सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

आंबेडकरांच्या मूकनायकाला शाहू महाराजांनी २५०० रुपये देणगी दिली होती.

102 years of muknayak

३१ जानेवारी १९२० ‘मूकनायक’ चा पहिला अंक प्रकाशित झाला. आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी समाजाची बाजू मांडणारे मूकनायक हे वृत्तपत्र असणे किती गरजेचे आहे हे आंबेडकरांना समजले होते. पण मूकनायकचा प्रवास हा सोपा नव्हता आंबेडकरांना अनेक अडचणींना तोंड देऊन मूकनायक प्रकाशित केले. त्यावेळेस अनेक जाणकार आंबेडकरांच्या मदतीला धावून आले. त्यात शाहू महाराजांचं नाव अग्रस्थानी आहे.

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध किती दृढ होते, हे मूकनायक वृत्तपत्राला राजर्शी शाहू महाराजांनी मूकनायकला केलेल्या २५०० रुपयांच्या मदतीवरुन दिसून येते. कोल्हापूरमधील दत्तोबा पवार हे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्नेही होते. १९१९ मध्ये राजर्षी शाहू महाराज मुंबईला आले त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यासंह अस्पृश्य समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि चळवळ गतिमान करण्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्राची गरज असल्याचं सांगितलं होतं. बाबासाहेबांनी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी अडीच हजार रुपये चेकद्वारे दिले. यानंतर मुकनायकचा अंक प्रकाशित झाला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १०२ वर्षापूर्वी सुरु केलेलं मूकनायक पाक्षिक मराठी पत्रकारितेतील ऐतिहासिक परंपरेची स्थापना करणारी घटना ठरली. मूकनायकचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी मुंबईत प्रकाशित करण्यात आला. आपल्या चळवळीची भूमिका आणि आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी वृत्तपत्राची गरज असल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं होतं. त्या भूमिकेतूनचं बाबासाहेबांनी मूकनायक पाक्षिकाची सुरुवात केली. मूकनायकचा पुढील प्रवास तीन वर्ष सुरु होता. मूकनायकची स्थापना करताना बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढं एक महान उद्दिष्ट होतं. त्यांचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे हि मनस्वी उच्च शाहू महाराजांची होती म्हणून तर शाहू मह्राराजांनी आर्थिक मदत करताना कसलाही विचार केला नाही. आंबेडकरांनी ठरवल्यानुसार मूकनायकचं ब्रीदवाक्य म्हणून संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची निवड केली होती.

काय करु आता धरुनिया भीड | नि:शंक हे तोंड वाजविले ||
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण | सार्थक लाजून नव्हे हित ||

या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची निवड ब्रीदवाक्य म्हणून करुन बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक सुरु करण्यामागील वैचारिक भूमिका काय असेल याचे संकेत दिले होते.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.