सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

विषय गंभीर आहे पण ‘थर्सडे’ मांडणीत गंडल्याची फीलिंग येते.

‘थर्सडे’ ची सुरुवात एकदम कूल होते. ‘नैना’ म्हणजे ‘यामी गौतम’ मेडिएशन वरून घरी आलेली असते. नैना खूप दिवसांनी आल्यामुळे तिचा होणारा नवरा तिच्या वाढदिवसाच्या आधी एक दिवस वाढदिवस साजरा करण्याची प्लॅनिंग करतं असतो. संध्याकाळी ऑफिस मधून आल्यावर वाढदिवसाचं प्लॅनिंग ठरत. नैनाचा होणार नवरा ऑफिसला जातो, नैना तिच्या घर शाळेत जाते. शिकण्यासाठी मुले आलेली असतात. चित्रपट थोडा शांत झाल्याचं वाटू लागतातच ‘नैना’ एकदम चित्रपट फिरवते. कुलाबा पोलिसांना फोन करून नैना सांगते, ” मी नैना बोलतेय मी बारा मुलांना बंदी केलं आहे” आणि तिथूनच चित्रपट गती घेतो.

जस हि पोलिसांना कळतं कि नैनाने मुलांना बंदी केलं आहे. पोलीस तिच्या घराकडे येतात. तिथेच एन्ट्री होते जावेद खान म्हणजे अतुल कुलकर्णी आणि कॅथर्वेने म्हणजेच नेहा धुपियाची. हे दोघेही पोलीस वाले असतात. जस सगळ्या चित्रपटांमध्ये होत अगदी तसेच नैना आणि जावेद खान यांच्यात बोलण्या सुरु होतात . तुम्ही जर “मनी हेस्ट’ सिरीस बघितली असेल तर तुमच्या लक्षात येईल दिग्दर्शकाने मनी हेस्ट मधला पोलीस टेन्टचा सिन त्यातूनच उचलला आहे. नैनाच्या घराच्या बाहेर पोलीस टेन्ट बनवतात आणि तिथूनच नैना आणि त्यांच्यात बोलण्या होतात.

जावेद खान आणि नैना जैस्वाल यांच्यात बोलण्या होत असतात. माझ्यामागण्या पूर्ण नाही केल्या तर मी बंदी केलेल्या मुलांना मारून टाकील अशी धमकी नैना देत असते तर जावेद खान तिला समजावयाचा प्रयत्न करत असतो. हे बघताना कलाकारांनी ओव्हर ऍक्टिंग केली असल्याचं सहज लक्षात येत. नैना जैस्वाल पोलिसांना ५ कोटीचे मागणी करते, जावेद खान मुले तिच्या कडे असल्यामुळे पैसे द्यायला तयार असतो पण बाकी पोलीस वाले त्याच्या विरोधात जातात विशेष करून कॅथर्वेने विरोध करत असते. जावेद आणि कॅथर्वेने यांच्यात पण थोडा संघर्ष दाखवला आहे. दोघे पोलिसवाले आहेत पण त्यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याचं दाखवलं आहे.

पोलीस नैनाची ५ कोटीची मागणी मान्य करतात. नैनाला पैसे पाठवतात. ती पूर्ण झाली कि नैना देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याची अट ठेवते. पंतप्रधान नाही भेटल्या तर मुलांना मारण्याची धमकी देते. चित्रपट तिथून थोडा ड्रॅमॅटिक होतो. नैना आणि जावेद यांच्या वादावादी होते. पंतप्रधानांना भेटणं शक्य नसल्याचं जावेद खान सांगतो पण नैना ऐकायला तयार नसते. चित्रपट त्याच सिनच्या आसपास खूप वेळ फिरतो.

नैनाची मागणीची बातमी पंतप्रधानां पर्यंत जाते ज्यांचा रोल डिंपल कपाडियाने केला आहे. नैनाची मागणी ऐकून पीएम नैनाला भेटण्यासाठी तिच्या शाळेत जातात. पोलीस वाले नैनाची भेट न घेण्याचं सल्ला पीएमला देत असतात. पण मुलांचा जीव धोक्यात असल्यामुळे पीएम नैनाला भेटण्यासाठी जातात. चित्रपटाचा प्लॉट तिथून पुढे नैना आणि पीएम यांच्या आसपास फिरतो. नैना पीएमला बलात्कारा विषयी बोलते आणि बलात्कार विरोधी कायदा मजबूत करायला सांगते. पीएम आधी नाही म्हणून नंतर तयार होते. नंतर नैना तिच्या स्वतःच्या अनुभवावर येते आणि चित्रपट संपतो.

बलात्कार्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे हा चित्रपटाचा विषय आहे. विषय एकदम गंभीर आहे. नैना जैस्वाल म्हणजे यामी गौतमने अभिनय पण दमदार केला आहे. पण बाकीचे कलाकार अतुल कुलकर्णी , नेहा धुपिया , डिंपल कपाडिया यांचा अभिनय आवश्यकते पेक्षा जास्त आहे. त्याला इंग्लिश मध्ये आपण ओव्हर ऍक्टिंग म्हणतो. चित्रपट आणखी वास्तववादी बनवला असता तर ‘थर्सडे’ भरपूर लोकांना आवडला असता. दिग्दर्शक खंबाटा यांच्या कडे अतुल कुलकर्णी , डिम्पल कपाडिया यांचे सारखे जुने आणि अनुभवी कलाकार असून देखील त्यांच्या कडून हवे तसे काम करून घेता आले नाही.

मराठी मिरर देत ‘थर्सडे’ ला पाच पैकी तीन स्टार . एक स्टार यामी गौतमच्या ऍक्टिंग साठी , एक स्टार बलात्कारसारखा विषय हाताळला यासाठी आणि एक स्टार शेवट्पर्यंत सस्पेन्स ठेवला यासाठी. ‘थर्सडे’ एक वेळ पाहण्यासारखा आहे. हॉटस्टारवर ‘थर्सडे’ उपलब्द आहे. चित्रपट बघितल्यावर कंमेंट करून सागा तुम्हाला कसा वाटला ‘थर्सडे’.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.