उगाच याला त्याला चंदन लावण्यात काही अर्थ नाही. चंदन लावायचं आहेच तर रानात लावलं पाहिजे. इकडं तिकडं चंदन उगाळून ताकत वाया घालवण्यापेक्षा रानात चंदनाची शेती करा. जास्त पैसे नाही मिळायचे पण एक दोन पिढ्या सुखाने खातील एवढे पैसे मिळाले तरी लय झालं. पुढच्या एक दोन पिढ्यांची सोय करायची या पिढीला झिजावं लागणार. एकदा चंदन सलामीला उभं राहील कि पैशाचा पाऊस दिसलं हे खरंय पण तोपर्यंत लय ऊन पावसाळे बघायची तयारी ठेवा. थोडी काळजी घेऊन केलं तर विषय सोपा आहे फक्त आधी विषय खोलात जाऊन समजून घ्या. सरकारी परवानगी लागते का इथून चालू करू.
सर्वप्रथम चंदन लागवडीसाठी कोणत्याही सरकारी संस्थेची अथवा विभागाची परवानगी लागत नाही हे लक्षात घया. पण लागवडीनंतर काही प्रमुख कायदेशीर बाबी ज्या फार अवघड नाहीत त्या पूर्ण केल्या पाहिजेत. लागवड केल्यानंतर तलाठ्या कडून फक्त सातबारावर नोंद करून घ्यावी लागेल आणी तोडताना फाॅरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी लागते. हेक्टरी रू. 45,000 अनूदान सरकार कडून 3 टप्यात मिळते. अधिक माहितीसाठी तालूका कृषी अधिकारी यांना भेटावे. त्यांना माहिती नसल्यास, वन औषधी महामंडळ, साखर संकूल, पूणे यांच्या कडे संबंधित G.R.मिळेल. एकेक टप्प्याने चंदन शेतीची सर्व माहिती घेऊ.
लागवड पद्धत
चंदन लागवडी साठी संपूर्ण राज्यातील जमिन लागवड योग्य आहे. फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. चंदन ही परोपजिवी असल्यामूळे त्याला सोबत दूसरे झाड लावावेच लागते. मिलिया डूबिया, डाळिंब ई. चालतात. साधारण 10×10 वर लागवड करावी लागते आणी मधल्या पाच फूटा मध्ये मिलीया डुबिया लावावा लागतो. एकरी 435 चंदन आणी 435 मिलीया डूबिया लागतात. सर्वप्रथम 1×1 चा खड्डा करून, त्यात कंपोस्ट टाकून मग रोप लावावे. ही जंगली शेती असल्यामुळे नंतर फवारणी खताची गरज नाही. वर्षातून दोनदा निंबोळी खत द्यावा आणी सुरुवातीचे तिन वर्ष ड्रिपने पाणी द्यावे लागेल.
चंदनाला सोन्यापेक्षा जास्त किंमत आहे कारण तो सर्वच बाबतीत दुर्मिळ आहे. म्हणजे शंभर बिया पेरल्या तर त्यातल्या दहा ते पंधरा टक्के किंवा जास्तीत जास्त 20 टक्के येतात. एखाद्या किलो बियाण्यांपासून दोनशे ते अडीचशे रोपं तयार होतात. जून महिना लागवडीसाठी योग्य आहे. पेरलेलं उगवायला जवळपास दोन महिने लागतात. उगवल्यानंतर पंधरा दिवसानंतर पिशवीत ठेवलं जातं. दोन वर्षे चंदनाच्या रोपट्याची वाढ पिशवीतच होते. पण दोन वर्षात पिशवी काही वेळा बदलली जाते. पाच ते सहा वर्षात झाडाची उंची बारा ते पंधरा फूट एवढी अपेक्षीत आहे. ज्या खड्यात चंदन लावलेलं असतं तो खड्डा माती आणि शेणखतानं भरलेला असतो. विशेष म्हणजे चंदन सर्व प्रकारच्या मातीत उगवतं. तग धरतं.
