सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

इंटरनेटचे अल्गोरिथम काय असते ?

आता भारतामध्ये जवळ जवळ ६० % लोक इंटरनेट वापरतात. प्रत्येक जण इंटरनेटचा वापर करत आहे. रस्ता शोधण्यापासून तर सल्ले घेण्यापर्यंत इंटरनेटचा वापर वाढला आहे. इंटरनेट आज मूलभूत गरज बनली आहे. ज्या प्रमाणात इंटरनेटचे वापर करणारे वाढले आहेत त्या प्रमाणात इंटरनेट साक्षरता वाढली नाही. आजही खूप लोकांना इंटरनेटच्या साईट्स अल्गोरिथम नुसार काम करतात ह्या बदल माहिती असण्याची शक्यता कमी आहे. अल्गोरिथम बद्दल माहिती असणे इंटरनेट वापर करणाऱ्या सर्वाना माहिती असायला हवे.

सगळा अल्गोरिथमचा खेळ आहे !

गूगलवर एखादी गोष्ट शोधली आणि नंतर तशाच जाहिराती दिसायला लागतात हे गूगल वापरकर्त्यांना माहित असेल कदाचित. पण अल्गोरिथम हा एवढ्या पुरता मर्यादित नाही. अल्गोरिथम जरी मशिन्स सारखा काम करतो पण त्याचा परिणाम मशीन नसलेल्या घटकांवर म्हणजे तुमच्या माझ्यावर होता असतो. अल्गोरिथम हा काही फक्त तुमच्या सर्च हिस्टरी वरून डेटा घेत नाही. मोबाईल वापरणारा कितीही बोलला कि तो फेसबुक, व्हाट्स अँप वापरत नाही तरी सुद्धा तुमच्या आवडी निवडी अल्गोरिथम शोधून काढतो. काही लोकांचं तर इथपर्यन्त म्हणणं आहे कि तुम्ही काय बोलता हे सुद्धा सगळं ऐकलं जातं आणि त्यावरून तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात. पुन्हा एक गोष्ट समजून घ्या जाहिराती दाखवणे हा एक भाग झाला. तुम्ही जाहिराती कधी जास्त बघताल जेव्हा तुम्ही कन्टेन्ट जास्तीत जास्त उत्सुकतेने पाहतात. तुमची उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला असाच कन्टेन्ट दिला पाहिजे जो जास्त वेळ खिळून ठेवेल. इंस्टाग्राम रील्स पाहणाऱ्यांना विचारून बघा दिवसाचे किती तास रील्स बघतो. त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही त्याने किती वेळ घालवला. कारण रील्स पाहताना दोन रील्स मध्ये त्याला विचार करायचं समजत सुद्धा नाही. काही जण तर ठरवून १० मिनिट रील्स बघणार बोलतात आणि कधी एक दिड तास घालवतात कळत सुद्धा नाही. हे सगळं असच होत नाही. अल्गोरिथम मशिन्स असला तरी तो तुमची मानसिकता काय आहे त्यानुसार तुमच्या समोर तसंच जग उभा करतोय. अल्गोरिथमचा हेतू आहे कि तुम्ही जास्त काळ इंटरनेट वर वेळ घालवावा यासाठी तो तुम्हाला जास्तीत जास्त कसं खिळवून ठेवेल असे व्हिडिओ किंवा फोटो तुमच्या समोर येत राहतात. हा दिसतो तेवढा सोपा खेळ नाही.

अल्गोरिथम वर तज्ज्ञांचे आक्षेप काय आहेत ?

ज्या पद्धतीने अल्गोरिथमचा वापर इंटरनेटवर जाहिराती करण्यासाठी आणि इंटरनेट वापरकर्त्याला जास्त वेळ इंटरनेट वर ठेवण्यासाठी केला जात आहे, त्यावर अनेक तज्ज्ञांनी आक्षेप घेतले आहेत. अल्गोरिथमच्या कार्यपद्धतीमुळे मानवी स्वभावावर परिणाम होऊ शकतो असे आरोप केले जात आहेत. आक्षेप घेणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे कि अल्गोरिथम इंटरनेट वापर करणाऱ्याला विचार करण्याची संधीच देत नाही. मानवी विचार करण्याची क्षमता अल्गोरिथम कमी करत आहे. शिवाय अल्गोरिथम हा तुम्हाला एकांगी विचार करण्याची सवय लावतो कारण अल्गोरिथम कोणत्याही गोष्टीची एकसारखीच बाजू समोर आणतो.
सोबतच अल्गोरिथमचा वापर करून इंटरनेट वापर करणाऱ्यांचा डेटा साठवला जातो आहे आणि तो जाहिराती करण्यासाठी तर वापरला जातोच पण त्यामुळे वापरकर्त्याच्या खाजगी अधिकारांवर गदा येते.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.