रमाबाई भीमराव आंबेडकर या सामाजिक न्यायाचे दैवत डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या महान प्रेरणास्थानांपैकी एक आहेत. रमाबाईंवर मुख्यतः कन्नड आणि मराठीत बनलेल्या चित्रपटांशिवाय फारसे काही लिहिले गेले नाही हे आपलं दुर्दैव. आंबेडकरांची ख्याती जगासमोर आहे पण यापाठीमागे रमाबाई यांचं मोठं योगदान आहे. म्हणून आजच्या काळात रमाबाई यांचं कार्य पुढं आलं पाहिजे. नम्रता, लवचिकता आणि करुणेचे प्रतीक असताना असणाऱ्या रमाबाई राज्यघटनेच्या शिल्पकाराला पाठिंबा देण्यासाठी सदैव मूकपणे उभे राहिल्या.
रमाबाई आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी झाला. सर्वसाधारण पार्श्वभूमीतून आलेल्या रमाबाई भिकू दात्रे वलंगकर आणि रुक्मिणी यांच्या दुसऱ्या कन्या होत्या. त्यांचे वडील हे मजूर असून दाभोळ बंदरातून टोपल्या बाजारात नेऊन आपला उदरनिर्वाह चालवत असायचे. रमाबाई त्यांच्या तीन भावंडांसह गोराबाई, मीराबाई आणि शंकर दाभोळजवळील वलंग गावात महापुरा परिसरात राहत होत्या. त्यांनी बालपणातच त्यांची आई गमावली आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांचे वडील भिकू गेले. या भावंडांचे पालनपोषण त्यांचे काका वलंगकर आणि गोविंदपूरकर यांनी पूर्वीच्या मुंबईत केले.
मुंबईतच १९०६ मध्ये भायखळा मार्केटमध्ये एका साध्या समारंभात डॉ. भीमराव आंबेडकर यांची भेट झाली आणि त्यांचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी दोघेही खूप लहान होते. डॉ. भीमराव आंबेडकर किशोरवयीन होते तर रमाबाई अवघ्या नऊ वर्षांच्या होत्या. त्यावेळी ही वय लहान असणे ही साहजिक बाब होती.
डॉ.आंबेडकर रमाबाईंना प्रेमाने रामू म्हणत असत तर रमाबाई त्यांना साहेब म्हणत. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये फरक असूनही आदर आणि समानतेच्या वैवाहिक बंधनात हे दोघे होते. डॉ. आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनातही त्यांनी हा दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो. त्यांना यशवंत, गंगाधर, रमेश आणि राजरत्न आणि एक मुलगी इंदू असे चार पुत्र झाले. तथापि यशवंत हा आंबेडकर यांचा एकुलता एक मुलगा प्रौढावस्थेत जगला तर इतर चार मुले बालपणातच मरण पावली.
महापुरुषांच्या इतिहासाचे आणि महान कार्यांचे कथन करताना आपण त्यांना योग्य श्रेय दिले पाहिजे आणि जे नम्रपणे त्यांच्यासाठी शक्ती आणि प्रेरणास्तंभ आहेत त्यांना आपण स्मरण केले पाहिजे. रमाबाई आंबेडकर नसत्या तर डॉ. आंबेडकरांचे जीवन आज आपल्याला आठवते त्या मार्गाने वळले नसते. डॉ. आंबेडकर परदेशात डॉक्टरेट पदवी घेत असताना रमाबाई पूर्वीच्या ब्रिटिश भारतात अत्यंत गरिबीखाली एकट्या राहत होत्या. तेव्हा आपण तिची जिद्द लक्षात ठेवली पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी मिळवलेल्या पदव्या रमाबाईंनी घरात केलेल्या अफाट त्यागाचे प्रतिबिंब आहे. इतरांनी रमाबाईंना आपल्या पतीला अमेरिकेला जाण्यापासून रोखावे असे सुचवले असतानाही डॉ. आंबेडकरांवर त्यांचा अत्युच्च विश्वास होता ज्याने त्यांना परदेशात शिक्षण घेण्यास पाठिंबा देताना त्यांच्या सल्ला आणि सूचना टाळल्या. एवढंच नाही तर शेणापासून तयार केलेल्या गौऱ्या विकून त्या आंबेडकरांना पैसे पाठवत होत्या. आंबेडकरांच्या शिक्षणात कसलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी स्वतः हाल अपेष्टा सहन केल्या. यावरून हे लक्षात घ्या रमाबाईंना प्रचंड संघर्ष करावा लागला म्हणून आंबेडकर बहुजन समाजाचे नायक होऊ शकले. रमाबाई आंबेडकरांना हे महत्व पटले होते कि देशाबाहेरील विद्वान विद्यापीठांमधून शिक्षण मिळवणे किती आवश्यक आहे. जेणेकरून आंबेडकरांना मायदेशी लोकांची सेवा करण्यात मदत होईल आणि शतकानुशतके त्यांना तोंड द्यावे लागलेल्या भेदभावाचे निर्मूलन होईल. रमाबाईंना कोणतेही औपचारिक शिक्षण मिळाले नसले तरी त्यांना दीनदलितांची दुर्दशा आणि त्यांच्यावर होणारे अन्याय समजण्यात अडथळा आला नाही. रमाबाई आंबेडकरांनी आपल्याला केवळ नम्रता शिकवली नाही तर कठीण परिस्थितीतही चिकाटी आणि लवचिकता या गुणांचा पुनरुच्चार केला.
डॉ भीमराव आंबेडकर यांचे ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हे पुस्तक १९४१ मध्ये त्यांच्या प्रिय रामूच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. आंबेडकरांनी हे पुस्तक रमाबाईंना समर्पित केले. आंबेडकरांनी यावर व्यक्त होताना लिहिले आहे कि, कठीण काळात रमाबाईंच्या मनाचा चांगुलपणा आंबेडकरांसोबत होता. दुर्दैवी काळात आणि त्यांना पडलेल्या चिंतांबद्दल शांतीने आणि धैर्याने रमाबाईंची सहन केले म्हणूनच आंबेडकरांना बळ मिळाले आणि ते हे महान ग्रंथ लिहू शकले.
हे खास आपल्यासाठी
चंदीगढमध्ये भाजप उमेदवार जिंकावण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याचाच अनैतिक कारभार.
चार वर्षांपूर्वी ज्या मैदानावरून स्ट्रेचरवरून परतला होता त्याच मैदानात हार्दिक पांड्या हिरो ठरला
राज्याचा नवा चाणक्य – एकनाथ संभाजी शिंदे !