२३ वर्षाचा होता तेंव्हा आईला म्हणाला ,”आई मी सगळे लोक विकत घेऊ शकतील अशी जनता कार बनवणार” आणि सरकारने आपली तिजोरी त्याच्यासाठी मोकळी केली. पुढे ती मारुती कार म्हणून बाजारात आली. २८ वर्षाचा झाला तेंव्हा म्हणाला “आई मी देशातील सगळे प्रश्न सोडवून दाखवणार” आणि सगळे केंद्रीय मंत्रिमंडळ त्याच्या प्रभावाखाली आले होते . ३३ वर्षाचा झाला तेंव्हा आठ राज्याचे मुख्यमंत्री आणि २५० पेक्षा जास्त खासदार त्याच्या नावाने शपथ घ्यायचे आणि अचानक २३ जून १९८० च्या सकाळी विमान अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. त्या तरुणाचं नाव आहे संजय गांधी.
जनता दलाच्या तीन वर्षाच्या काळानंतर इंदिरा गांधी १९८० च्या जानेवारीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आल्या होत्या. पंतप्रधान जरी इंदिरा झाल्या असल्या तरी सगळी यंत्रणा त्यांचा छोटा मुलगा संजय गांधींच्या हाती होती. संजय काँग्रेस पक्षाचे महासचिव झाले होते. नवीन आलेल्या मंत्रिमंडळात संजय यांना मानणाऱ्या खासदारांना मंत्री केले गेले. देशात संजय गांधींचे राज्य आले असेच बोलले जायचे. पण संजय यांचे राज्य जास्त काळ टिकले नाही. संजय जास्त काळ जगू शकले नाहीत.
संजय गांधी यांना विमान चालवण्याची आवड होती. त्यांनी विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. आईच देशाची पंतप्रधान असल्यामुळे विमानांची तर कमी नव्हती. आपल्या मित्रांसोबत संजय नेहमी विमानाने फेरफटका मारायला जात असत. पण त्याच विमान चालवण्याच्या आवडीने संजय यांचा जीव घेतला. दिवस होता २३ जून १९८०. पंतप्रधान निवासावर अधिकाऱ्यांची वर्दळ होती. पण संजय गांधींचा दिवस सुरु झाला नव्हता. संजय सकाळी उशिरा उठले आणि आपली आवडती मेटाडोर कार घेऊन सफदरगंज विमानतळाच्या दिशेने निघाले.
संजय विमान सफरींसाठी उत्सुक होते कारण भारतीय वायू ताफ्यात पिट्स एस २ नावाचे नवे विमान दाखल झाले होते. पिट्स एस २ ची त्यावेळी खूप चर्चा होती. संजय विमानतळावर पोहचल्यावर त्यांनी विमान अधिकारी सुभाष सक्सेना याना सोबत घेतले आणि नव्या कोऱ्या पिट्स एस २ मध्ये बसले. संजयने विमान उडवायला सुरुवात केली. दुर्दैवाने विमानाने उडान भरल्याच्या काही मिनिटातच संजयचे विमानावरचे नियंत्रण सुटले. सफदरगंज विमानतळाच्या थोड्या अंतरावरच असलेल्या अशोका हॉटेलच्यावर विमान गिरक्या घेत होते. थोडा वेळ गिरक्या घेतल्यावर विमान तळाच्या बाजूला असलेल्या मोकळया रानात ते कोसळले. विमानात असलेले संजय आणि अधिकारी सुभाष सक्सेना दोंघांचा पण अपघातात मृत्यू झाला.
संजयची कारकीर्द नेमकीच सुरु झाली होती. सरकारमध्ये संजयने काम करायला सुरु केले होते. देशभर संजयला मानणारे कार्यकतें बनले होते. इंदिरा गांधी यांच्या नंतर देश संजय यांच्या कडेच आशेने बघत होता. पण काळाने संजय यांचा जीव घेतला. एक नेतृत्व खुलण्याच्या आधीच ते मृत्यूने हिसकावून घेतलं
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?