फेब्रुवारी 22, 2025

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आजही धोनीचा सिक्स जसाच्या तसा आठवतो, वाटतच नाही वर्ल्डकपला ११ वर्ष झाली

माझ्या आयुष्यात सध्या फक्त दोनचं गोष्टी आहेत एक परीक्षेचा अभ्यास जो कधी संपतच नाही आणि दुसरं म्हणजे माझं आवडतं ट्विटर. सोशल मीडिया मला फार आवडतं नाही पण ट्विटरच व्यसनं लागलं आहे कि काय असं वाटतं कधी कधी. रिकाम्या वेळेत माझा वेळ ट्विटरलाच जातो. तर असो, नेहमी प्रमाणे ट्विटर वर स्क्रोल करत कोणाच्या जिंदगीत काय चाललंय हे बघत होतो तेवढ्यात युवराज सिंगच ट्विट समोर आलं. २०११ च्या वर्ल्डकपला आज अकरा वर्ष होत आहेत त्यावर त्याच ट्विट होतं.

युवराजचं ट्विट बघितलं आणि वर्ल्डकपच्या आठवणी ताज्या झाल्या. मुळातच त्याला आठवणी म्हणणं चुकीचं होईल कारण तो वर्ल्डकप मी कधी विसरला नाहीच. मी बघितलेला तो पहिला वर्ल्ड कप होता आणि त्यात भारताने तो जिंकला त्यामुळे त्याला विसरणं कसं शक्य आहे. ग्रुप मॅच पासून तर फायनल पर्यंत सगळे जश्याच्या तसे डोळ्यात उभे राहतात. आणि धोनीचा तो शेवटचा सिक्स ….अहा मी आहे
तोपर्यंत तरी विसरणं शक्य नाही….

विराटचं पाहिलं शतक आणि वीरुचं १७५ रन्स

लहान असताना घरी टीव्ही नसल्यामुळे मी जेवढे मॅच बघितले होते ते सर्व दुसऱ्याच्या घरी…त्यामुळे कधी मॅचची मजा घेता आलीच नाही. पण २०११ ला सगळं बदललं मी शिकण्यासाठी हॉस्टेलला आलो आणि माझ्या नशिबाने हॉस्टेलमध्ये टीव्ही होता. फक्त रविवारी आम्हाला टीव्ही पाहायला मिळायची. पण हा नियम बदलला फेब्रुवारी २०११ ला कारण त्या महिन्यात क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झाला होता. आमच्या होस्टेलचे सर स्वतः क्रिकेटचे मोठे फॅन होते आणि तुम्हाला माहिती आहे. क्रिकेटचे फॅन एकमेकांना क्रिकेट बघण्यापासून रोखू शकणार नाहीत. आमच्या सरानी वर्ल्ड कपच्या मॅच साठी सगळी मोकळीक दिली. आम्ही होस्टेलचे पोरं आणि आमचे सर सगळे मिळून मॅच बघायचो.
माझ्यासाठी हा सगळा नवा अनुभव होता कारण मी आता पर्यंत क्रिकेटच्या बातम्याच जास्त बघितल्या होत्या. १५ फेब्रुवारीला वर्ल्ड कप सुरु झाला आणि आमची स्वर्गाची सैर ! बांग्लादेश सोबत भारताचा पहिला मॅच १७ तारखेला होता. भारताची पहिली बॅटिंग आली होती. सचिन , सेहवाग , हरभजन , झहीर खान मला माहिती होते पण विराट कोहली माझ्या साठी नवा होता कारण त्याला कधी खेळताना बघितले नव्हते. मॅच जसा सुरु झाला तसं माझं सगळं लक्ष होत सचिन कशी बॅटिंग करतो त्याच्यावर. पण सचिन फार काळ टिकला नाही आणि वन डाऊनला विराट उतरला. खतरनाक चिवट खेळत होता विराट, एकही बॉल स्टंप कडे जाऊ देत नव्हता. विराटची चिवट खेळी चालू होती आणि दुसऱ्या बाजूला वीरू म्हणजेच सेहवाग तुफान फटके मारत होता. वीस ओव्हर्सच्या आधीच त्याने शतक केले होते. सिक्स वर सिक्स मारत होता. बांग्लादेशच्या बॉलर्सना हे दोघे काय आऊट होत नव्हते…विराटने त्याचे वर्ल्ड कप मधले पहिले शकत ठोकले. त्याचा खेळ बघून एक आयडिया आली होती कि विराट भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे आणि ते ठरलं देखील. सेहवाग काही थांबत नव्हता त्याची फटके बाजी चालूच होती. वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅच मध्ये वीरूने १७५ रन्स ठोकले. भारताने बांगलादेशला ३७५ रन्सच टार्गेट दिल दिलं होत. वर्ल्ड कपचा आगाझ धडाक्यात झाला होत. सेगवागच्या १७५ आणि विराटच्या शतकामुळे आम्हा फॅन्स मध्ये जोश भरला होता.

