सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

हिंदू आणि हिंदुत्वाचा वाद काय आहे ?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल राजस्थान मध्ये बोलताना हिंदू आणि हिंदुत्वावर भाष्य केले. राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिदुत्वामधील फरक समजून सांगताना राहुल म्हणाले, ” महात्मा गांधी हिंदू आहेत तर नथुराम गोडसे हिंदुत्वादी. हा देश हिंदूंचा आहे नाकी हिंदुत्वादी लोकांचा. सत्ताधारी भाजप हा हिंदू नसून हिंदुत्वादी आहे.” हिंदू आणि हिंदुत्वचा वाद नवा नाही, नेहमी निवडणूक जवळ आली कि हा वाद कोणी ना कोणी उकरून काढतं. त्यामुळे हा हिंदू आणि हिंदुत्वाचा वाद नेमका आहे काय समजून घेणे गरजेचे आहे.

कोण आहेत हिंदुत्वादी ?(What is hindutva ideology)

हिंदुत्वादी एक विचारधारा आहे. स्वातंत्रवीर सावरकरांनी पहिल्यांदा हिंदुत्व शब्दाचा वापर केला. सावरकरांच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातनी संस्थांनी तो विचार पुढे नेण्याचे काम केले. हिंदुत्व दोन शब्दापासून बनले आहे. हिंदू आणि तत्त्व, हिंदू धर्माचे तत्व असा साधारण अर्थ हिंदुत्वाचा होतो. हिंदू धर्माच्या प्रवासात हिंदू धर्माने खूप बदल केले आहे किंवा ते झाले आहेत. हिंदू धर्म जो होता तो आता राहिला नाही.त्यामुळे खरा आणि सनातनी हिंदू धर्म परत करण्यासाठी काम करणे, भारत हा हिंदू लोकांचा देश आहे त्यामुळे हिंदू सोडून इतर धर्माचे लोक भारताचे खरे नागरिक होऊ शकणार नाहीत अशी हिंदुत्वाची विचारधारा आहे. हिंदुत्वादी लोक हिंदुत्वाच्या नावाखाली हिंसा करतात म्हणून त्यांच्यावर बंदी घालावी यासाठी काही संस्था सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या. हिंदुत्व ही विचार धारा नसून तो एक जगण्याचा मार्ग असल्याचं मत न्यायधीशांनी नोंदवलं आहे. भाजपचे नेते नेहमी हिंद्त्वावर भाष्य करतात त्यामुळे हिंदुत्व नेहमीच चर्चेत असत.

काँग्रेसला हिंदुत्वाशी काय आहे प्रॉब्लेम ?

राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते नेहमीच हिंदुत्वावर टीका करतात. हिंदुत्व देशाला तोडणारे आहे. हिंदुत्व देशातल्या नागरिकांमध्ये भेदभाव करते. देशातल्या अल्पसंख्याक लोकांना हिंदुत्व पासून धोका आहे. हिंदू धर्म शांती प्रिय आहे हिंदुत्व मात्र हिंसेला प्रोत्सहन देते इत्यादी आरोप काँग्रेस नेते करतात. काँग्रेसची विचारधारा सर्वधर्म समावेशक आहे. महात्मा गांधी यांची विचारधारा घेऊन वाटचाल करत आहे. भारत हा कुठल्याही एका धर्माचा देश नाही ह्यावर काँग्रेस विश्वास ठेवते. हिंदू मुस्लिम, शीख, इसाई हे सर्वच भारत मातेची लेकरे आहेत अशी काँग्रेसची विचारधारा असल्याचा दावा राहुल गांधी आणि काँग्रेस नेते करतात. भाजपाची हिंद्त्वाची विचारधारा काँग्रेस मानणाऱ्या विचारांपासून विरुद्ध दिशेची आहे. त्यामुळेच काँग्रेस नेहमी हिंदुत्वावर टीका करते.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.