आर. आर. पाटील जाऊन आज सात वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे, मात्र महाराष्ट्र आबांचे काम अजूनही विसरला नाही. गृहमंत्री असताना आबांनी केलेले काम सर्वांच्या लक्षात आहे. गावा गावात तंटा मुक्त योजना आबांनी राबवली. ग्रामविकास मंत्री असताना आबांनी महाराष्ट्राभर ‘संत गाडगे बाबा स्वछता अभियान’ राबवले त्याची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली गेली. आबांचे कर्तृत्व महाराष्ट्राने अनुभवले आहे. आबा १९९९ ला काँग्रेस राष्ट्रवादी सरकार मध्ये पहिल्यांदा मंत्री झाले. पण त्याआधी विरोधी पक्षामध्ये असताना आर. आर. आबांच्या विधिमंडळातल्या भाषणामुळे त्यांची आमदारकी जाऊ शकत होती मात्र शरद पवारांच्या एका सल्याने आमदारकी वाचली.
काय झाला होता विधिमंडळामध्ये किस्सा ?
१९९५ ला महाराष्ट्रात शिवसेना भाजपचे सरकार आले होते. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच काँग्रेस शिवाय सरकार आले होते. शिवसेना भाजप सरकार नवखे होते त्यामुळे अनुभवी काँग्रेस नेत्यांकडून युती सरकारवर सडकून टीका होत असे..आर. आर. आबा पण त्या नेत्यांमध्ये सामील होते. ‘तासगाव’ मतदार संघातून आर. आर. आबा दुसऱ्यांदा आमदार झाले होते. आपल्या भाषणाने आर. आर. आबांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते. तर झाले असे, विधी मंडळाचे अधिवेशन चालू होते आर. आर. आबा भाषण देते होते. युती सरकारच्या चुकांवर आबा सडकून टीका करत होते. भाषण करताना आर. आर. आबांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. आबांनी मुख्यमंत्री टार्गेट केले होते. विधिमंडळामध्ये गदारोळ माजला होता.
शरद पवारांचा एक सल्ला आणि आमदारकी वाचली
आर. आर. आबांचे भाषण शरद पवार यांनी ऐकले होते. आबांनी केलेल्या आरोपांची गंभीरता शरद पवार यांच्या लक्षात आली होती. आर. आर. आबा भाषण करत असताना शरद पवार विधिमंडळामध्ये त्यांच्या केबिन मध्ये होते. शरद पवारांनी आर. आर. आबांना बोलावून घेतले आणि विचारले, ‘तुम्ही जे ‘मनोहर जोशींवर आरोप केले आहेत त्याचे पुरावे तुमच्या कडे आहेत का ? शरद पवारांच्या प्रश्नाने आर. आर. आबा अचंबित झाले होते. आर. आर. आबांनी उत्तर दिले कि ‘साहेब याचे पुरावे माझ्या कडे नाहीत पण विधिमंडळामध्ये जर आरोप केले तर त्याला कोर्टामध्ये मध्ये आव्हान दिले जाऊ शकत नाही त्यामुळे मी आरोप केले असल्याचं आर. आर. आबांनी शरद पवारांना सांगितले.’
आर. आर. आबांनी केलेल्या आरोपांची गंभीरता शरद पवारांनी आबांना समजून सांगितली.
तुम्ही केलेले आरोप बिनबुडाचे असल्यामुळे मुख्यमंत्री तुमच्या विरोधात विशेष प्रस्ताव (प्रिव्हिलेज मोशन )आणू शकते. आणि जर तुम्ही उत्तर नाही दिऊ शकला तर विधिमंडळाचा अध्यक्ष तुम्हाला आमदार पदावरून बरखास्त करू शकतो.
शरद पवारांनी आर. आर. आबांना एक सल्ला दिला कि ‘आता विधिमंडळमध्ये गेल्यावर भाषणामध्ये सुधारणा करा. ‘मनोहर जोशींवर केलेल्या आरॊपांची विधिमंडळाबाहेर लोकांमध्ये चर्चा आहे असे त्यात टाका. आणि आर. आर. आबांनी त्यांच्या भाषणात सुधारणा केली.
युती सरकारने आणला होता प्रिव्हिलेज मोशन
आर. आर. आबांनी केलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे होते. केलेले आरोप बदनामी करणारे असल्यामुळे आबांच्या विरोधात प्रिव्हिलेज मोशन आणले. पण विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी आबांच्या विरोधात आपण कारवाई करू शकणार नाही असे सरकारला कळवले. कारण आबांनी त्यांच्या भाषणात सुधारणा केली होती. केलेल्या आरोपांची बाहेर चर्चा असल्याचं एक वाक्य वाढवलं होतं.
शरद पवारांनी वेळीच आर. आर. आबांना भाषणात सुधारणा करण्याचा सल्ला दिला आणि विधिमंडळात आबांच्या विरोधात प्रिव्हिलेज प्रस्ताव पास होऊ शकला नाही. शरद पवारांच्या एका सल्ल्याने आर. आर. आबांची आमदारकी वाचली ती अशी.
हे खास आपल्यासाठी
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
संघाच्या शाखांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी १० हजार तिरंगा शाखा काढणार