आफ्रिकेच्या विरोधातली हार

बांग्लादेशच्या मॅच पासूनच भारतीय टीमने जबरदस्त मूमेंटम पकडलं होतं. एक इंग्लंड सोबतच बरोबरीत सुटलेला सामना सोडला तर सर्व सामने भारतने जिंकलेले. १२ मार्चला नागपूरच्या स्टेडियमवर भारताचा सामना दक्षिण आफ्रिके सोबत होणार होता. अफ़्रिकेचि टीम सर्वात तगडी टीम होती. त्यामुळे भारत त्यांच्या विरुद्ध जिंकतो कि नाही हे पाहण्यासाठी सर्व भारत टीव्ही समोर बसणार होता.
आमच्या होस्टेलला प्रॉब्लेम झाला होता. मॅचच्या दिवशी टीव्ही खराब झाला, शहरात किरायाने टीव्ही मिळायची पण आमचं दुर्दैव्य आम्हाला त्या दिवशी किरायाने टीव्ही मिळाला नाही. काही होतं नाही म्हणून आम्ही अशा सोडली होती पण मॅच एवढा जबरदस्त होणार आहे याची आयडिया आमच्या सरला होती. १२,००० खर्च करून मॅच बघण्यासाठी नवा टीव्ही घेऊन आले. देव आपलं ऐकतो याच्यावर त्यादिवसापासुन माझा विश्वास बसला ते आज गायत आहे.
मॅच अपेक्षेप्रमाणे जबरदस्त झाला. आफ्रिकेची बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिन्ग भारताला सरस होती. तरीही धोनी आणि त्याच्या टीम चांगली फाईट दिली. सचिनने त्या मॅच मध्ये शतक केले पण मॅच हरला. सचिनने शतक करून देखील मॅच ठरल्यामुळे खूप वाईट वाटलं होत पण तेंव्हा कुठं माहिती होतं भारत ट्रॉफी जिंकणार आहे. नाही तर त्या मॅचची मजा घेता आली असती.

