सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

RBI ने १०००, १५०, १२५, १००, ७५ आणि ६० रुपयांची नाणी का जारी केली होती?

Commemorative coins of India

१००० रुपयाचे नाणं बाजारात येणार आहे, खिशात जपून ठेवा कुठं पडलं तर जाग्यावर हजाराला भुर्दंड पडलं. व्हाट्स अँपवर आलेली ही माहिती शेजारचा मोठमोठ्याने वाचून दाखवत होता. गल्लीतल्या लहान पोरांना तर लय आनंद झाला. त्यांना वाटलं खिशात चिल्लर हरवते म्हणून सरकारने १००० रुपयाचं नाणं काढलंय. लहान पोरांचं ठीक हे पण मोठ्या लोकांना पण हेच वाटत होतं. रोज दोन हजाराची नोट बघणारे पण १००० चे नाणे आल्यावर काय काय होईल याच्या चर्चा करत होते. मग म्हणलं हा विषय तपासून बघावं लागेल सरकार खरंच १०००, १५०, १२५ ते ६० रुपयापर्यंतची नाणी काढणार आहे आहे का ? काही जण तर म्हणले ही नाणी कधीच बाजारात आलीत, मग आमच्या हातात का पडली नाहीत हा प्रश्न परत तयार झाला. एकूण विषय समजून घेतल्याशिवाय घाई करू नका.

काही विशेष प्रसंगी किंवा ऐतिहासिक घटनांचा सन्मान करण्यासाठी आरबीआय विशेष नाणे जारी करते. एक गोष्ट स्पष्ट लक्षात घ्या या नाण्यांची कायदेशीर निविदा काढलेली नसते केवळ विशिष्ट गोष्टींच्या स्मरणार्थ ही नाणी जरी केली जातात. त्यामुळे व्हाट्स अँपवर आलेली माहिती ही पूर्ण खरी नाही. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सन्मानार्थ भारताचे पहिले स्मारक नाणे १९६४ मध्ये जारी करण्यात आले. तेव्हापासून ५ पैशांपासून ते १००० रुपयांपर्यंतची असंख्य नाणी जारी करण्यात आली आहेत. पण या नाण्यांना व्यवहारात मान्यता नाही. मग आरबीआयने १०००, १५०, १२५ ते ६० रुपयापर्यंतची नाणी कोणत्या विशेष घटनेच्या पार्श्वभूमीवर जारी केली आहेत ते एकदा बघू.

१००० रुपयाचे नाणे

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे की बृहदीश्‍वर मंदिराची हजार वर्षे साजरी करण्यासाठी सरकारने २०१२ मध्ये १००० रुपयांचे नाणे विशेष नाणे म्हणून प्रसिद्ध केले होते. हे मंदिर शिवाला समर्पित आहे आणि तमिळनाडूच्या तंजावर येथे कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर आहे.

२०० रुपयाचे नाणे

२०१६ मध्ये तत्कालीन सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी 1857 च्या विद्रोहाचे नायक तात्या टोपे यांच्या हुतात्मा दिनानिमित्त २०० रुपयांचे नाणे जारी केले होते. तात्या टोपे या नावाने प्रसिद्ध असलेले रामचंद्र पांडुरंग टोपे यांना ७ एप्रिल १८५९ रोजी ब्रिटीश सैन्याने पकडले आणि ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे घाईघाईने त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि १८ एप्रिल १८५९ रोजी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे त्यांना फाशी देण्यात आली.

१५० रुपयाचे नाणे

२०११ मध्ये जेव्हा प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते, तेव्हा १५० रुपयांचे नाणे आयकर संकलनाच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ जारी करण्यात आले होते आणि त्यानंतर पुन्हा दोन वेळा ते जारी करण्यात आले.

१०० रुपयांचे नाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये माजी पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ १०० रुपयांचे नाणे जारी केले. दिवंगत वाजपेयी यांच्या जयंतीदिनी एक दिवस अगोदर हे नाणे जारी करण्यात आले. २५ डिसेंबर रोजी येणारा त्यांचा वाढदिवस भाजपकडून ‘गुड गव्हर्नन्स डे’ म्हणून साजरा केला जातो. २०१४ मध्ये त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले होते. यापूर्वी २०१०, २०११, २०१४ आणि २०१५ मध्ये इतर महत्त्वाच्या प्रसंगी हे नाणे प्रसिद्ध झाले होते.

१२५ रुपयाचे नाणे

पंतप्रधान मोदींनी २०१५ मध्ये डॉ बीआर आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आणि पुन्हा २०१८ मध्ये उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी २९ जून रोजी 125 व्या सांख्यिकी दिनानिमित्त १२५ रुपयांचे नाणे जारी केले.

७५ रुपयांचे नाणे

२०१० मध्ये आरबीआयच्या ७५ व्या स्थापनदिनानिमित्त ७५ रुपयांचे नाणे जरी करण्यात आले होते.

६० रुपयांचे नाणे

२०१२ मध्ये भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीच्या ६० वर्षांच्या स्मरणार्थ तर २०१४ मध्ये कॉयर बोर्ड ऑफ इंडियाच्या ६० वर्षांच्या स्मरणार्थ ६० रुपयांचे नाणे जरी करण्यात आले.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.