आज जिवंत असत्या तर सुषमा स्वराज त्यांची सत्तर वर्ष पूर्ण करत असत्या. पण २०२९ च्या ऑगस्ट महिन्यात आजाराने त्यांचं दिल्लीत निधन झालं. सुषमा स्वराज यांच्या निधनाने फक्त भाजपचे नाही तर देशाचे नुकसान झाले आहे. त्या प्रचंड स्पष्ट वक्त्या होत्या. लोकसभेतील भाषणे असो कि लाखोंच्या सभा सुषमा स्वराज मैदान गाजवायचा. त्यांना ऐकणे एक पर्वणीच असायची.
२००४ ला एनडीएचे सरकार जाऊन युपीएचे सरकार सत्तेत आले. अटल बिहारी वाजपेयीसारखा नेता भाजपाकडे असून देखील काँग्रेस आणि सह पक्षांनी विजय मिळवला. युपीएचे सरकार आल्यावर सोनिया गांधी देशाच्या पंतप्रधान होतील अश्या चर्चा होत्या. सोनिया गांधी जर देशाच्या पंतप्रधान झाल्या तर मी मुंडन करणार असल्याची घोषणा करून सुषमा स्वराज यांनी खळबळ उडवून दिली. सोनिया गांधी जन्माने विदेशी आहेत म्हणून त्यांच्यावर अनेक वेळा टीका होत असे पण सुषमा स्वराज यांनी विरोधाला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले होते. सुषमा स्वराज यांच्या मुंडन घोषणेने देशामध्ये वेगळ्याच चर्चाना उधाण आले होते. .
काँग्रेसने मास्टरस्ट्रोक करून सोनिया यांना कर्नाटक मधून उमेदवारी दिली.
२००४ च्या निवडणुकीत भाजपने इंडिया शायनिंगचा नारा दिला होता. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार परत सत्तेत येईल असच वातावरण होत. पण सोनिया गांधी नेतृत्व करत असलेल्या काँग्रेसने मास्टरस्ट्रोक मारला. भाजपा उत्तर भारतात मजबूत होती पण दक्षिणेत त्याचं जास्त अस्तित्व नव्हतं. त्यामुळे भाजपाला उत्तर भारतात टक्कर देऊन दक्षिणेत जास्त जागा घ्यायच्या असा काँग्रेसचा प्लॅन ठरला. दक्षिणेत चांगलं प्रदर्शन करायचं असल्यामुळे काँग्रेसने सोनिया गांधींना कर्नाटकाच्या बेल्लारी मतदार संघातून उमेदवारी दिली. सोनिया गांधी यांच्या कर्नाटकातून लढण्याने दक्षिणेत काँग्रेस मजबूत झाली होती.
बेल्लारी मध्ये सुषमा स्वराज याना उतरावं लागलं
राजकारणात असं म्हणतात जो अगोदर चाल चालतो त्याची जिंकण्याची शक्यता जास्त असते. बेल्लारी मतदार संघ निवडून काँग्रेसने चाल चालली होती. त्यामुळे भाजपाला काँग्रेसच्या मागे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. सोनिया गांधी यांचा मुकाबला करण्यासाठी भाजपला दक्षिणेत मजबूत उमेदवार द्यावा लागणार होता. नाहीतर काँग्रेस पूर्ण दक्षिणेतले राज्य जिंकण्याची शक्यता होती. सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांचा मुकाबला करावा असं भाजपच्या निवड समितीने ठरवलं होत. पण बेल्लारी मतदार संघातून जिंकण्याची शक्यता नसल्यामुळे सुषमा स्वराज निवडणूक लढण्यास तयार नव्हत्या. पण काँग्रेस आणि सोनिया गांधी यांनी त्यांना तसा पर्याय ठेवला नव्हता. शेवटी पक्षाची गरज म्हणून त्यांना बेल्लारी मतदार संघातून निवडणुकीला उतरावं लागलं.
सुषमा विरुद्ध सोनिया सामना रंगला होता.
सोनिया गांधी आणि सुषमा स्वराज यांचे पारंपरिक मतदार संघ उत्तर भारतातले होते. पण ह्या वेळी त्या दक्षिणेत निवडणूक लढवत असल्याने सर्व भारताचे लक्ष बेल्लारी मतदार संघाकडे लागले होते. सोनिया गांधी यांच्या विरोधात भाजपने त्यांच्या कर्मठ नेत्या स्वराज याना उतरवलं होत. अटल बिहारी वाजपेयी जरी भाजप आणि एनडीएचे नेते असले तरी २००४ चा मुकाबला सोनिया विरुद्ध सुषमा असाचं वाटतं होता.
बेल्लारीत आणि देशात पण भाजपाला हार स्वीकारावी लागली.
दक्षिणेत स्वतः सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व केल्यामुळे काँग्रेसचे प्रदर्शन खूप चांगले झाले. काँग्रेसच्या प्लॅननुसार ते यशस्वी झाले. पण सोबत बेल्लारी मतदार संघातून सुषमा स्वराज यांचा पण पराभव झाला.
झालेला पराभव भाजपाला खूप जिव्हारी लागला होता. त्यामुळे सर्व भाजप काँग्रेस आणि सहकारी पक्षांवर टीका करण्याची संधी सोडत नव्हता. त्यात सोनिया गांधी यांचं नाव पंतप्रधान म्हणून पुढं आल्यामुळे भाजपाला टीका करण्याची संधी होती. त्या संधीचा फायदा घेण्यासाठीच सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मी मुंडन करणार असल्याची घोषणा केली. स्वराज यांच्या घोषणेने सोनिया गांधी यांच्या विरोधात एक मत तयार झालं. जनमानस विरोधात गेल्यामुळे कि इतर कारणामुळे हे स्पष्ट नाही पण २००४ ला सोनिया गांधीनी पंतप्रधान होणं नाकारलं.
xKoLldRNipcAwsr