या कारणामुळे कुली चित्रपटानंतर निळू फुलेंना एकही हिंदी चित्रपटात घेतलं नाही.
‘बाई वाड्यावर या’ या वाक्यावर मालकी हक्क असलेले निळू फुले माहित नाही असा एकही मराठी माणूस नाही. दुर्दैवाने निळू फुले लोकांना जे समजले ते चित्रपटात आहे तसेच लोकांनी त्यांची प्रतिमा रंगवली. चित्रपटा पलीकडचे निळू फुले पूर्णपणे वेगळे होते. निळू फुले अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर होते. वेळोवेळी त्यांची सामाजिक बांधिलकी त्याकाळातील अनेक लोकांनी पहिली आहे. अंधश्रद्ध निर्मूलनाच्या कामात त्यांची भूमिका अग्रेसर होती. सामाजिक कर्तव्य जसे महत्वाचे तसेच दिलेला शब्द पाळणे यासाठी देखील निळू फुले प्रसिद्ध होते. निळू फुलेंनी मराठी हिंदी चित्रपटात काम करताना मानधनाचा कधी फार विचार केला नाही. मैत्री खातर अनेक चित्रपट फुकट केले. निळे फुलेंच्या अशाच प्रामाणिकपणामुळे त्यांना नंतर हिंदी चित्रपटात काम मिळाले नाही.
राजकारण गेलं चुलीत
अमिताभ बच्चनच्या आयुष्यातील कूली हा एक नावाजलेला चित्रपट. हा चित्रपट तयार होत असताना अनेक अडचणी येत होत्या. शूटिंग दरम्यान अमिताभला अभिनेता पुनीत ईसार याच्याकडून गंभीर जखम झाली. अमिताभला दवाखान्यात भरती करावे लागले होते. जवळपास २०० रक्तदात्यांनी ६० रक्ताच्या बाटल्या अमिताभ साठी दिल्या. अमिताभ लवकरच यातून बरा झाला. पण दरम्यानच्या काळात शूटिंग थांबवावी लागली. अमिताभ जखमी होण्याअगोदर निळू फुले आणि अमिताभ यांनी काही सिन शूट केले होते. अमिताभ जखमी झाल्यानंतर निळू फुले नवीन नाटके आणि चित्रपटाच्या कामात व्यस्त झाले. निळू फुलेंना चित्रपटाची शूटिंग कधी पुन्हा सुरु होईल अशी काही कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांना नवीन नाटकांच्या तालमीला सुरवात केली. प्रसिद्ध नाटककार आत्माराव सावंत हे निळू फुलेंना घेऊन ‘राजकारण गेलं चुलीत’ हे नवीन नाटक तयार करत होते.
‘राजकारण गेलं चुलीत’ या नाटकाचे प्रयोग चालू झाले. निळू भाऊंनी अगोदरच तारखा दिल्या होत्या. किमान दहा दिवस आधी नाटकाच्या तारखा जाहीर होतात. त्यामुळे निळू भाऊ बांधील होते. त्यावेळेस राजकारण गेलं चुलीत हे निळू भाऊंचे नाटक जोरात सुरु होते. जवळपास या नाटकाचे १२०० प्रयोग झाले होते. या नाटकाचा पुढचा प्रयोग संगमनेरला होणार होता. त्याच वेळेस निळू भाऊंना निरोप आला कि कूली चित्रपटाचे शूटिंग पुन्हा चालू झाले आहे. अमिताभ आणि निळू फुले यांचे मिळून काही सीन्स शूट करण्यासाठी निळू फुलेंना तारीख सांगितली गेली. निळू भाऊ मोठया कात्रीत सापडले. अगोदरच त्यांनी तारखा दिल्या होत्या. मध्येच ‘कूली’ साठी चालू नाटकाचे प्रयोग थांबवणे शक्य नाही. कोणत्याही नाटकावर एखादा निर्माता पैसा लावतो तर इतर कलाकारांची जबाबदारी असते कि निर्मात्यांना नुकसान झालं नाही पाहिजे . निळू फुलेंच्या विश्वासावर निर्मात्याने पैसे लावले आहेत. स्वतः निळू फुलेच जाणार नाही म्हणल्यावर मोठं नुकसान होईल ही सगळी कल्पना निळू फुलेंना होती. निळू भाऊंचा नाईलाज झाला त्यांनी कूलीच्या निर्मात्यांना आता लगेच शक्य नसल्याचं कळवलं. अशीच परिस्थिती कुलीच्या निर्मात्यांची झाली. अमिताभच्या तारखा ठरवल्या होत्या. सगळी तयारी झाली होती. त्यांच्यावर पण नुकसानीची वेळ येणार होती. निळू भाऊ त्यांच्या जागेवर बरोबर होते. एकूणच नाईलाज होता. पण यामुळे निळू भाऊंना मात्र कायमचं नुकसान झालं.
नाटकाच्या प्रयोगानंतर कूलीच्या निर्मात्यांनी निळू फुले आणि अमिताभ बच्चन यांच्या तारखा जुळवून आणल्या. राहिलेलं कूलीच शूटिंग पूर्ण झालं. पण निळू फुलेंनी आधी नकार दिल्याने हिंदी चित्रपट निर्मात्यांनी चुकीच्या अर्थानी या सगळ्या घटनेकडे पहिले. हिंदी चित्रपट निर्मात्यांनी याचा असा अर्थ घेतला कि निळू फुले वेळेवर शूटिंगला येत नाही. काही जणांनी निळू फुले अहंकारी असल्याचा समज करून घेतला आणि या नंतर निळू फुलेंना एकही हिंदी चित्रपट ऑफर केला गेला नाही. हिंदी चिंत्रपट मिळाले नाही म्हणून निळू फुलेंवर फारसा परिणाम झाला नाही. मराठी माणसाच्या मनावर या माणसाने कधीच राज्य केलं होतं. हिंदी चित्रपटात काम केलं नाही म्हणजे हे हिंदी चित्रपटाचं नुकसान आहे निळू फुलेंचं नाही.
हे खास आपल्यासाठी
धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे का बघितला पाहिजे ?
जॉनी लिवरला वेळ नसायचा तेव्हा त्याचा डुप्लिकेट जॉनी निर्मल पिक्चर पूर्ण करायचा
फक्त बापालाच विश्वास होता त्याच्या मुली जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटू आहेत