सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

सरदार उधम सिंग – वीस वर्षानंतर त्याला मारून बदला घेतला.

ऍमेझॉन प्राईम ह्या प्लॅटफॉर्म ने स्वतंत्र सेनानी, ‘शहीद ए आझम ‘ सरदार उधम सिंग ” यांच्या जीवनावर चित्रपट बनवला आहे. दिग्दर्शक सुजित सरकार ने बनवलेला सरदार उधम हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे. भारत सरकरतर्फे ‘सरदार उधम’ हा ऑस्कर पुरस्कारासाठी पण पाठवला आहे. या निमित्ताने का होईना पण सरदार उधम सिंग यांचे वास्तविक कार्य आणि जीवनप्रवास समजून घेणे गरजेचे आहे.

कोण होते सरदार उधम सिंग ?

स्वतंत्र सेनानी, शहीद सरदार उधम सिंग यांचा जन्म २६ डिसेंबर १८९९ मध्ये आजच्या पंजाब मधील सिंगूर ह्या जिल्ह्यात झाला. सरदार उधम सिंग लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते आणि नंतर काही काळानंतर त्यांच्या वडीलांच देखील निधन झालं. आई वडिलांचं निधनांनंतर सरदार उधम सिंग हे अमृतसर मधील अनाथ आश्रमात राहायला लागले. उधम सिंग ज्या अनाथ आश्रमात राहायचे ते जलियानवाला बागेच्या जवळच होते. १९१८ पर्यंत सामान्यपणे जीवन जगणारे उधम सिंग यांनी १९१८ मध्ये मॅट्रिक पास केली होती. यांनतर तत्कालीन भारतीय सैन्यात भरती झाले होते. सध्याच्या इराक मध्ये त्यांनी आपली सेवा बजावली होती. १९१९ मात्र नंतर सरदर उधम सिंग यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. १९१९ मध्ये अमृतसर मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाले आणि उधम सिंग यांचे आयुष्य बदलले. जनरल डायरच्या आदेशाने इंग्रज सैनिकांनी जालियनवाला बागेत शांततेत आंदोलन करणाऱ्या भारतीयांवर गोळीबार केला त्यात महिला, मुले आणि एकूण सोळाशे लोक मारले गेले. जालियनवाला हत्याकांडाच्या दिवशी सरदार उधम सिंग हे त्या ठिकाणी उपस्थित होते. जखमी लोकांना मदत करत होते. जालियनवाला बाग अमानुष हत्याकांडामुळे उधम सिंग यांना इंग्रज शासन भारतीय लोकांवर अत्याचार करत असल्याची तीव्रतेने जाणीव झाली.

जेल मध्ये भगत सिंगची भेट.

जालियनवाला बाग हत्याकांडनंतर उधम सिंग हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामिल झाले आणि त्यांनी आपल्या मार्गाने लढायला सुरुवात केली. सरदार उधम सिंग हे भारताबाहेर जाऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करत होते. उधम सिंग ह्यांनी युरोप, आशिया आणि अमेरिका खंडामध्ये जाऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. रशिया मध्ये जाऊन रशियन सरकारची मदत घेतली. ज्या पद्धतीने रशिया मध्ये लेलीनने कामगारांना सोबत घेऊन क्रांती केली त्या पद्धतीने भारतामध्ये करता येईल का याची चाचपणी करत होते. भारताबाहेर चालणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये ते सहभाग घेत असत. १९२० ला भारत सोडलेले उधम सिंग हे १९२६-१९२७ ला भारतात परतले; परंतू इंग्रज सरकार ने त्यांना अटक करून ५ वर्षाची शिक्षा दिली. सरदार उधम हे जेल मध्येच शहीद भगत सिंग यांना भेटले आणि उधम सिंग याच्या कार्याला दिशा मिळाली.

शहीद भगत सिंग याच्या भेटी नंतर

सरदार उधम सिंग हे भगत सिंग यांच्या पेक्षा अनुभवी होते. उधम सिंग हे अगोदर पासूनच स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते, पण भगत सिंग हे राष्ट्रीय राजकारणात मोठे नेते झाले होते. भगत सिंगांचे विचार हे भारतीय राजकारणाला नवी दिशा देत होते. भगत सिंग यांनी निवडलेला मार्ग सरदार उधम सिंग यांनी अवलंबला. लाहोर केस मध्ये भगत सिंगांना फाशी दिल्यानंतर त्यांच्या HSRA (हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक एसोसिएशन ) या संघटनेसाठी उधम सिंग यांनी काम करायला सुरवात केली. सोबतच त्यानी गदर संघटनेमध्ये देखील काम सुरु केले. रशिया, जर्मनी, नंतर उधम सिंग इंग्लंडला गेले आणि इथूनच सुरु झाली त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची कामगिरी.

भारतीय लोकांची संघटना बांधून लंडनमधे भारतीय स्वातंत्र्याचा लढा

उधम सिंग यांनी भारतातील शिक्षा संपल्यानंतर १९३१ मध्ये ते लंडनला गेले. ब्रिटिश सरकारची सतत उधम सिंग यांच्यावर नजर होती त्यामुळे त्यांनी वेगवेगळी नावे धारण केली. शेर सिंग हे खर नाव बदलून त्यांनी उधम सिंग हे नाव घेतले. उधम सिंग ही ओळख घेऊन ते जर्मनी मार्गे लंडनला गेले. उधम सिंग लंडनमध्ये आल्यावर भारतीय लोकांची संघटना बांधून त्यांनी लंडनमधे भारतीय स्वातंत्र्याचा लढा उभा केला. संघटना बांधून भारतीय लढ्याला बळकटी देणे चालू असताना सरदार उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये दोषी असलेले त्या वेळेचे पंजाब गव्हर्नर डायरला संपवण्याचा इरादा केला. लंडनच्या कॉक्सटॉन हॉल मध्ये ज्या वेळेस गव्हर्नर डायर भाषण देण्यासाठी उभा राहिला त्या वेळेस सरदार उधम सिंगांनी डायरला गोळी घालून संपवले. गव्हर्नर डायरला गोळ्या घातल्यावर सरदार उधम सिंग यांनी स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि लंडन सरकारच्या शिक्षेला सामोरे गेले. सरदार उधम सिंग यांनी २० वर्षांनंतर जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला आणि भारतीय क्रांतिकारी चळवळीला प्रोत्साहन दिले.

१९७४ मध्ये भारत सरकार ने ‘शाहिद ए आझम’ सरदार उधम सिंग यांच्या अस्ति लंडन वरून भारतात आणल्या. सतलज नदी मध्ये त्यांच्या अस्ति विसर्जित केल्या गेल्या. भारत मातेच्या या महान पुत्राचा शेवट खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारतात झाला.

–विष्णू बदाले

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.