मिम्स मटेरियल म्हणून सर्वाधिक कोणता चेहरा वापरला असेल तर हाच ! मिम्स या आधी पण येत होतेच पण या चेहऱ्यामुळे मिम्स खूप प्रभावीपणे सर्वदूर पोहचले. विशेष म्हणजे याचे मिम्स बनवणाऱ्याना पण हेचं वाटतं कि हा लहान मुलगा आहे. तसा याचा चेहरा पाहून कोणाला पण वाटेल कि हा १०-१२ वर्षाचा लहान मुलगाच आहे. पण हा लहान नाही. ओसीटा इहेमी हे त्याच खरं नाव आहे. २० फेब्रुवारी १९८६ ही त्याची जन्मतारीख आहे. यावरून लक्षात आलं असेलच का हि छोटू जवळपास ३५ वर्षाचा आहे. नायजेरियातील इमू राज्यातील एक लहानशा गावातील ओसीटा इहेमीचा जन्म आहे.
Pawpaw हे त्याला कायमचे नाव मिळाले.
ओसीटा इहेमी हा नायजेरियन चित्रपटात २००२ पासून काम करतोय. उंची लहान असल्याने सुरवातीपासून याला लहान मुलाच्या भूमिका भेटल्या. २००२ ला त्याचा पहिला चित्रपट आला होता. aki na ukwa हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात दोन भावांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट होता. तेव्हा दुसऱ्या एका वयाने लहान अभिनेत्यासोबत ओसीटा इहेमीने त्याच्या भावाची भूमिका केली होती. त्याची हि भूमिका नायजेरियन लोकांना खूप आवडली. Pawpaw हे त्याचं चित्रपटात नावं होतं. नायजेरियात त्याला याच नावाने सगळे ओळखू लागले. पुढे तो नायजेरियात चांगलाच प्रसिद्ध झाला. Pawpaw हे त्याला कायमचे नाव मिळाले. यानंतर ही त्याला बहुतेक चित्रपटात लहान मुलाच्याच विनोदी भूमिका मिळाल्या.
मिम्सच्या दुनियेत हा कधीपासून प्रसिद्ध झाला?
Pawpaw वर असणारे बहुतेक मिम्स त्याच्या २००२ च्या aki na ukwa याच चित्रपटातील दृशांवर आहेत. Pawpaw हा नायजेरियात तर प्रसिद्ध झालाच होता पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खऱ्या अर्थाने तो पोहचला ब्राझीलच्या ‘निकोल’ मुळे. निकोलने सुरवातीला Pawpaw चा एक चित्रपट पहिला. तिला तो खूप आवडला. यानंतर तिने त्याचे सगळे चित्रपट पहिले. तिला सगळेच चित्रपट मजेशीर वाटले. यांनतर तिने ट्विटरवर Pawpaw च्या चित्रपटातील दृशांवर आधारित लहान लहान व्हिडिओ टाकायला सुरवात केली. Pawpaw चं नशीब इथून पुढे खऱ्या अर्थाने एकदम पालटलं. त्याच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद यायला सुरवात झाली. त्याचे मिम्स एकमेकांना मोठ्या प्रमाणात पाठवण्यात आले. इथेच त्याची प्रसिद्धी थांबली नाही. त्याने यांनतर प्रसिद्धीचा मोठा टप्पा ओलांडला जेव्हा अमेरिकन गायिका रिहाना हिच्या कंपनीने Pawpaw चे मिम्स शेअर केले. त्यानंतर अजून काही अमेरिकन गायकांनी त्याचे मिम्स शेअर केले. एकदम प्रसिद्धीच्या झोतात Pawpaw आला. जागतिक स्तरावर त्याला ओळख मिळाली. या निमित्ताने नायजेरियन सिनेमा पण जगाच्या समोर आला.
Pawpaw म्हणजेच ओसीटा इहेमी याने आजवर ११० पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं आहे. २००७ मध्ये आफ्रिकेतील चित्रपट क्षेत्रातील जीवन गौरव पुस्र्कार त्याला मिळाला आहे. जागतिक पटलावर प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आलं आहे. Pawpaw च्या कामाची दखल नायजेरियन सरकारने सुद्धा घेतली म्हणून नायजेरियाचे अध्यक्ष गुडलक जोनाथन यांनी स्वतः त्याला सन्मानित केलं. अभिनयाबरोबरच त्याने प्रेरणादायी पुस्तक पण लिहिले आहे.
Pawpaw च्या प्रसिद्धीमुळे नायजेरियन सिनेमाला खूप अपेक्षा वाढल्या आहेत. जगभरातून नायजेरियन सिनेमाची दखल घेतली जाईल असा तिथल्या निर्मात्यांना विश्वास आहे. नेटफ्लिक्सने काही दिवसांपूर्वी मोठी रक्कम देऊन नायजेरियन सिनेमा विकत घेतला होता. नायजेरियन सिनेमे काय दर्जा प्रेक्षकांना देतील यावर त्या सिनेमाचे भविष्य अवलंबून आहे.
हे खास आपल्यासाठी
धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे का बघितला पाहिजे ?
जॉनी लिवरला वेळ नसायचा तेव्हा त्याचा डुप्लिकेट जॉनी निर्मल पिक्चर पूर्ण करायचा
फक्त बापालाच विश्वास होता त्याच्या मुली जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटू आहेत