रस्त्यावरून एखादी बुलेट गेली कि आज देखील सगळे लोक तिच्याकडे इच्छा असो कि नसो तरी बघतात. बुलेट बद्दल चर्चा करतात. पण बुलेट सुरुवातीपासून अशी नव्हती. बुलेटला रॉयल केलं एका भारतीय २६ वर्षीय तरुणाने.
असं म्हणतात भारतात बुलेट रस्त्यावर कमी लोकांच्या डोक्यात जास्त चालते. डोक्यात चालते म्हणजॆ काय तर बुलेट ने हवा केली आहे. जो पण बुलेट चालवतो तो आपोआपच स्वतःला रॉयल असल्याचा फील देतो. पण बुलेट बनवणाऱ्या रॉयल एनफिल्डची कहाणी तशी काही रॉयल आणि सरळ नाही. अनेक वेळा ही कंपनी बंद झाली, पुन्हा चालू झाली. १०० वर्षा पेक्षा मोठा प्रवास आहे रॉयल एनफिल्डचा..
रॉयल एनफिल्डची सुरुवात
इंग्लंडमध्ये रिजिड इंग्लंड नावाची एक कंपनी होती. सुया बनवणं तीच मुख्य काम. पण कंपनी तोट्यात गेल्यामुळे रिजिड इंग्लंड विकावी लागली. १८९१ ला अल्बर्ट स्मिथ आणि रॉबर्ट एडवर्ड या दोघांनी मिळून विकत घेतली. दहा वर्ष या दोघांनी ती कंपनी चालवली. सुया बनवून त्यांना फारसा नफा मिळत नव्हता. म्हणून त्यांनी सायकल क्षेत्रात हात अजमावला. अल्बर्ट आणि रॉबर्ट यांनी सायकल बनवणे चालू केले. सायकल क्षेत्रात काही काळं काम केल्यावर १९०१ मध्ये त्यांनी पहिली मोटार सायकल बनवली. बुलेट तीच नाव. गाडी एकदम भारी होती .इंग्लंड मध्ये तिला मागणी देखील वाढली होती. पण जेमतेम पाच सहा वर्ष झाली नसतील कि कंपनी तोट्यात जायला सुरुवात झाली. लोकांनी बुलेट घेणं बंद केलं आणि १९०७ मध्ये बुलेटचा छोटा प्रवास संपतो कि काय असे झाले होते. कंपनी दिवाळखोर झाली होती.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान नवीन सुरुवात
विसाव्या शतकात दोन जागतिक महायुद्ध झाले. युद्धात जवानांना सामान ने आण करण्यासाठी गाड्यांची आवश्यकता होती. रॉयल रॉयल एनफिल्डने त्यांची नवीन बुलेट आणली. बुलेट एकदम मजबूत होती. युद्धात ती टिकेल अशीच बनवली होती. इंग्लंड आणि मित्र राष्ट्रनी त्यांच्या मागणी नुसार बुलेट मागवल्या. त्यामुळे बुलेटचे वाईट दिवस संपले. कंपनी वाढत होती. पण कंपनीचा चांगला काळं फार दिवस राहिला नाही. महायुद्ध संपल्यावर इंग्लंड मध्ये होंडा सारख्या जपानी कंपन्या आल्या. बुलेटपेक्षा कमी दारात त्या मिळत असत. साहजिकच स्पर्धा वाढल्यामुळे बुलेटचे परत वाईट दिवस आले कारण रॉयल एनफिल्डने स्वतःमध्ये आवश्यक बदल केले नव्हते. महायुद्धामुळे चालू झालेली रॉयल एनफिल्ड परत दिवाळखोर बनली.
सिद्धार्थच्या हाती रॉयल एनफिल्डची सूत्रे आली आणि बुलेटचं नशीब बदलले
आयशर कंपनी चालवणाऱ्या विक्रम लाल यांनी १९६० ला इंग्लडची रॉयल एनफिल्ड विकत घेतली. बुलेटची विक्री एकदम कमी झाली होती. विक्रम लाल यांनी रॉयल एनफिल्ड घेऊन सट्टाच खेळाला होता. पण आपला मुलगा ही कंपनी उभी करू शकतो असा त्यांना विश्वास होता. विक्रम लाल यांनी त्यांचा २६ वर्षीय मुलगा सिद्धार्थकडे कंपनीचे सूत्रे दिली. सिद्धार्थने एवढी नावाजलेली कंपनी कशी काय दिवाळखोर झाली याचा अभ्यास केला. कंपनीने केलेल्या चुका सुधारायला सुरुवात केली. त्यावेळी बुलेटचे मेंटेनस खूप जास्त यायचे ग्राहकांना ते परवडत नसे. सिद्धार्थने मेंटेंनस कमी केला. इंजिन बाजारात टिकेल असे केले. गियरची बाजू बदलून घेतली. गाडीची किंमत खूप जास्त होती ती कमी केली. कंपनीत अंतर्गत बदल केल्यावर सिद्धार्थने बाजारात कामाला सुरुवात केली. बुलेटची ब्रॅण्डिंग करायला सुरुवात केली. बुलेटचे प्रदर्शन आणि स्पर्धा भरवल्या. सिद्धार्थने कंपनीचे सूत्रे हाती घेतल्यापासून काही दिवसात कंपनीचे प्रदर्शन वाढले होते. सध्या तर ते प्रचंड वाढले आहे. २००५ पर्यंत वर्षाला २५००० गाडी विकल्या जायच्या त्या २०२१ मध्ये ५७०००० बुलेट विकल्या गेल्या आहेत .
दिवाळखोर झालेल्या कंपनीला २६ वर्षीय सिद्धार्थने नुसते उभे केले नाही तर रॉयल एनफिल्डला ब्रँड बनवले. इच्छा असेल तर काय होऊ शकते याचा नमुना सिद्धार्थने दाखवून दिला आहे.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?