सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

अजय देवगणचा Runway 34 या दोन सत्य घटनांवर आधारित आहे

runway-34-based-on-which-incident

सुलतान मिर्झा भुज मध्ये सैनिक झाल्यानंतर आता पायलट होऊन भेटायला येतोय. रनवे ३४ चा ट्रेलर बघितला असेल तर कथा काय असेल थोडाफार अंदाज आला असेलच. पायलट विक्रांत खन्ना प्रवाशांना वाचवतोय पण तरीही त्याच्यावर नियम पाळले नाही म्हणून आरोप ठेवण्यात आले आहेत. अजय देवगणने साकारलेला विक्रांत खन्ना सगळ्या ट्रेलर मध्ये स्वतःची बाजू मांडताना दिसतोय. चित्रपटाची चर्चा चालू असतानाच ही कथा सत्यघटनेवर आधारित असल्याचं बोललं जात होतं. म्हणून चित्रपटातील मिळत्या जुळत्या वास्तव घटना शोधल्या तर असं लक्षात येतंय कि एक नाही तर दोन घटनांवर आधारित रनवे ३४ ची कथा आहे.

पहिली घटना आहे १८ ऑगस्ट २०१५ ची. दोहा ते कोची ही फ्लाईट केरळमध्ये पोहचत होतीच. पण नेहमीप्रमाणे ही फ्लाईट सुखरूप पोहचेल ही अपेक्षा एकदम धूसर झाली. केरळमध्ये जोरदार पाऊस सुरु झाला होता. पावसामुळे घनदाट धुके पसरले. पायलटला विमान सुरक्षित उतरवणे अवघड झाले. सकाळी पावणे सहाच्या दरम्यान 9W 555 हे विमान केरळ हवाई क्षेत्रात पोहचले पण खराब वातावरणामुळे पायलटला निर्णय घेणे अवघड होते. कोची विमानतळावर विमान उतरवण्यासाठी पुरेशी Visibility नव्हती. पायलटने हवाई वाहतूक नियंत्रकाकडे (Air Traffic Control) त्रिवेंद्रमला विमान उतरवण्याची परवानगी मागितली. दरम्यान अर्धा तास गेला. पायलटने Emergency Landing ची परवानगी मिळवल्यानंतर धावपट्टी १४ वर म्हणजे रनवे १४ वर विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. तीन वेळा प्रयत्न करूनही विमान land करता आले नाही. जास्त प्रयत्न करण्यासारखी परिस्थिती नव्हती कारण विमानाचे इंधन संपत आले होते. शेवटी प्रसंगावधान राखून रनवे ३४ वर सुरक्षित Blind landing करण्यात पायलट यशस्वी झाला. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. १५० प्रवाशी सुखरूप पोहचले. घटनेनंतर पायलटचे कौतुक झाले. पायलटला यांनतर फार काळ आनंद व्यक्त करता आला नाही. विमान वाहतूक मंत्रालय अंर्तगत DGCA ने या घटनेची चौकशी सुरु केली. Blind Landing ही घटना DGCA ने गंभीरतेने घेतली. DGCA समोर दोन मुख्य प्रश्न होते, एकत्र इंधन एवढे कमी का होते आणि दुसरं म्हणजे लँडिंग करताना visibility नसताना एवढ्या गरबडीत हा निर्णय का घेतला. एकंदरीत या पहिल्या घटनेवर रनवे ३४ आधारित आहेत. या घटनेवरून चित्रपटाचं रनवे ३४ हे नाव का आहे हे पण लक्षात आलं असेलच.

दुसरी महत्वाची घटना २०१८ ची ज्यातील मोठा संदर्भ रनवे ३४ मध्ये बघायला मिळेल. BS-211 ही फ्लाईट काठमांडू मध्ये क्रॅश झाली. अपघात इतका मोठा होता कि ७१ पैकी ५१ प्रवाशांनी त्यांचे प्राण गमावले. साहजिकच एवढ्या मोठ्या घटनेची चौकशी व्हायला पाहिजे ती झाली. काठमांडूमध्ये अधिकृत याची चौकशी सुरु झाली. चौकशीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या. फ्लाईटचा मुख्य पायलट म्हणजे कॅप्टन याची मानसिक अवस्था ठीक नव्हती. खूप दिवसांपासून तो नैराश्यात होता. अपघात झाला त्या दिवशी त्याची नीट झोपही झाली नव्हती. अपघातांनंतर ब्लॅक बॉक्स मध्ये विमानातील तपशील सापडतात. यात असं आढळलं कि पायलट त्याच्या सहकाऱ्यासोबत सिगारेट ओढत होता आणि त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलत होता. नैराश्यात असल्यानेच तो कॉकपीटमध्ये सतत सिगारेट ओढत होता. रनवे ३४ मध्ये या दोन्ही घटनांचा उल्लेख आढळतो. चित्रपट आल्यांनतर त्याचा अजून खुलासा होईलच. पण ट्रेलर वरून जेवढी माहिती समोर येतीये त्यावरून या दोन्ही घटनांचा चित्रपटात बऱ्यापैकी समावेश आहे हे दिसतंय.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.