सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

रशियाने ताबा घेतलेल्या चेर्नोबिलच्या स्फोटामुळे चार हजार लोक कर्करोगाने मेले

chernobyl disaster explained in marathi

आजच्या युक्रेन मधील आणि तेव्हाच्या सोव्हियत संघातील म्हणजेच रशियातील १९८६ ला चेर्नोबिल या अणुभट्टीत स्फोट झाला. ३२ जण जागीच ठार झाले. नुकतेच रशियन सैन्यांनी युक्रेन हल्ल्यात चेर्नोबिल काबीज केल्याच्या बातम्या आल्या तेव्हा पुन्हा एकदा चेर्नोबिलचा भयाण इतिहास नजरेसमोर आला.

युक्रेनची राजधानी किव शहरापासून १०० किमी अंतरावर प्रिपयेट शहरात चर्नोबिल हा न्यूक्लियर पॉवर प्लांट होता (आजही हा प्रकल्प पाहता येऊ शकतो). जेव्हा जेव्हा जगातील औद्योगिक दुर्घटनांचा विचार केला जातो तेव्हा चेर्नोबिल अणु प्रकल्पातील दुर्घटना टॉप-५ मध्ये गणली जाते. तत्कालीन सोव्हिएत संघ आणि सध्याच्या युक्रेनमध्ये असलेल्या चेर्नोबिल अणु प्रकल्पात चाचणी होणार होती. पण ती चाचणी अनेकांसाठी शेवटचा क्षण ठरेल याची कोणाला कल्पना नव्हती. हजारो नागरिकांसाठी तो दिवस काळा दिवस ठरला.

२६ एप्रिल १९८६ रोजी अणु प्रकल्पात चाचणी होणार होती. वीज गेल्यावर डिझेल जनरेटर पंप किती काळ चालू ठेवू शकतो हे यावरून समजणार होते. टर्बाइन किती काळ फिरू शकते, चाचणीची तयारी एक दोन दिवस आधीच सुरू केली होती. २६ एप्रिलच्या रात्री चाचणीला सुरुवात झाली. दुपारी दीडच्या सुमारास टर्बाइनचे नियंत्रण करणारा व्हॉल्व्ह चालू करण्यात आला. अणुभट्टीची शीतकरण प्रणाली आणि अणुभट्टीच्या आतील न्यूक्लियर फ्यूजन देखील बंद करण्यात आले. अचानक अणुभट्टीतील अणु संलयनाची प्रक्रिया नियंत्रणाबाहेर गेली. अणुभट्टीचे आठही कूलिंग पंप कमी पॉवरवर चालले, ज्यामुळे अणुभट्टी जास्त गरम झाली. यामुळे आगीचा वेग आणखी वाढला. प्लांटमध्ये गोंधळ उडाला. अणुभट्टी बंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच अणुभट्टीत मोठा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की रिऍक्टरचे छत उडून गेले. ३२ जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली. शहरातून लोकांना बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रात्रभर वाहनांमध्ये भरून लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. आग विझवल्यानंतर सर्वप्रथम त्यातून बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गाला रोखण्याचे मोठे आव्हान होते. हे काम करत असताना सुमारे दीडशे जवान रेडिएशनला बळी पडले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही दिवसांतच सुमारे २८ जणांचा मृत्यू झाला. येथून निघणाऱ्या किरणोत्सर्गाचा प्रभाव दशकानंतरही कायम होता. त्यामुळे येथे कॅन्सरसारखे घातक आजार फोफावले आणि लोकांचा मृत्यू झाला.

हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा हा किरणोत्सर्ग अनेक पटींनी जास्त होता. हिरोशिमाच्या तुलनेत चेर्नोबिलमध्ये जीवितहानी खूप कमी असली तरी या अपघातामुळे हिरोशिमाच्या चारशे पट अधिक किरणोत्सर्गी वायू आणि सुक्ष्मकण पृथ्वीच्या वातावरणात फेकले गेले. वाऱ्याबरोबर हे किरणोत्सर्ग उत्तर आणि पूर्व युरोपात पसरले. प्लांटमधील दुर्घटनेतून निघणाऱ्या रेडिएशनचे ५० लाख लोक बळी ठरले. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. रशिया, युक्रेन आणि बेलारूसमधील ५ दशलक्ष लोक किरणोत्सर्गाच्या प्रसारामुळे प्रभावित झाले. भोपाळमध्ये युनियन कार्बाइडमधून सोडण्यात आलेल्या विषारी वायूच्या दुर्घटनेला दोनच वर्षे पूर्ण झाली होती. त्यांनतर २६ एप्रिल १९८६ च्या या घटनेने जग हादरून गेले. एका दशकात चेर्नोबिल पॉवर स्टेशनमध्ये चार अणुभट्ट्या बनवल्या गेल्या होत्या. अपघात झाला तेव्हा दोन अणुभट्ट्यांचे काम सुरूच होते.

सोव्हियत संघाने घटना लपवण्याचा प्रयत्न केला

२७ एप्रिल रोजी सोव्हिएत प्रशासनाने प्रिपयतमधील रहिवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सोव्हिएत संघाकडून करण्यात आला होता. पण किरणोत्सर्ग हवेत पसरला असल्याने ते लपविणे अवघड होते. रेडिएशन आणि राख स्वीडनच्या रेडिएशन मॉनिटरिंग स्टेशनवर पोहोचली होती. ते चेर्नोबिलपासून सुमारे ८०० किमी लांब होते. हवेत सामान्यपेक्षा ४० टक्के जास्त रेडिएशन आढळून आल्याने स्वीडिश अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले. मग हे रेडिएशन कुठून आले याचा तपास स्वीडनने केला. स्वीडनने मॉस्को सरकारला अपघात झाला का असे विचारले असता सोव्हिएत युनियनने ते मान्य केले. त्यामुळे ही घटना जगभर पसरली.

घटनेनंतर सतर्कता म्हणून चेर्नोबिल पासून तीस किमीच्या परिघात राहण्याची परवानगी नाकारली गेली. पण नंतर व्यवसायिकांनी चेर्नोबिलला प्रेक्षणीय स्थळ करून टाकले. यामुळे चेर्नोबिलच्या आसपास हॉटेल आणि तत्सम सुविधा सुरु झाल्या. काही अटींच्या पूर्ततेवर चेर्नोबिल पाहायला मिळते. आताच्या रशियाने काबीज केलेला हा प्रकल्प बघून रशियाने स्वतःचा विध्वंसकारी इतिहास एक प्रकारे जगासमोर परत आणला आहे.

हे पण वाचा

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.