सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

अमिताभ, अमीर खान यांनी अमरावतीच्या या अभिनेत्याची कॉपी केली.

नेटफ्लिक्स वर लुडो चित्रपट रिलीज झाला, आणि सगळ्यांच्या स्टेटस वर भगवान दादाच गाणं दिसायला लागलं. भगवान दादा कोण आहेत यावर मात्र फार चर्चा झाली नाही. भगवान दादाच्या शेवटच्या काळात जशी त्यांच्या सहकाऱ्यांनी साथ सोडली तसंच आज प्रेक्षक पण दादाला विसरले. भगवान दादाचा जन्म महाराष्ट्रातला तेही अमरावती मधला आहे. ‘भगवान आभाजी पालव’ हे भगवान दादाचं मूळ नाव. वडील गिरणी कामगार असल्याने दादा मुंबईला आले. गरिबी असल्याने दादाने लहान वयातच गिरणी कामगार म्हणून काम सुरु केले. पण दादाला फिल्म इंडस्ट्री खुणावत राहिली. भगवान दादा अभिनेता म्हणून नावारूपाला आले.

गिरणी कामगाराचा मुलगा कधी बॉलीवूडचा सुपरस्टार झाला लोकांच्या लक्षात पण आलं नाही. दादाने काही दिवसातच दिग्दर्शन आणि इतर चित्रपट निर्मितीच्या गोष्टी शिकून घेतल्या. कमी बजेट मध्ये एक्शन चित्रपट तयार करण्यात दादाच नाव पुढं आलं. कामगार वर्गामध्ये दादाचे हे चित्रपट चांगलेच चालले. भगवान दादाचा १९५१ ला आलेला अलबेला सुपरहिट झाला. दादरच्या एका चाळीत राहणारा २५ खोल्यांच्या घरात राहायला लागला. दादांनी जुहूला समुद्रकिनारी अनेक बंगले विकत घेतले. महागड्या गाड्यांची रीघ लागली. भगवान दादाची श्रीमंती काही दिवसातच नजरेसमोर आली. आणि दुर्दैवाने तेवढ्याच गतीने त्याला नजर पण लागली.

अलबेला नंतर भगवान दादाचे चित्रपट फारसे चालले नाही. एक वेळ अशी आली कि दादा मिळेल ते काम करायला लागले. दादाने शेवटी किशोर कुमार सोबत एक चित्रपट बनवायला सुरवात केली. हा चित्रपट कधीच रिलीज झाला नाही पण भगवान दादाने यासाठी सगळी संपत्ती दाव्याला लावली होती.

भगवान दादावर इतकी वाईट वेळ आली कि भगवान दादाला पुन्हा आपल्या चाळीतल्या घरात राहायला जावं लागलं. त्यावेळच्या सुपरस्टार नटांनी भगवान दादाला कोणी मदत केली नाही. काही अपवाद वगळता भगवान दादाकडे कोणी भेटायला सुद्धा गेले नाहीत. भगवान दादाला जुगार आणि दारूचं व्यसन आधीपासूनच होतं. पण या काळात दादा व्यसनाच्या जास्त आहारी गेले.

गरिबीच्या दारातून सुरु झालेलं आयुष्य श्रीमंतीच्या मार्गातून पुन्हा गरिबीपाशी विसावलं.

भगवान दादाने फिल्म इंडस्ट्रीला खूप काही दिलं. आज अमिताभ बच्चनचा डान्स बघा किंवा अमीर खानची एखादी style बघा तुम्हाला लगेच भगवान दादा दिसेल. त्यावेळेला कित्येक नटांना भगवान दादाच उदाहरण देऊन डान्स आणि अभिनय शिकायला सांगितलं जायचं.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.