सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

32 वर्षानंतर काश्मीर फाईल्स मुळे पुन्हा कश्मिरी पंडितांच दुःख पुढं आलं आहे.

चार राज्यात विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारल्यावर नरेंद्र मोदी यांनी नुकताच पप्रदर्शित झालेल्या काश्मीर फाईल्स या चित्रपटावर भाष्य केलं. मोदी म्हणाले , ‘ तथाकथित पुरोगामी लोकांचा खरा चेहरा पुढे आला आहे. आज पर्यंत त्यांनी कश्मिरी पंडितांच्या पलायनाला त्याच्या साहित्यात जागा नाही. पण कश्मिर फाईल्स मधून विवेक अग्निहोत्री यांनी सत्य मांडलं आहे. ज्या सत्याला हे तथाकथित पुरोगामी लोक नाकारत होते. “
नरेंद्र मोदी यांनी स्वतः चित्रपटावर भाष्य केल्यामुळे कश्मिर फाईल्स गाजला आहे. १९९० ला झालेल्या जम्मू काश्मीर मध्ये पंडितांच्या पलयानावर कश्मिर फाईल्सने भाष्य केलं आहे.

१९ जानेवारी १९९० हा दिवस पंडित विसरू शकणार नाहीत.

१९९० येईपर्यंत कश्मिर घाटीत दहशदवाद खूप वाढला होता. हुरूयत कॉन्फरन्स , जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट सारख्या संघटना वाढल्या होत्या. अश्या वेळेस इतर धर्मीयांना काश्मीर मध्ये थांबणे धोक्याचे होते. इस्लामिक धर्मांध लोकांचा रोष होता पंडित समुदायावर. कश्मिर मध्ये पंडितांनाच इतिहास खूप जुना आहे आणि पंडित नेहमीच सत्तेच्या जवळ राहणार समुदाय होता. त्यामुळे बाकी समुदायापेक्षा पंडित घाटीत सदन होते. सरकारी संस्थांमध्ये पंडितांचे प्रमाण चांगले होते. पण हीच गोष्ट त्यांच्या दुःखाला कारण ठरली. कश्मिर मध्ये पंडित समुदायाबद्दल लोकांचे मत चांगले नव्हते . त्याच मताचे नंतरच्या काळात द्वेषात रूपांतर झाले. सामान्य काश्मिरी लोकांना पंडितांबद्दल सहानभूती उरली नव्हती.
पंडित समुदायाबद्दल झालेल्या मताचा फायदा इस्लामिक संघटनांनी घेतला. हिंदू मुस्लिम करण्यासाठी त्यांनी पंडितांना त्रास द्यायला सुरुवात केली. १९८५ -८६ मध्ये सुरु झालेला सगळं प्रकार १९९० येईपर्यंत खूप वाढला. . पंडितांनो काश्मीर सोडा नाही तर मारायला तयार राहा असे बॅनर सर्व ठिकाणी लावले होते. १९ जानेवारी १९९० ला काश्मीर मधून पंडितांना हाकलून लावण्यात आले. सरकारच्या आकड्यानुसार एक ते दीड लाख पंडित त्या दिवशी त्यांचे घर सोडून पळून गेले.

पंडित पलायनाची मूळ सापडतात १९८५ मध्ये.

तर झालं असं १९८४ मध्ये शेख अब्दुला यांचं निधन झालं. अब्दुला यांच्या निधनानंतर त्याचा मुलगा फारुख अब्दुल मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आला. पण त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि फारुख अब्दुला यांच्यात मतभेद झाले. इंदिरा गांधी यांना फारुख नको होते. त्यामुळे फारुख यांना सत्तेतून घालवण्यासाठी इंडिया गांधी यांनी फारुख यांचे मेहुणे ‘गुलाम शहा’ याना हाताशी धरलं. गुलाम शहा यांनी अब्दुला यांच्या पक्षाचे १३ आमदार फोडले आणि त्यांना काँग्रेस सोबत सामील केले.
गुलाम शहा आणि काँग्रेसने मिळून कश्मिर मध्ये सरकार बनवले. गुलाम शाह मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री झाल्यावर गुलाम शहा यांनी राज्य व्यवस्थित हाताळले नाही. सत्ता चालवण्यासाठी त्यांनी धर्माचा वापर केला. बहुसंख्य असलेल्या मुस्लिम समुदायाला खुश करण्यासाठी त्यांनी वादग्रस्त निर्णय घेतले. श्रीनगरच्या एका मंदिराच्या जागी मस्जिद बांधण्याची घोषणा त्यांनी केली होती.
गुलाम शहा यांनी हिंदू-मुस्लिम वादाची बीजे कश्मिर मध्ये रोवली. समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच गोष्टीचा फायदा फ़ुटूरतावादी लोकांनी घेऊन काश्मिरी पंडितांना घाटातून पलायन करायला लावले.

पत्रकार राहुल पंडिता यांच्या आकडयानुसार पलायना दरम्यान १० हजार पंडितांचा मृत्यू झाला.

कश्मिर पंडितांच्या पलायनावर लिहलेलं “आवर मून हॅज ब्लड क्लॉट्स’ ( OUR MOON HAS BLOOD CLOTS ) हे राहुल पंडिता यांचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. राहुल स्वतः कश्मिर पंडित आहेत. ज्या वेळेला पलायन होत होते तेंव्हा ते स्वतः पण त्यात होते. पुस्तकामध्ये त्यांनी पलायन कसं झालं याचा वृत्तांत लिहला आहे.
पलायनाच्या दरम्यान किती पंडितांचा मृत्यू झाला याचा सरकारी आकडा उपलब्द नाही. अनेक जण म्हणतात १००० ते २००० पंडित मारले गेले. पण राहुल यांच्या दाव्यानुसार पलायन होत असताना आणि नंतर १० हजार पंडितांचा मृत्यू झाला आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.