सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

क्लिओपात्रा – इजिप्त मधील एका साम्राज्याच्या धेय्यवादी साम्राज्ञीची गोष्ट

“ब्रुटस यु टू” नटसम्राट मध्ये नाना पाटेकर त्यांच्या बाजूला असलेल्या नवोदित नटाला बघून रंगमंचावर जीव सोडून देतात. चित्रपटात शेवटच्या दहा मिनिटात नाना पाटेकर ज्युलियस सीझर, अथेल्लो, ब्रुटस अशी नावे घेतात. ही नावे कदाचित काही लोकांच्या परिचयाची असतील. पण यातला ब्रुटस यु टू हा डायलॉग हे फक्त तीन शब्द नाहीत. तर या वाक्यत मोठा विश्वास घात आणि मैत्रीचा अंत लपला आहे. हे वाक्य इतिहास विचार करायला लावतं. अनेक लेखकांनी या वाक्याला धरून जगातील उत्तम साहित्य लिहिलं. इतकी ही घटना चित्तवेधक आणि मनोरंजक आहे.

ब्रुटस आणि सीझर हे दोन खास मित्र रोम मधील दोन हजार वर्षांपूर्वीच्या लोकशाही व्यवस्थेतले दोन नेते.

ब्रुटस हा कट्टर लोकशाहीचा समर्थक. तर सीझर हा स्वतः हुकूमशहा बनू पाहणारा एक महत्त्वकांक्षी नेता. असे दोन भिन्न विचार असणारे हे दोघेही रोमच्या संसदेचे प्रतिनिधी होते. सीझर त्याच्या सहकार्याच्या मदतीने रोमच्या आसपासचे प्रदेश जिंकून घेत होता. पण त्याची ही महत्त्वकांक्षा रोमची संसद बरखास्त करून हुकूमशहा होण्यापर्यंत जाणार होती. रोमच्या आसपासच्या देशामंध्ये पण असाच सत्तासंघर्ष चालू होता. पण रोमसारखी इजिप्त, सीरिया इथं लोकशाही नव्हती. इजिप्त मध्ये क्लिओपात्रा ही इजिप्तची सम्राज्ञी होण्यासाठी धरपड करत असताना तिचा बाप मेल्यानंतर तिचा सावत्र भाऊ टॉलेमी हा गादीवर बसतो.

क्लिओपात्रा सीरियाला पळून जाते

टॉलेमी तिला मारायचा प्रयत्न करत असतो. तिथून क्लिओपात्रा सीरियाला पळून जाते. तिथे अर्थेनन तिच्या प्रेमात पडतो. पण क्लिओपात्राला प्रेमावर विश्वास नसतो. तिच्या सौंदर्याला भुललेल्या प्रत्येकाचा वापर करत ती इजिप्त मिळवण्याचा प्रयत्न करत राहते. दरम्यान सीझरचा रोममधीलच प्रतिस्पर्धी याला पण ती भुरळ टाकते. पण तो टॉलेमीकडून मारला जातो. अशा वेळी एकच माणूस उरतो जो तिला इजिप्त मिळवून देऊन शकतो, तो म्हणजे ज्युलियस सीझर. सीझर पेक्षा पंधरा वीस वर्षांनी लहान असणारी क्लिओपात्रा मुसद्दी धोरणाने सगळयांना कामाला लावते. सीझर तिच्यासाठी इजिप्त जिंकतो. टॉलेमी मारला जातो. क्लिओपात्रा इजिप्तची सम्राज्ञी बनते. पण सीझरच्या बोलण्यातून तिच्यावर हा उपकार आहे, असं तिला वाटायला लागत.

क्लिओपात्रा एक आत्मकेंद्री स्त्री होती

तिला कुणाचेही वर्चस्व मान्य नाही. म्हणून ती सीझरलाच संपवण्याचा प्लॅन करते. यासाठी ती ब्रुटसला हे पटवून देते कि सीझर मेला तरच रोमची लोकशाही वाचेल. ब्रुटसची लोकशाहीवर निष्ठा असल्याने त्याची इच्छा नसताना तो सीझरला मारायला तयार होतो. रोमच्या संसदेतले अजून काही सहकारी या कटात सामील होतात. संसदेत ब्रुटस सीझरच्या पाठीत सुरा खुपसतो. सीझरसाठी ब्रुटसचा हा हल्ला फार मोठा धक्का होता. सीझरने आजवर हजारो शत्रुंना रणांगणात शिरकाण केलं होतं.

सीझर समोर प्रत्येक शत्रू शुल्लक होता

पण जिवलग ब्रुटसचा हा वार इतका विश्वासघातकी होता कि सीझरला आत्मघात झाल्यासारखा वाटला. म्हणून सीझर जीव सोडताना ब्रुटस कडे खिन्न आणि हताश नजरेने बघून “ब्रुटस यु टू” म्हणजेच “ब्रुटस तू सुद्धा” बोलतो. हाच संदर्भ नटसम्राटमध्ये नाना पाटेकर यांनी साकारलेला नट स्वतःला सीझर म्हणतो कारण सीझर प्रमाणे गणपत रामचंद्र बेळवलकर या पात्राला जवळचे लोक विश्वासघात करतात. सीझर मारला जातो इथं रोम आणि इजिप्तांची कहाणी संपत नाही. क्लिओपात्रावर जीवापाड प्रेम करणारा अर्थेनन शेवटी मानसिक संतुलन हरवून बसतो. क्लिओपात्रा सत्तेसाठी सीझरला निवडते. अर्थेननला हे सहन होत नाही तो आत्महत्या करतो.

सीझरच्या मृत्यनंतर क्लिओपात्राला त्याच्यासारख्या बलशाली आणि लढाऊ माणसाची गरज भासते

यावेळेस ती सीझरच्या विश्वासू सेनापती अँटनी याला गळ घालते. अँटनी तिच्या प्रेमात वेडा होतो. क्लिओपात्रा सोबतच्या रात्रींना तो आपलं जग मानतो. सगळं सोडून तो क्लिओपात्रासोबत राहायला लागतो. अँटनी सारखा शूर सेनापती असूनही क्लिओपात्राला इजिप्त टिकवण्याची भीती कायम राहते. कारण ज्युलियस सीझरचा भाचा ऑक्टव्हिस सीझर हा सीझरचा वारस म्हणून पुढे येतो. ज्युलियस सीझरचा बदला घेण्यासाठी तयारीने क्लिओपात्राच्या दिशेने सरकत असतो. पुढे ऑक्टव्हिस आणि सीझर यांच्यात काय होतं. ऑक्टव्हिस जिंकतो की क्लीओपात्रा किंवा आणखी काही वेगळं वळण मिळत का यासाठी संजय सोनावणी यांची क्लिओपात्रा ही कादंबरी नक्की वाचा.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.