सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

मॅकडोनाल्डने ८०० दुकानं बंद केली पण बर्गर किंग रशिया सोडून जायला तयार नाही

This Is why Burger King Continues to Operate in Russia

रशिया युक्रेनचा वाद आता दोन देशांचा राहिला नाही सगळं जग या युद्धात कधीच खेचलं गेलंय. त्यात अमेरिका तर आघाडीवर असणारच. कपडे काढून चड्डी घालायला देणारा अमेरिका आज युद्ध नको म्हणून बोंबलतोय. एवढंच नाही निषेध म्हणून रशियातून अमेरिकन उद्योगांना माघार घ्यायला सांगितली जात आहे. मॅकडोनाल्ड, KFC अजून बरेच उद्योग रशिया सोडण्याच्या तयारीत आहे. पण घोडं अडलंय ते बर्गर किंगचं. बर्गर किंगची इच्छा असून पण त्यांना रशियातील व्यवसाय थांबवता येईना ?

बर्गर किंगचे चाहते सोशल मीडियावर बर्गर किंगच्या विरोधात हॅशटॅग मोहीम राबवतायेत. बर्गर किंगच्या चाहत्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे कि रशियात तुम्ही बर्गर विकू नका. कारण काय तर रशियाने युक्रेनवर केलेलं आक्रमण. असं नाही कि हा न्याय फक्त बर्गर किंगला आहे. मागच्या आठवड्यात जवळपास बहुतेक पाश्चिमात्य कंपन्यांनी रशिया सोडायला सुरुवात केली आहे. मॅकडोनाल्डने त्यांचे ८०० दुकान बंद केलेत तर स्टारबक्सने १३० पेक्षा जास्त ठिकाणी त्यांचे कामकाज थांबवले आहे. नेस्लेने दूध आणि काही अत्यावश्यक सेवा वगळता बाकीच्या सेवा बंद केल्या आहेत. तरीही बर्गर किंगने अद्याप तशी घोषणा केली नाही. सोशल मीडिया वर हॅशटॅग चालवणाऱ्या जमातीला वाटतंय कि बर्गर किंग ने आपलं बस्तान गुंडाळून लगेच रशिया सोडावी. एका दिवसात एवढा मोठा निर्णय घेणे सोपे नाही. धंद्याचं गणित समजून घेतल्याशिवाय बर्गर किंगची अडचण समजणार नाही.

बर्गर किंग रशियामध्ये त्यांचे रेस्टॉरंट्स स्वतः चालवत नाहीत. शिवाय रशियातील सर्व रेस्टॉरंट्सचे ते संपूर्ण मालक नाहीत. रशियन उद्योगपती अलेक्झांडर कोलोबोव्ह आणि इतर दोन भागीदारांसोबत बर्गर किंग रशियात काम करते. अलेक्झांडर कोलोबोव्ह हे रशियातील सर्व ८०० स्टोअरचे काम बघतात. थोडक्यात रशियामध्ये बर्गर किंग फ्रेंचायझी मॉडेलवर आधारित आहे. रशियातील भागीदारांना लगेच व्यवसाय बंद करायला सांगणे वाटते तेवढे सोपे नाही. फ्रँचायझी मॉडेलमध्ये अनके क्लिष्ट अटी समाविष्ट आहेत. या अटी काय असतात हे आधी सोपं करून सांगतो, म्हणजे उद्या तुम्ही रशियात शाखा वाढवल्या तर अडचण येणार नाही.

बर्गर किंग सारखे मोठे ब्रँड दुसर्‍या भागीदार/व्यक्तीसोबत करार करतात आणि ते या व्यक्तीला ब्रँड नाव वापरण्याचा आणि बर्गर किंग उत्पादने विकण्याचा अधिकार देतात. त्या बदल्यात, भागीदार रॉयल्टी उत्पन्न किंवा नफा देण्यास बांधील असतो. नफा किती प्रमाणात वाटून घ्यायचा हा त्या त्या ब्रँडचा निर्णय असतो. दोन्हीकडे फायदा होईल अशा अटींवर हा व्यवहार सुरु होतो. नवीन देशात एकदम व्यवसायाची जोखीम घेऊन उतरणे अवघड आहे. अशा वेळेला त्याच देशातील भागीदार घेऊन व्यवसाय वाढवणे सोपे आहे आणि शिवाय धोका पण कमी आहे. ब्रँडला शून्यापासून सुरुवात करण्याची गरज नाही. त्यांना स्थानिक चव आणि प्राधान्यांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. त्यांना फक्त अनुभव आणि पैसा असलेला भागीदार शोधायचा असतो. इथून पुढचा प्रवास सोपा आहे.

तथापि फ्लिपसाइड म्हणजे फ्रँचायझी करार हे कठोर अटींसह दीर्घकालीन करार असतात. उदाहरणार्थ बर्गर किंग कधीही त्यांची दुकाने बंद करू शकत नाही किंवा हे करार सहज संपुष्टात आणू शकत नाही. जर त्यांनी तसे केले तर ते बर्गर किंग्जवर खटला दाखल होऊ शकतो. अशा परिस्थितीत बर्गर किंगला रशियातील ऑपरेशन्स थांबवायचे असतील तर एकमेव मार्ग म्हणजे कोलोबोव्हबरोबर चर्चा करून तडजोड करणे. आता तरी किमान असं दिसतंय की कोलोबोव्ह सहकार्य करायला तयार नाही. बर्गर किंगचे रशियन भागीदार एवढं मोठं नुकसान सहन करतील ही अपेक्षा पण चुकीची आहे.

बर्गर किंग बरोबर स्टारबक्स आणि पापा जॉन्स याच अडचणीचा सामना करत आहेत

सबवे दुसरी लोकप्रिय क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट बर्गर किंगच्या वाटेवर आहे. ते रशियामध्ये चालवतात त्या ४५० स्टोअरपैकी एकही त्यांच्या मालकीचे नाहीत आणि फ्रँचायझी करार मोडण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला आहे. पिझ्झा चेन पापा जॉन्सचा एक प्राथमिक फ्रँचायझी भागीदार आहे ज्याने रशियामधील त्यांचे स्टोअर बंद करण्यास नकार दिला आहे.

दुसरीकडे स्टारबक्स-एक कंपनी जी अशाच मॉडेलवर चालते ती सहजपणे दुकान बंद करू शकते कारण तिचा कुवेत-आधारित अलशाया ग्रुपचा एक भागीदार होता ज्याने सहकार्य करण्यास तयारी दाखवली. मॅकडोनाल्ड्ला बाहेर पडणे शक्य झाले कारण ८४% स्टोअर्स त्यांच्या मालकीची आहेत आणि कोणावरही अवलंबून न राहता ते सहज ऑपरेशन थांबवू शकतात.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.