सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

साडे तीन हजारात त्याने स्मायलीचा लोगो बनवला पण लोगो विकून दुसऱ्यानेच करोडो छापले

smiley-emoji-story-in-marathi

शाळा कॉलेजमधील पोरांच्या बॅगेला Smiley लटकवलेली नसेल तर विशेष. मुलगा असू दे वा मुलगी प्रत्येकाच्या आयुष्यात या स्मायली असतातच. कित्येक पिढ्या आल्या गेल्या पण स्मायलीच्या किचन काय बदलू शकल्या नाहीत. पिवळ्या रंगावर काळी एक साधी वक्र रेषा चेहऱ्यावर स्मित हास्य आणायला पुरेशी आहे. एखादी गोष्ट किती सोपी करून सांगता येते यावर त्याच यश अवलंबून आहे. जगात चांगले चित्रकार कमी नाहीत पण सगळ्यांनाच भावेल असं चित्र प्रत्येकाला काढायला जमत नाही. सामान्य माणसाला खोलात जायला आवडत त्याला समजणारी आनंद देणारी कला ज्या कलाकाराला जमली त्याने इतिहास केलाच म्हणून समजा. असाच इतिहास स्मायलीचा लोगो बनवणाऱ्याने केलाय. स्मायली माहित नाही असा एक देश नाही पण ज्याने बनवला त्याला मात्र आज कोणी ओळखत नाही. एवढंच नाही तर ज्याने लोगो बनवला तो सोडून दुसऱ्यानेच मलाई खाल्ली. नेमकं प्रकरण वाचल्याशिवाय खऱ्या कलाकारांवर कसा अन्याय झाला कळणार नाही.

हार्वे रॉस बॉल नावाचा अमेरिकन कलाकार होता. काही कंपन्यांसाठी तो लोगो बनवून दयायचा. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना आवडतील असे काही डिझाईन त्याच्याकडून बनवून घ्यायचे. १९६३ ला एका विमा कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांचे मनोबल वाढवण्यासाठी आयकॉन तयार करण्याची कल्पना काढली जेणेकरून हे आयकॉन बघून कर्मचारी नेहमी उत्साही राहतील. त्यांनी हार्वे रॉस बॉलला बोलावून सदर आयकॉन बनवायला सांगितले. तेव्हा त्याने पिवळ्या रंगावर काही काळ्या रेषा तो मारत राहिला. साधारण दहा मिनिटे त्याने हे काम केलं आणि कंपनीला स्मायलीचा लोगो दिला. पिवळा रंगच का निवडला यावर त्याने उत्तर दिलं कि सूर्यप्रकाशासारखा चमकदार हा रंग दिसत होता म्हणून त्याने या रंगाची निवड केली. ठळक आणि जे सांगायचं ते स्पष्ट लक्षात यावं म्हणून एकदम कमी रेषात त्याने हसणारा चेहरा तयार केला. या दहा मिनिटाच्या कामासाठी विमा कंपनीने त्याला ४५ डॉलर दिले. आज ही रक्कम साडे तीन हजारच्या आसपास आहे पण १९६३ च्या आसपास ही किंमत किती असेल तुम्हीच अंदाज घ्या. विमा कंपनी आणि हार्वे रॉस बॉल या दोघांना काम संपलं असं वाटलं पण खरी स्टोरी पुढे होती.

कंपनीने कर्मचार्‍यांसाठी पोस्टर्स आणि बटणांवर हे साधे डिझाइन छापले. कोणालाच कल्पना आली नाही कि लगेच ते प्रसिद्ध होतील. कंपनीच्या कार्यालयातील हे लोगो बाहेर पण प्रसिद्ध होऊ लागले. हार्वे बॉल किंवा विमा कंपनी दोघांनीही लोगोचा ट्रेडमार्क केला नाही. इथेच मोठा घोळ झाला. ज्याने बनवला आणि ज्याच्यासाठी बनवला दोघांनाही या गोष्टीचं मूल्य लक्षात आलं नाही. फ्रँकलिन लुफ्रानी नावाच्या फ्रेंच पत्रकाराने हे लक्षात घेऊन पहिल्यांदा हा लोगो नोंदणीकृत केला. त्याला “स्मायली” असे नाव दिले. अधिकृत नोंदणी झाली आणि या पत्रकाराला आयुष्यभर पैसे छापण्याची जणू मशीन मिळाली. लेव्ही आणि मार्स कॅंडी सारख्या कंपन्यांना लोगो वापरण्याचा परवाना देऊन कंपनीने पैसे घ्यायला सुरुवात केली. जिथे हा लोगो वापरला जाईल तिथे या पत्रकाराच्या कंपनीला पैसे मिळणे चालू झाले. तो पत्रकार मेल्यांनंतर त्याच्या मुलांनी ही कंपनी ताब्यात घेतली.

The Smiley कंपनी लुफ्रानीचा मुलगा निकोलस चालवतो. Zara आणि Fendi सारख्या ब्रँड्सना लोगो वापरायला देऊन भरमसाठ फी आकारून वर्षाला लाखो डॉलर्सची कमाई करतो. ४५ डॉलर कमावलेल्या हार्वेची तुलना केल्यास लक्षात आलं असेलचं स्वतः घडवलेल्या गोष्टीची किंमत ओळखता अली पाहिजे.

“स्मायली” हा मूळ आयकॉनिक एकमेव लोगो नाही. अशीच कथा Nike या कंपनीच्या लोगोची आहे. Nike सहसंस्थापक फिल नाइट यांनी “Swoosh” या Nike च्या डिझाइनसाठी ३५ डॉलर दिले होते. पुढे काय झालं याचा अंदाज आला असेलच. पुन्हा कधी या विषयवार पण बोलू.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.