राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने कोळश्याच्या कमतरते मुळे लोडशेडिंग वाढणार असल्याचं जाहीर केलं. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी त्यांचे कारण सांगितले. कमीत कमी एका दिवसात आठ तास तरी भारनियम राहील असं ते म्हणालेत. हि बातमी बघितल्यावर मला समजत नव्हतं कि ऊर्जा मंत्री हे का सांगत आहेत कारण आमच्या मराठवाड्यात नेहमीच आठ आठ तास भर नियमन असतं. हा सगळा विचार डोक्यात चालू असतानाच आमच्या परभणीचा वर्ग मित्र अनिरुद्ध देशपांडे यांचं व्हाट्स उप स्टेटस बघितलं तेंव्हा कळलं कि प्रकरण काय आहे…तुम्ही देखील वाचा भारनियमनच्या निर्णयावर त्याची प्रतिक्रिया.
अनिरुद्धचं स्टेटस बघितल्यावर समजलं कि हि नवी लोडशेडींग इतर महाराष्ट्रासाठी आहे. आमच्या मराठवाड्यात तर लोड्शेडींग नेहमीच असते.
अनिरुद्ध आणि माझं बोलणं झालं. मराठवाड्यचा विकास झाला नाही ,पश्चिम महारष्ट्रातील नेत्यांनी मराठवाड्यावर नेहमीच अन्याय केल्याचं त्याच्या बोलण्यात येत होत. मग त्याला उत्तर काय आहे असं त्याला विचारलं तर तो म्हणाला वेगळा मराठवाडा झाला तर विकास होईल. आमच्या मराठवाड्यतल्या लोकांना मध्ये हि भावना आहेच पण त्याचे जाहीर प्रदर्शन कोणी करत नाही. या विषयावर थोडा वेळ चर्चा केल्यावर त्याच्याकडून मला कळलं कि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा वेगळ राज्य असल्याशिवाय विकास होणार नाही असं मत व्यक्त केलं होत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्याच्या बाबतीत असं मत का व्यक्त केलं याचा अभ्यास केला. तेंव्हा कळलं कि बाबासाहेब वेगळा मराठवाडा असायला हवा म्हणाले होते. पुढे वाचा सांगतो मराठवाड्यावर बाबासाहेबांचे विचार..
मराठवाडा महाराष्ट्रात आला तर पुण्या मुंबईचे ब्राहमण मराठवाड्याला लुटतील
१९५५ ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘THOUGHT’S ON LINGUESTIC STATE’ नावाने एक लेख लिहला होता. ह्या लेखात बाबासाहेबानी मराठवाडा आणि मराठवाड्यातील जनतेवर त्यांचे विचार मांडले होते. डॉ बाबासाहेब लेखात म्हणतात, “मराठवाडा मागचे २०० वर्ष निझामाच्या राज्यात होता. दुर्दैव्य म्हणजे निझामाच्या राज्यात मराठवाड्यातील जनता नेहमीच उपक्षेत राहिली आहे. निझाम राजवटीने मराठी लोकांना सत्तेत वाटा दिला नाही. त्यामुळेच मराठवाड्याचा विकास झाला नाही.
आता भाषेच्या नावाने राज्य स्थापन होत असताना मराठवाड्यातील लोकांच्या समोर प्रश्न आहे कि त्यांनी महाराष्ट्रात सामील व्हावे कि नाही. मला असे वाटते कि मराठवाड्यातील लोकांनी फक्त भाषेच्या एका साम्यामुळे महाराष्ट्रात सहभागी होऊ नये. कारण मराठवाड्यातील जनतेला निझामाच्या राजवटीत उपेक्षित ठेवले आहे. त्यामुळे त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. पण जर का मराठवाडा महाराष्ट्रात सहभागी झाला तर पुण्या मुंबईचे ब्राहमण राज्यकर्ते मराठवाड्याच्या वाट्याला येणारे संसाधन त्यांच्या भागात नेतील आणि त्यांचा विकास करतील. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून असच वाटतं. मराठवाड्याला विकास आणि प्रगती हवी असेल तर वेगळा मराठवाडा योग्य राहील.”
बाबासाहेब खरे ठरले असे वाटतं आहे
महाराष्ट्र स्थापन होण्याच्या पाच वर्ष आधी डॉ बाबासाहेबांनी मराठवाड्यातील नजतेला हा सल्ला दिला होता. पण १९६० ला ज्या वेळेस महाराष्ट्र स्थापन झाला तेंव्हा भाषेच्या आधारावर मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. पण भविष्यात काय झाले हे वेगळे सांगायची गरज नाही. बाबासाहेब म्हणाले होते , पुण्या मुंबईचे राज्यकर्ते तुमच्या वाट्याचे पैसे घेतील आणि त्यांच्या भागाचा विकास करतील. आज ६५ वर्षानंतर बाबासाहेब जे म्हणले होते अगदी खरे ठरले आहे.
महाराष्ट्रात विशेष करून पुणे आणि मुंबईचे राजकारणी जास्त झाले. राज्य त्यांच्या हातात राहिल्यामुळे त्यांनी त्यांच्या भागाचा विकास केला. मुंबई पुणे हा भाग इतर भागापेक्षा विकसित झाला आहे. पण त्यामानाने मराठवाडा विकसित झाला नाही.
आज ऊर्जा मंत्र्याच्या लोडशेडिंगच्या निर्णयामुळे आपल्या मराठवाड्यावर अन्याय झाल्याची भावना घट्ट झाली आणि बाबासाहेब जे बोलले होते ते किती बरोबर आणि दूरगामी होते याची जाणीव देखील झाली.
Sarv janata jagi zali pahije punya mumbai la sarv milte tech parbhani beed jalana yana ka nahi mikat .??