सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

हृदय तुटणं काय असतंय हे समजून घ्यायचं असेल तर दिनेश कार्तिकला विचारा

डी के म्हणून प्रसिद्ध असलेला दिनेश कार्तिक सध्या आरसीबी संघाकडून खेळत आहे. या वर्षी कार्तिक फुल्ल फॉर्म मध्ये आहे. एलएसजी संघाच्या विरोधात खेळताना त्याने ४३ बॉल मध्ये ६२ काढलेत. कार्तिक सध्या रिटायरमेन्टच्या वयात आला आहे. पण त्याचा फॉर्म बघता आणखी एक दोन आयपीएल दिनेश कार्तिक सहज काढेल असं वाटतं.
२००५ ला दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली पण कार्तिकला जास्त संधी मिळाल्या नाहीत. विकेटकीपर म्हणून आलेला कार्तिक शेवट पर्यंत धोनीला रिप्लेस करू शकला नाही. कार्तिकच क्रिकेट आपण बघितलंच आहे पण त्याच्या क्रिकेटच्या स्टोरी पेक्षा कार्तिकची आयुष्याची स्टोरी खूप दर्दभरी आहे. कोणताही मोठा त्याच्या वयक्तिक आयुष्यात खूप ठोकर खात असतो तेंव्हा तो मोठा माणूस म्हणून उभा राहू शकतो. कार्तिकची गोष्ट पण तशीच आहे. कार्तिकची स्टोरी वाचली कि आपण जे हर्ट होणं वैगेरे म्हणतो ना ते काहीच नाही असं वाटेल.

योद्धा कार्तिक …!

एक वेळ होती जेव्हा दिनेश कार्तिक भारतीय संघात चांगली कामगिरी करत होता. धोनी नंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती. त्यासोबतच रणजी स्पर्धेत तामिळनाडूचा कॅप्टन पण होता. पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते. तामिळनाडू संघातील त्याचा सहकारी आणि मित्र मुरली विजय याचे दिनेश कार्तिकच्या बायकोबरोबर प्रेमसंबंध होते. या गोष्टीची पुसटशी देखील कल्पना दिनेश कार्तिकला नव्हती. पूर्ण टीमला मात्र हे प्रकरण माहीत होते.
एके दिवशी अचानक दिनेश कार्तिकची बायको आली आणि त्याला म्हणाली, ‘माझ्या पोटात मुरली विजयचे मूल असून मला घटस्फोट हवा आहे.’ पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय असते, याचा अनुभव त्या दिवशी दिनेश कार्तिकला आला असेल .
दिनेशची बायको घटस्पोट घेऊन मुरली विजय सोबत संसारात रमली तर मुरली विजय पण चेन्नई सुपर किंगस कडून चांगली कामगिरी करत होता. दुसरीकडे दिनेश कार्तिक मात्र पूर्णपणे आयुष्यातुन उठला होता. त्याची काय स्थिती झाली असेल याची कल्पना आपण करू शकतो. इतका मोठा झटका पचवणे कुणालाही सहजासहजी शक्य नसते. दिनेश कार्तिक डिप्रेशनमध्ये गेला. त्याचा फटका त्याला लगेच बसला. भारतीय संघातील त्याची जागा चालली गेली. त्याची कामगिरी इतकी खालावली की त्याच्या कडून तामिळनाडू रणजी संघाची कॅप्टनसी काढून घेऊन तीच मुरली विजयला देण्यात आली. अशावेळी त्याच्या मनःस्थितीची कल्पना तुम्ही करू शकता. आता आत्महत्या करून जीवन संपवून टाकावे असे त्याच्या मनात येत होते होते.
एके दिवशी त्याला ट्रेनिंग देणारा ट्रेनर त्याला भेटायला गेला असता त्याने त्याची ही अवस्था बघितली. ट्रेनरने त्याला जबरदस्ती जिमला नेले. तिथे दीपिका पल्लीकल ही राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू पण येत असे. तिने दिनेश कार्तिकची ही अवस्था बघून त्याला आधार दिला. दोघांनी मिळून हळूहळू ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. दीपिकाच्या आधाराचा परिणाम आत दिसू लागला. दिनेश कार्तिक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धुवांधार बॅटिंग करू लागला. त्याला भारतीय संघात पण घेतले गेले आणि तो कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा कॅप्टन पण झाला. दुसरीकडे मुरली विजयची कामगिरी खालावत चालली होती. तो चेन्नई सुपर किंगसमधून पण बाहेर फेकला गेला. 2018 साली निधास ट्रॉफीच्या फायनलमध्ये सिक्स मारत दिनेश कार्तिकने भारताला सामना जिंकून दिला आणि तो ‘मॅन ऑफ द’ मॅचचा मानकरी ठरला.
दिनेश कार्तिकने आपल्या तडाखेबंद कामगिरीने आपण संपलेले नसून फिनिक्सप्रमाणे पुन्हा भरारी घेऊन परत आलो आहोत हे दाखवून दिले. दीपिका पल्लीकल सोबत लग्न करून या दोघांना जुळी मुले झाली. डिलिव्हरीच्या अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये दीपिका पल्लीकलने अनेक पदके कमावत आपल्या नवऱ्याप्रमाणे आपण पण कमी नाही हे सिद्ध केले.
दिनेश कार्तिक हे नाव त्याच याच सर्व मातीन मिसळून पुन्हा मुसंडी मारण्याच्या ईच्छा शक्तीमुळे जगभर ओळखले जायला हवे इतके प्रेरणादायी आहे. प्रवीण तांबेच्या आयुष्यावर हॉटस्टारला कोण प्रवीण तांबे नावाचा चित्रपट आला आहे. चित्रपट खूप सुंदर आहे तसाच दिनेश कार्तिकच्या आयुषयावर चित्रपट आला तर भारी होईल असं वाटतं.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.