सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

साऊथच्या या हिरोने स्वतःच्या घरी निर्मात्याला गोळी घातली होती.

nandamuri balakrishna biography in marathi

पुष्पा चित्रपटाच्या एका आठवडा आधी दक्षिणेत अखंडा हा चित्रपट रिलीज झाला होता. हिंदी बेल्ट मध्ये पुष्पाची चर्चा झाली पण तिकडे अखंडा सुपरहिट झाला हे कोणाच्या लक्षात आलं नाही. पुष्पाने चांगलीच कमाई केली पण बजेटच्या तुलनेत अखंडाने कमाईच्या बाबतीत नवीन रेकॉर्ड सेट केले. अखंडा हा सिनेमा ६०-७० कोटींमध्ये बनला आहे आणि त्याने २०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. कमाई पुष्पाची एक वेळ जास्त आहे मान्य करू पण पिक्चरच्या बाहेर पण हिरो सारखा वावरणारा एकमेव हिरो म्हणजे नंदामुरी बालकृष्ण. बाकी हिरो पिक्चरमध्ये धिंगाणा घालतात पण हा वास्तवात पण अशा करामती करतो कि ऐकून वेड लागेल.

माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे म्हणल्यावर थोडा माज असणारच !

नंदामुरी बालकृष्ण आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामराव यांचा मुलगा आहे. एन. टी. रामराव हे राजकारणात नंतर पण त्याआधी तेलुगू सिनेमात मोठं नाव होतं. दक्षिणेच्या नटांचा आणि राजकारणाचा जुना संबंध आहे. यशस्वी नट असलेले रामराव यांचा एकदा अपमान झाला म्हणून राजकारणात आले. आले पण साधे सुधे नाही थेट मुख्यमंत्री होऊनच शांत झाले. नंदामुरी हा त्यांचा मुलगा तोपर्यंत चित्रपटात जम बसवत होता. रामराव अभिनय दिग्दर्शन यातून राजकारणाकडे पूर्ण वेळ झुकले होते. पण तोपर्यत नंदामुरी रामरावांनी नंदामुरीला चित्रपटात बऱ्यापैकी प्रस्थापित केलं. नंदामुरी बालकृष्ण हा ऍक्शन हिरो म्हणून त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. युट्युबवर जाऊन बघा त्याच्या जुन्या पिक्चरच्या क्लिप बघून हसल्याशिवाय राहणार नाही. पण त्या काळात लोकांना हे आवडत होतं. संवाद एका वेगळ्याच पद्धतीने करतो म्हणून प्रेक्षकांना तो नेहमीच Larger than life वाटतो. नंदमुरीची सगळ्यात मोठी अडचण ही आहे कि तो चित्रपट आणि वास्तविक आयुष्य वेगळं समजतच नाही. त्याच्या चित्रपटांपेक्षा चर्चा असते ती तो काय बोलला, कोणाला बोलला. हा बहुतेक भारतातील एकमेव अभिनेता आहे जो दिग्दर्शकाला गोळ्या घालायला कमी करत नाही. वाचून जरा झटका बसेल पण हे खरं आहे.

नंदमुरी बालकृष्ण याने स्वतःच्या घरी एका निर्मात्याला गोळी घातली होती. निर्माता वाचला पण यामुळे नंदमुरी काही पण करू शकतो हे लोकांना समजलं. काही लोकांना तर त्याच्या या गोष्टीच कौतुक वाटतं. त्याचे काही व्हिडिओ बघा त्याचा एखादा फॅन जवळ आला तर हा सरळ हाकलून देतो. कित्येक फॅनला ढकलून देण्याचे त्याचे व्हिडिओ सहज बघायला मिळतील. आताच काही दिवसांपूर्वी तो म्हणाला, ‘मी ए. आर. रेहमानला ओळखत नाही. रेहमानला कोणता पुरस्कार मिळाला याचा मला फरक पडत नाही’ असं सुद्धा तो बोलला. यावरून अंदाज आला असेल कि हा कसल्या प्रकारचा माणूस आहे. हिरो म्हणून नंदमुरी चांगला अभिनेता असेल तो पण एकंदरीत व्यक्तिमत्व म्हणून तो नेहमी वादात असतो. कदाचित नंदमुरीसाठी तो स्वतः सोडून सगळे लहान लोक आहेत. नंदमूरीचे कौटुंबिक नातेसंबंध एकदा बघा मग कळेल हा असा का वागत असावा.

माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा ते दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्यांचा मेव्हणा

नंदमुरीचे वडील तीन वेळा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. शिवाय त्यांचा चित्रपट क्षेत्रात आधीपासूनच दबदबा होता. मुख्यमंत्री रामराव नंतर त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू सासऱ्यांना चकवा देऊन मुख्यमंत्री झाले. चंद्राबाबू नायडू आणि नंदमुरी बाळकृष्ण हे सक्खे मेहुणे काही काळ एकमेकांच्या विरोधात होते. पण काळ बदलला आणि नंदमुरी यांची मुलगी आणि चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा यांचा विवाह दोन्ही कुटुंबांनी ठरवला. यामुळे दोन्ही कुटुंबाना राजकीय बळकटी आली. चंद्राबाबू प्रचारसासाठी निवडणुकीच्या प्रचारात भाग घेत होते पण ते स्वतः कधी उभे राहिले नव्हते. पण २०१४ च्या आंध्र विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. नंदमुरी आणि तेलुगू चित्रपट हे समीकरण राजकीय वळण देऊ शकते इतके प्रभावी होत चालले आहेत नंदमुरी बाळकृष्ण. त्यांना बालिया या टोपण नावाने जास्त ओळखतात. त्यांचा फॅन बेस इतका तगडा आहे कि नंदमुरीने शिव्या दिल्या तरी लोक पिक्चर बघायला जातात.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.