सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

ज्यां ॲनाटोली सोबचॅकनी राजकारणात आणलं त्यांच्याच हत्येचा आरोप पुतिनवर झाला..

मागच्या एक आठवड्यापासून ‘व्लादिमिर पुतिन’ यांच्या पेक्षा जास्त चर्चा कोणाचीही नाही. कारण पण सांगायची गरज नाही कि चर्चा का आहे. पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला. ह्या हल्ल्यात युक्रेनचे हजारो नागरिक मारले गेले आहे पण आपल्या भारताचा ‘नवीन’ नावाचा एक विद्यार्थी देखील मारला गेला आहे. पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला का केला आणि थांबायला का तयार नाहीत हा संशोधनाचा विषय आहे. त्यावर त्या विषयाचे जाणकारचं बोलू शकतील. पण जर आपल्यला पुतिन यांचा इतिहास माहिती असेल तर सर्व परिस्थितीचा अंदाज आपण लावू शकतो. ज्या ॲनाटोली सोबचॅकनी पुतिन यांना राजकारणात आणलं त्यांच्या हत्येचे आरोप पुतिनवर झाले.

१९९१ ला सोवियत रशिया कोलमडला आणि पुतिन राजकारणात आले.

१९८० चे दशक सुरु झाले तेंव्हापासूनच सोवियत संघ त्याच्या विघटनाच्या दिशेने वाटचाल करत होता. १९९१ ला त्याची औपचारिकता ‘गोर्बाचेव्ह’ अध्यक्ष असताना झाली. सोवियत संघाच्या विघटनांसोबत रशियाचे सर्व साम्रज्य कोसळले होते. आंतरराष्ट्रीय राजकारणातले रशियाचे स्थान कोसळून गेले. ‘गोर्बाचेव्ह’ यांच्या नंतर देशाला नेतृत्व देईल असा नेता रशियात उरला नव्हता. राजकारणात येण्याची हीच संधी आहे हे पुतिन यांनी ओळखलं. ॲनाटोली सोबचॅक याना पुतिन यांनी त्यांच्या राजकीय इच्छा बोलून दाखवल्या. ॲनाटोली सोबचॅक यांनी पुतिन याना राजकारण करायला मदत केली. राजकारणात येण्या आधी पुतिन केजिबी ( KGB ) मध्ये गुप्तहेर अधिकारी म्हणून काम करत होते. ॲनाटोली सोबचॅकच आपले राजकीय गुरु असल्याचं पुतिन अनेक वेळा बोलले आहेत.

बोरीस येल्त्सिनच्या जागी पुतिन यांची निवड करायला पण ॲनाटोली सोबचॅक यांनी पुढाकार घेतला.

गोर्बाचेव्ह यांची कारकीर्द संपल्यावर रशियाच्या अध्यक्ष पदी  बोरीस येल्त्सिन आले.  बोरीस येल्त्सिन याना दारू पिण्याची सवय होती. त्यांचा सर्व वेळ दारू पिण्यात ते घालीत.  बोरीस येल्त्सिन यांच्या काळात रशियाची परिस्थिती खूप वाईट झाली होती. अश्या वेळेला रशियाला नवीन अध्यक्षाची गरज होती.  बोरीस येल्त्सिन यांच्या जवळच्या माणसांमध्ये अध्यक्ष होण्यासाठी स्पर्धा सुरु झाली होती. सर्व जण अध्यक्ष होण्यासाठी आपआपले नाव पुढे करत होते. मात्र ते सर्व जण एका नावावर एकमत होत नव्हते. एकमत होत नाही याचा अंदाज आल्यावर ॲनाटोली सोबचॅक यांनी ‘व्लादिमिर पुतीन’ यांचे नाव अध्यक्ष पदासाठी पुढे केले. अध्यक्ष पदासाठी नाव पुढे येईपर्यंत पुतिन फारसे प्रसिद्ध नव्हते. त्यांच्या बद्दल माहिती नव्हती. पुतिन यांच्या माध्यमातून आपल्याला सत्ता चालवता येईल असा अंदाज लावून सर्व जण पुतिन यांच्या नावावर एकमत झाले . ॲनाटोली सोबचॅक यांच्या पाठिंब्यानेच पुतीन १९९९ ला पाहिल्यान्दा रशियाचे अध्यक्ष झाले.

पुतिन प्रचारात असताना ॲनाटोली सोबचॅक यांचा मृत्यू झाला.

१९९९ ला  बोरीस येल्त्सिन याना हटवून पुतिन यांची निवड झाली होती. पण निवडीच्या एक वर्षातच रशियात सार्वजनिक निवडणूक होत्या. पुतिन याना जनतेला सामोरे जावे लागणार होते. पुतिन यांची पहिलीच निवडणूक असल्यामुळे पुतीन जोरात प्रचार करण्यात गुंग होते. पण प्रचार जोरात असताना एक वाईट बातमी आली. ॲनाटोली सोबचॅक यांचा ‘कालानीग्रांड’ शहरात मृत्यू झाला. हृद्य विकाराच्या आजाराने ॲनाटोली सोबचॅक यांचा मृत्यू झाला असल्याच सांगण्यात आलं.

ॲनाटोली सोबचॅक यांच्या शरीराचे पोस्टमार्टेम करण्यात आले होते पण ॲनाटोली सोबचॅक यांची बायको ‘नारुसोव्हा’ झालेल्या पोस्टमॉर्टेम वर शंका व्यक्त केली होती. ‘सेंट पेटीसबर्ग’ शहरात ॲनाटोली सोबचॅक यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. अंत्यसंकरात व्लादिमिर पुतिन देखील सहभागी झाले होते. ॲनाटोली सोबचॅकच्या अंत्यविधी करताना पुतिन यांचे रडतानाचे फोटो आज देखील इंटरनेट वर उपलब्द आहेत.

नंतरच्या काळात नारुसोव्हा यांनी ॲनाटोली सोबचॅक यांच्या मृत्यू बाबत शंका उपस्थित केल्या. ॲनाटोली सोबचॅक यांचा मृत्यू नैसर्गिग नव्हता तर तो अध्यक्ष पुतिन यांनी घडवून आणला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. नारुसोव्हा यांच्या आरोपावर कधीही कारवाही झाली नाही. मात्र आपल्या गुरूच्या हत्येचा आरोप लागल्यामुळे पुतिन यांची प्रतिमा मात्र मालिन झाली.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.