सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मन्या सुर्वेचा एन्काऊंटर करणाऱ्या माजी अधिकाऱ्याचे दाऊदशी संबंध होते ?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन युद्ध जोरात चालू आहेत. एक लढत आहेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि दुसरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस. सोमय्यांचे युद्ध आहे भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आणि त्यांनी दुश्मन बनवलं आहे शिवसेनेला. देवेंद्र फडवणीसांची लढाई सारखीच आहे पण त्यांचे हत्यार आणि दुष्मन वेगळे आहेत. देवेंद्र यांचं हत्यार आहे पेन ड्राईव्ह आणि ते टार्गेट करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. देवेंद्र राष्ट्रवादीच्या विरोधात नेहमीच पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पण फडवणीस जोशात लढले आणि सरकारला देशमुखांचा राजीनामा घ्यावा लागला. नवाब मालिकांच्या विषयात पण फडवणीस यशस्वी झाल्याचं दिसत आहे. या सर्व यशानंतर देवेंद्र फडणविसांनी त्यांचा मोर्चा माजी पोलीस अधिकारी ‘इसाक बागवान’ यांच्याकडे फिरवला आहे.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अंडर वर्ल्डचा डॉन दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. गुरुवार, २३ मार्चला त्यांनी राज्याच्या विधानभवनात तसे आरोप केले आहेत. बागवान यांच्या विरोधातले पुरावे घेऊन फडणवीस विधानसभेत आले होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ते सर्व पुरावे देणार असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. हा सर्व प्रकार काय आहे, इसाक बागवान यांचा इतिहास काय आहे आणि फडवणीस त्यांना का टार्गेट करत आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे.

इसाक बागवान कोण आहेत ?

मुंबई पोलिसात इसाक बागवान अधिकारी होते. ३५ वर्षाच्या सेवेनंतर त्यांनी २००९ ला निवृत्ती घेतली. बागवान याना त्यांच्या कारकिर्दीत तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. इसाक बागवान सगळ्यात पहिल्यांदा लोकांना कळले ते त्यांच्या पहिल्या एन्काऊंटर मुळे. १९८२ ला बागवान पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआय होते. मुंबईत गॅंग वॉर एकदंम जोरात चालू होते. दाऊद गॅंग आणि मन्या सुर्वेंची गँगचा मुंबईत दबदबा होता. मुंबईत त्यांच्या भांडणामुळे वातावरण बिघडले होते. सरकारकडून गॅंग वॉर संपवण्याचे आदेश आले होते. सरकरचे आदेश आल्यावर सगळ्यात पाहिल्यान्दा ऍक्टिव्ह झाले ते इसाक बागवान. सुर्वे गॅंगच्या मन्या सुर्वेलाला वडाळा भागात गाठून इसाक बागवान यांनी त्याचा एन्काऊंटर केला. मुंबई पोलिसांकडून केला गेलेला तो पहिलाच एन्काऊंटर होता.
मन्या सुर्वेच्या एन्काऊंटर नंतर इसाक बागवान सर्वत्र प्रसिद्ध झाले होते पण त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे १९८३ ला मुंबईच्या काला घोडा परिसरातल्या कोर्टात अमीरजादा खान याच्यावर गोळीबार झाला. त्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. बागवान त्या वेळेला कोर्टात ड्युटीवर होते. गोळीबार करून आरोपी पळून जात होता पण बागवान यांनी त्याच्या पायावर गोळी मारून पकडले. पकडलेला आरोपी डॉन दाऊदचा माणूस होता. मुंबई पोलिसांनी दाऊद सोबत दुष्मनी घेतल्याच त्या वेळी बोललं गेलं आणि ह्या सर्व प्रकारांत हिरो होते इसाक इम्ब्राहीम बागवान.
२००८ च्या मुंबई हल्ल्याच्या वेळेस देखील बागवान ऍक्टिव्ह होते. दहशदवाद्यांनी हल्ला केला तेंव्हा बागवान मरिन ड्राईव्हला ड्युटीवर होते. संकटाच्या काळात त्यांनी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
२०१३ ला मन्या सुर्वेच्या आयुष्यावर ‘शूट आऊट वडाळा’ हा चित्रपट आला होता. त्या चित्रपटात अनिल कपूरने इसाक बागवानची भूमिका निभावली होती. चित्रपटांच्या काही दृश्यांवर त्यांनी आक्षेप घेतला होता. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी २०१५ ला ‘इसाक बागवान’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले.

फडणवीसांनी अधिकारी बागवानवर का आणि काय आरोप केले ?

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी २३ मार्चला विधानसभेत बोलताना ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ सरकारवर टाकला. याआधी फडणवीसांनी तब्बल १२५ तासांचं व्हिडीओ फूटेज असल्याचा दावा करत ते पेनड्राईव्ह तपास यंत्रणांकडे दिले होते. यापाठोपाठ गुरुवारी त्यांनी अजून एक पेनड्राईव्ह राज्याच्या गृहमंत्र्यांना देणार असल्याचं सांगत त्यामध्ये मुंबईचे सेवानिवृत्त एनकाऊंटर स्पेशालिस्ट इसाक बागवान यांच्याविषयीचं स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी इसाक बागवान यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप फडणवीसांनी सभागृहात केला. पेनड्राईव्हमध्ये इसाक बागवान यांचे बंधू नसीर बागवान यांचं स्टिंग असल्याचं त्यांनी सांगितलं. “मुंबई पोलीस दलातले सेवानिवृत्त एसीपी इसाक बागवान एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. त्यांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यांचं बारामती कनेक्शन देखील आहे. हे सेवेत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली. बारामतीतली ४२ एकर एनए जमीन त्यांच्याकडे आहे. अजित पवारांचीही एवढी नसेल. मुंबईत देखील त्यांची मालमत्ता आहे”, असं फडणवीस म्हणाले.

इसाक बागवान यांनी भ्रष्टाचार केला त्याची चौकशी केली पाहिजे.

“इसाक बागवान यांचे सख्खे भाऊ नसीर बागवान, वडील इब्राहिम बागवान आणि चुलत भावजय बिल्किस बागवान यांच्या नावे नोकरीत असताना या जमिनी त्यांनी खरेदी केल्या. पण निवृत्तीनंतर त्यांनी फक्त साधा अर्ज देऊन या सगळ्या मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्या. बिल्किस बागवान, सोहेल बागवान यांनीही साधा अर्ज देऊन मालमत्ता हस्तांतरीत केली. इसाक बागवान यांनी कपूर नावाच्या एका व्यक्तीला एक जमीन विकली आणि पुन्हा दोन महिन्यात तीच जमीन परत विकत देखील घेतली”, असा दावा फडणवीसांनी केला.

देवेंद्र फडवणीसानी केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे हे तपास केल्यावर पोलिसच सांगू शकतील पण इसाक बागवान यांची चौकशी झाली पाहिजे. एकेकाळी अंडरवर्ल्डच्या डॉन लोकांचा एन्काऊंटर करणारा इसाक बागवान पोलीस अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्या काळी बागवान अनेकांचे हिरो झाले होते. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून पोलिसांवर आरोप होणे नवे राहिले नाही. आधी मुंबईचे डिजीपी परमवीर सिंग त्यानंतर त्यांच्या विभागातले अधिकारी सचिन वाझे जे सध्या जेल मध्ये आहेत. पोलिसांवर आरोप होणे धोकादायक आहे. सतत पोलीसांवर आरोप झाले तर जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे सरकार आणि पोलीस विभागाने काळजी घेणे गरजेचे आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.