सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

विजय अरोराची प्रसिद्धी बघून सुपरस्टार राजेश खन्नाला भीती वाटली होती.

vijay arora story in marathi

रामानंद सागर यांच्या रामायणात रावणाचा राजपुत्र मेघनादची भूमिका साकारणारा विजय अरोरा हा त्याच्या काळातील खूप प्रसिद्ध अभिनेता होता. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने इंद्रजितच्या पात्रात जिवंतपणा आणला. रामायण मालिकेने त्यांच्या कारकिर्दीला चार चाँद लावले. आज २ फेब्रुवारीला विजय अरोरा यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने विजय अरोरा यांच्या फिल्मी करिअरवर एक नजर टाकू.

विजय अरोरा यांनी १९७१ मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवी प्राप्त केली. विजय यांनी १९७२ साली अभिनेत्री रीना रॉयसोबत काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट ‘जरुरत’ होता. याशिवाय त्यांनी झिनत अमानसोबत ‘यादों की बारात’ या चित्रपटातही काम केले होते. याच चित्रपटातील ‘चुरा लिया है तुमने’ हे रोमँटिक हिट गाणे त्यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. ‘यादों की बारात’ या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. चॉकलेटी चेहऱ्यासह विजय अरोराची स्टाईल पाहून तरुणींना त्याचे वेड लागले होते. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या आणि त्यांनी त्या स्विकारल्याही. कमी काळात त्यांना चांगलीच ओळख मिळाली होती म्हणूणच काही दिवसांनंतर त्यांना चित्रपटात काम मिळू नये यासाठी कट रचला गेल्याचे म्हटले जाते.

विजय अरोरा यांनी जरुरत, जीवन ज्योती, राखी और हथकरी, आखरी चीख, एक मुठ्ठी आसमान, सबसे बड़ा सुख या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी आपल्या करिअरमध्ये ११० चित्रपट आणि अनेक मालिकांमध्ये काम केले आणि लोकांची मने जिंकली. असे म्हणतात की विजय अरोरा त्यावेळेला इतके प्रसिद्ध झाले होते की राजेश खन्ना यांनाही त्यांच्या लोकप्रियतेला धोका वाटू लागला होता. स्वतः राजेश खन्ना हे एका मुलाखतीत म्हणाले, ‘त्यांची जागा कोण घेऊ शकेल तर तो एकमेव व्यक्ती म्हणजे विजय अरोरा.’ अनेक हिट चित्रपटांचा भाग झाल्यानंतर १९८७ मध्ये रामानंद सागर यांची नजर विजय अरोरा यांच्यावर पडली. मेघनादच्या भूमिकेसाठी ते त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत लक्षात राहिले. ही व्यक्तिरेखा त्यांनी इतक्या दमदारपणे साकारली की आजही लोकांना त्यांच्यामध्ये मेघनादची प्रतिमा दिसते.

लॉकडाऊनमध्ये रामायण पुन्हा प्रक्षेपित झाले तेव्हा विजय अरोरा स्वतःला पाहण्यासाठी आपल्या सगळ्यात असायला पाहिजे होते. पोटाच्या कर्करोगामुळे २००७ साली त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. चित्रपटातील भूमिका त्यांना नेहमी आपल्या आसपास ठेवतात. आपल्या अभिनयामुळे ते सदैव त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.