चंदनाचं झाड हळूहळू पकतं. याचाच अर्थ चंदन जसाही वयात येतो तसा त्यात सुंगध भरतो. सुंगध येतोय म्हणजे त्याचं वजनही वाढतय. चंदनाचं झाड जेवढा काळ ठेवाल त्यानुसार त्याचं वजन भरतं. दोन प्रकारची चंदनाची झाडं आहेत. एक लाल चंदन आणि दुसरं पांढरं चंदन. आपल्याकडे पांढऱ्या चंदनाचीच शेती केली जाते. कारण आपल्याकडची जमीन त्यासाठी अनुकूल आहे. हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेशात पांढऱ्या चंदनाचीच शेती केली जाते. 5 ते 47 डिग्री तापमानात चंदन व्यवस्थित येतो.
रोपांचे सरासरी भाव
चंदनाचं रोपटं खूप महाग मिळतं. म्हणजे त्याची जशी कमाई आहे तशीच त्याच्या रोपट्याची किंमत आहे. एका रोपासाठी 500 ते 600 रुपये मोजावे लागतात. महाराष्ट्रात गेल्या काही काळात याचं बियाणं मिळतं. सरकारनेही चंदनाच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. चंदनाची शेती आंध्र, कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात बियाणेही पूर्वी कर्नाटकातून यायचं आता मात्र ते महाराष्ट्रातही उपलब्ध होतात.
चंदनाला कशापासून धोका?
चंदनाला खरा धोका आहे तो पाण्यापासून. त्याला फार जास्त पाणी चालत नाही. खोलगट भागात जिथं पाणी साचतं तिथं चंदनाची लागवड करु नका. जास्त पाण्यात त्याचं झाड सडण्याची शक्यता जास्त आहे. थंडीच्या दिवसात चंदनाची लागवड करु नये. आठवड्यातून त्याला दोन ते तीन लीटर फक्त पाणी लागतं. पाणी जेवढं नियंत्रित ठेवाल तेवढं त्याला फायदेशीर. चंदनाच्या शेतीत इतर पिकही घेता येतात. चंदनाच्या दोन झाडात 20 फुटाचं अंतर ठेवावं आणि मग त्यात इतर पिकं घेता येतात. फक्त ऊस किंवा तांदुळ त्यात लावता येत नाही कारण ह्या दोन्ही पिकांना पाणी भरपूर लागतं आणि चंदनाच्या झाडाला पाण्याचाच धोका जास्त आहे.
चंदन शेतीवर सरकारचं धोरण?
चंदनाची शेती कुणीही करु शकतं पण त्याची निर्यात मात्र शेतकरी करु शकत नाही. कुठल्या कंपन्यांनाही त्याची निर्यातबंदी आहे. याचाच अर्थ फक्त सरकारच चंदनाची निर्यात करु शकते. चंदनाचं झाड तयार झालं की वनविभागाला तशी माहिती द्यावी लागते. त्यानंतरच निर्यातीचं काम केलं जातं. चंदन जगातलं सर्वात महागडं झाड आहे. सध्या प्रती किलो 27 हजार रुपये( सध्याची किंमत वेगळी असू शकते) त्याची किंमत आहे. एका झाडापासून 15 ते 20 किलो चंदनाचं लाकुड मिळतं, ज्याची किंमत 5 ते 6 लाख रुपये एवढी आहे. सुगंधी तेलापासून ते आयुर्वेदिक औषधं आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये चंदनाचा वापर केला जातो. म्हणूनच त्याला जास्त किंमत आहे.
चंदनाबद्दलच्या अफवा
चंदनाच्या झाडावर साप असतात ते खोटं आहे. चंदनाची चोरी केली जाते, तस्करीही होते ही गोष्ट खरी आहे. पण आठ वर्षापर्यंत तेही होत नाही कारण आठ वर्ष पूर्ण केलेल्या झाडालाच सुगंध असतो. त्यामुळे चंदनाच्या झाडाला तशी आठ वर्षापर्यंत किंमत नाही. त्यानंतर मात्र बारा ते पंधरा वर्षापर्यंत त्याची राखण करावी लागते.
विक्री कुठे करायची ?
विक्री साठी “मैसूर सँडल” यांच्याकडे सतत मागणी असते. येऊन मागणीच्या फक्त 2% पूरवठा होतो. तसेच इतर ही भरपूर कंपण्या आहेत किंवा स्वताः ऊत्पादन कंपनी टाकू शकता. सरकार चंदन तेल उत्पादनासाठी सबसीडी देते.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?