Man’s Search for Meaning ( अर्थाच्या शोधात – डॉ. विजया बापट )
जिथं जगायला नाही तर फक्त मरायला वेगवेगळे पर्याय दिले जातात आणि त्यातूनच जगण्याचा अर्थ शोधणे म्हणजे हे पुस्तक.
हिटलरच्या छळ छावणीतील कमजोर कैद्यांना गॅस चेम्बर मध्ये कोंडून मारलं जायचं. जे कैदी बळकट दिसतील त्यांना कामावर जुंपलं जायचं. गॅस चेम्बर पासून ज्यांचं मरण टळलं, त्यांचं जगणं मरणापेक्षा भयंकर होतं. पहाटे पासून या कैद्यांना कामावर लावलं जायचं.
कर्कश आवाजात आदेश देऊन सतत धाकात ठेवणारे आसपास शिपाई. सहा महिने अंगावर एकच पोशाख. फाटलेले बूट. काम करताना त्यात बर्फ साचून साचून बधीर झालेली पायाची बोटे. एवढ्या कष्टातून तग धरण्याची धरपड कशी बशी चालू असताना हातावर मोजून ठेवलेले ब्रेडचे तुकडे.
कॅम्प मध्ये कैदयांना सोडून देणार या बातम्या यायच्या सगळे आशा लावून त्या वेळेची वाट बघायचे पण ती वेळ आली नाही कि एकदम जगायची आशा सोडून द्यायचे. मग कैदी खाणं-पिणं त्याग करायचे आणि सिगारेटच्या झुरक्याबरोबर आयुष्य संपवण्याच्या जवळ जायचे. अशा वातावरणात मनात येणारे विचार, स्वप्ने हा वास्तविक अनुभव आणि विश्लेषण या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे. .
Man’s Search for Meaning, – Viktor K Frankl ( अर्थाच्या शोधात – डॉ. विजया बापट ) यांनी लिहिलेलं हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं तेव्हा त्यांनी त्यांच नाव जाहीर केलं नव्हतं. Auschwitz concentration camp मधल्या या आठवणी भीतीदायक होत्या. युद्धानंतर सुटलेले अनेक कैदी नंतर सर्व सामान्यांसारखे आयुष्य जगू शकले नाही.
Concentration कॅम्प मधल्या घटनांचा परिणाम कायमचा आयुष्याला मानसिक असंतुलन देऊन गेला. कॅम्प मध्ये असतानाच आयुष्याला अर्थ उरला नाही, या जाणिवेतून कॅम्प मधेच कित्येकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
यातून जे वाचले त्यांना Concentration Camp च्या बाहेर पण आयष्याला अर्थ सापडेना. अशा अनेक कैद्यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. यातल्या काही लोकांच्या स्वभावात विचित्र बदल झाले.
लेखकाने मानवी आयुष्याचा अर्थ या प्रसंगांतून शोधायचा प्रयत्न केला आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरून हे फिलॉसॉफिकल काही तरी आहे हे लक्षात येतं. पण हि टिपिकल भाषण झाडणारी फिलॉसॉफी नाही.
वास्तविक मानसिक प्रक्रियांमधून जगण्याचा अर्थ मांडला आहे. कॅम्प मधील आयुष्य निराशदायक नक्कीच आहे. तरीही अशा परिस्थितीत सुद्धा आयुष्याचा अर्थ सापडू शकतो हे सांगणारं हे पुस्तक आहे.
आत्महत्या करावी वाटते, बोर होतंय हे प्रसंग कधी कधी ना बहुतेकांच्या आयुष्यात येतातच अशा वेळी Existential Vacuum तुम्हाला जाणवतोय का ?
म्हणजेच आयष्याचा अर्थ न सापडल्याने हा Vacuum निर्माण झालाय, याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल.
खिळवून ठेवणारी कथा वाटेल वाचताना, पण त्यापेक्षा आयुष्याला वेगळ्या नजरेने पाहणारी उत्तम साहित्यिक मूल्य देणारी वैचारिक ठेव म्हणजे हे पुस्तक.
हे खास आपल्यासाठी
‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ : संघर्ष करणाऱ्या सर्वानी वाचावे असे…
सचिन वाझे प्रकरणात शरद पवार ज्युलिओ रिबेइरो या अधिकाऱ्यामार्फत तपास करा असं का म्हणाले?
मुंबईच सुखाचं आयुष्य सोडून बिहारच्या खेड्यात या डॉक्टरने गरिबांची सेवा केली.