२ एप्रिल २०११ हा दिवस हा म्हणजे लव्ह आहे…

सुनील गावस्करांना एकदा पत्रकाराने विचारलं होत कि तुम्हाला जर इतिहासात जायला मिळालं तर तुम्ही कोणत्या काळात जाण पसंद कराल. त्यावर गावस्कर म्हणाले होते , ‘ २०११ च्या वर्ल्ड कप फायनल मधला तो शेवटचा विनींग सिक्स पाहायला, अनुभवायला मला परत वानखेडे स्टेडिअमवर जायला आवडेल.’ मला माहित नाही बाकी लोकं काय विचार करतात आणि त्यांना इतिहासाच्या कोणत्या काळात जायला आवडेल पण मला विचारलं तर मी पण धोनीचा तो सिक्स पाहायला जाईल…….. काय फीलिंग होती ती आह्ह ..शब्दात सांगणं कठीण आहे !
पहिली बॅटिंग असलेल्या श्रीलंकेने भारतासमोर २७५ धावांचे आव्हान दिले होते. भारताची फळी बघितलं कि कोणाला हि सहज वाटलं असतं कि भारत सहज जिंकेल पण श्रीलंकेची बॉलिंग पण काय कमी नव्हती. फास्टर मलिंगाने पहिल्या दोन ओव्हर्स मधेच सचिन आणि सेहवागला आऊट केलं. दोन विकेट झाल्यावर निम्म्या लोकांनी टीव्ही बंद केल्या होत्या. आम्ही मात्र बघत होतो काही तरी चमत्कार होईल या आशेने आणि आमच्या अपेक्षेला खरे उतरले विराट आणि गंभीर. ह्या दोघांच्या संयमी खेळाने भारताच्या बॅटिंगला सांभाळले. ३०-३२ रन्स करून विराट आऊट झाला आणि त्याच्या जागी धोनी मैदानात आला. गंभीर आणि धोनी बॅटिंग करत असताना मात्र सर्वानी टीव्ही चालू केल्या होत्या. धोनी ज्या स्पीड मध्ये रन्स काढत होता तो बघून वाटतं होत कि धोनी मॅच हरू देणार नाही. गंभीर त्याची गंभीर खेळी करून धोनीला साथ देत होता. शतकाला तीन रन्स कमी असताना गंभीर रन आऊट झाला आणि त्याच्या जागी आला युवराज सिंग !

युवराज आणि धोनीतर मॅच संपून जायलाच आले होते. आक्रमक खेळणारा युवराज फायनल मध्ये धोनीला संथ साथ देत होता आणि धोनी त्याच्या स्टाईल मध्ये खेळत होता….धोनी स्ट्राईकवर होता ..’शेवटचे चार रन्स काढायचे ..बॉल रन्स पेक्षा जास्त होते त्यामुळे मॅच जिंकणार असच दिसतं होतं. अक्ख वानखेडे विजय सेलेब्रेट करण्यासाठी तयार झालं होतं. टीव्ही पुढे बसलेले सर्व लोक एक पायावर बसले होते. १४० ते १५० च्या स्पीडने श्रीलंकेनं बॉलर बॉलिंग करतं होता. धोनीला फटका मारण्यापासून रोखण्यासाठी त्याने १४५ च्या स्पीडने योर्कर टाकला. सगळा देश त्या बॉलकडे बघत होता…१३० कोटी लोकांचं लक्ष होतं धोनी काय करतो...ज्या स्पीड मध्ये यार्कर आला त्याच स्पीड मधेच धोनीने त्याला त्याच्या हेलिकॅप्टर शॉटने स्टेडियमच्या बाहेर मारले….
बॉल स्टेडियमच्या दिशेला निघाला कि १३० कोटी लोकं नाचायला लागली होती…देशभर दिवाळी चालू होती…आमच्या रूम मध्ये आम्ही दहा एक जण होतो…दहाच्या दहा जण आम्ही मोठ्या मोठयाने ओरडायला लागलो होतो…आमचा मास्तर तर नाचायला लागला होता …कोणाला कशाचंही भान राहिलं नव्हतं…धोनीच्या सिक्सने १३० कोटी लोकांच्या दृदयाला साद घातली होती आणि सगळे त्याच्या तालावर नाचत होते…’लाईफ टाईम मुव्हमेंट’ अनुभवली त्यावेळेला...त्या मॅचच्या अकरा वर्षानंतर हे सर्व लिहताना माझ्या हातावरचे केस उभे राहत आहेत आहेत…आजही रोमांच उभा राहत आहे…विचार करा त्यावेळा काय परिस्थीती असेल.
खरं तर मी त्यावेळी फार फार तर १५ एक वर्षाचा असेन पण माझी फीलिंग अशी होती कि आयुष्यभर कोणत्या तरी गोष्टी साठी मेहनत घेतली आणि ती अचानक मिळावी….मॅचच्या नशेतच मी त्या रात्री झोपलो..सकाळी उठलो तेंव्हा पहिल्यांदा पेपर वाचायला घेतला तेंव्हा सकाळची हेडलाईन होती ….भारतचे लंका दहन !
सकाळची हेडलाईन आजही हृदयात छापलेली आहे…..! आज वर्ल्डकपच्या फायनल मॅचला अकरा वर्ष होत आहेत.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.