महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. महिला आज आत्मविश्वासाने वावरतात पण यासाठी सुरवातीच्या अनेक महिलांना खूप संघर्ष करावा लागला होता. सावित्राबाई सारखी कित्येक उदाहरणे देता येतील. काही महिलांना कोणत्याही क्षेत्रातील पहिले काम केल्याचा मान मिळतो आणि त्याचबरोबर पहिला संघर्ष पण पदरी पडतो. तर ही गोष्ट आहे भारतातील पहिल्या महिला पायलट कॅप्टन प्रेम माथूर यांची.
प्रेम माथूर यांचा जन्म १७ जानेवारी १९२४ उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे झाला. प्रेम माथूर हे मिळून पाच भावंडे होती. यातील एक जण व्यावसायिक होता तर दुसरा वैमानिक प्रशिक्षण देत होता. प्रेम माथूर यांच्या घरातील वातावरण मोकळे होते. लहान असल्यापासून त्यांना घरातून खूप काही शिकायला मिळालं. घरातून चांगला आधार असल्याने प्रेम यांची अनेक कामात रुची वाढत होती. व्यावसायिक असणाऱ्या भावाने दुसऱ्या महायुद्धातील वापरलेली काही विमाने विकत घेतली आणि श्रीलंकेला विकली. या विमानांना घेऊन जायची जबादारी कॅप्टन अटल यांच्या खांदयावर टाकली. कॅप्टन अटल यांच्या सोबत काम करण्यासाठी प्रेम माथूर यांनी आग्रह केला. कॅप्टन अटल यांना काही हरकत नव्हतीच. कॅप्टन अटल आणि प्रेम माथूर यांनी ही विमाने श्रीलंकेला पोहचवली. दरम्यानच्या काळात कॅप्टन यांनी प्रेम हुशार असल्याचे ओळखले आणि तिला ‘तू पायलट का होत नाही म्हणून विचारले.’
इथून पुढे प्रेम माथूर यांचा पायलट होण्याचा प्रवास सुरु झाला. प्रेम यांनी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. प्रेम यांना आधीपासून या विषयात आवड होती म्हणून त्यांच्यासाठी पायलट होणे तसे अवघड गेले नाही. १९४७ मध्ये अहमदाबाद फ्लाईंग क्लब कडून त्यांना अधिकृत परवाना मिळाला. भारतातील पहिली महिला पायलट झाली हे ऐकायला आज किती भारी वाटतंय पण त्यावेळच्या लोकांना एवढं रुचलं नव्हतं. पायलट होणे हा खरा संघर्ष नव्हता. पायलट झाल्यानंतर नोकरी मिळवताना जो संघर्ष होता तो किती अवघड आणि महत्वाचा होता हे लेख पूर्ण वाचल्यानांतर कळेल.
प्रेम माथूर पायलट झाल्यानंतर पायलट पदासाठी त्यांनी त्यावेळच्या महत्वाच्या एअरलाईन्स कंपन्यांकडे नोकरीसाठी अर्ज केला. प्रेम माथूर यांच्या अगोदर कोणी महिला पायलट नव्हतीच त्यामुळे एअरलाईन्स कंपन्या प्रेम माथूर यांना घ्यायला तयार नव्हत्या. काहींनी तर महिला असल्यामुळे घेऊ शकत नाही असा स्पष्ट शब्दात नकार कळवळा. एका एअरलाईन्सने तर त्यांना अशा शब्दात कळवलं, जर आम्ही तुम्हाला पायलट म्हणून घेतलं विमान चालवणारी एक बाई आहे हे लोकांना कळल्यावर ते आमच्या विमानात बसायला तयार होणार नाहीत. प्रेम माथूर यांना इतके नकार आले होते कि त्यांना आता आश्चर्य वाटतं नव्हतं. पण थांबणाऱ्यातल्या त्या नव्हत्या. त्यांनी प्रयत्न चालूच ठेवला.
प्रामाणिक प्रयत्न करत असताना कधी ना कधी तुमच्याकडे संधी येतेच. अनेक नकार पचवल्यांनतर डेक्कन एअरवेज या हैदराबादच्या निजामाच्या कंपनीने प्रेम माथूर यांना होकार कळवळा. मुलाखत झाली. त्यांनतर आवश्यक चाचण्या घेण्यात आल्या. प्रेम माथूर सर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. भारताला पहिली महिला कंमर्शिअल पायलट मिळाली. प्रेम माथूर यांच्या सोबत सरला ठकराल यांचे नाव सुद्धा घ्यायला हवे पण त्यांना काही कौटुंबिक कारणास्तव पायलट झाल्यानंतर नोकरी करता अली नाही. त्यांनी नंतर कला क्षेत्रात नाव कमावले.
प्रेम माथूर यांनी त्यावेळेस पायलट होण्याचा निर्णय घेतला म्हणून आज कित्येक महिलांना करिअरचे नवनवीन मार्ग सुकर झाले. एअरलाईन्सच्या क्षेत्रात महिलांना आत्मविश्वास मिळाला. प्रेम माथूर यांना सलाम !
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?