस्था काम करत आहे. भारतातील या लसीच्या चाचण्या चालूच होत्या, पण नुकताच भारतातील संशोधन स्थगित करा असा सांगण्यात आल असल्याची माहिती मिळत आहे.

हे सर्व होतच राहिल, परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, कोरोना विरुद्धच्या लसीची आपण अगदी चातकासारखी वाट बघत असलो तरी, ती आपल्यापर्यंत पोहचण्याची वाट खूप बिकट आहे. लस येईल तेव्हा येईल, परंतु तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. वेळोवेळी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे, अनावश्यक बाहेर न पडणे, घरातील लहान व वृद्ध तसेच आधीपासून आजार असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे. सरकारी नियमांचे पालन करणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी योग्य पार पाडणे.

लसीची सुरक्षिता अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे. यासाठी कदाचित वेळ लागू शकतो. कोणत्याही मानवी चाचणीच्या टप्यासोबत तडजोड करणे हे सर्व जगासाठी घातक ठरू शकते.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.