अंबानी घराण्याचा धाकटा वारस अनिल अंबानी हा त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री टीना मुनिम हिच्या प्रेमात पडला. ‘उचे लोग उची पसंद’ अंबानी कुटुंबाने यांच्या प्रेमाला स्पष्ट नकार दिला. गावात काळ कुत्रं विचारत नाही तरी इज्जतीला लोक घाबरेतेत हे तर अंबानी आहे म्हणल्यावर यांना तर इज्जतीचा भलताच पुळका असणार. सिने अभिनेत्री अंबानी घराण्याची सून कशी शोभणार म्हणून अनिल आणि टीना मुनीम यांनी वेगळं होण्याचा विचार केला. पण नियतीला लगेच सगळं मान्य होत नाही. यांच्या प्रेम कथेत अजून महत्वाचा ट्विस्ट येणं बाकी होतं.
टीना आणि अनिल यांची पहिली ओळख एक लग्नात झाली होती. अनिलच्या एका भाच्याने टीना आणि अनिल यांची ओळख करून दिली. लग्नात टीना एकमेव सुंदर मुलगी अनिल यांच्या नजरेला वाटली. पहिल्या भेटीत अनिलने टिनाला डेटिंगसाठी विचारलं. टीनाला अनिल मध्ये अजिबात रस नव्हता तिने नकार दिला. यानंतर अनिल अंबानी थांबला नाही. त्याने पुन्हा भेटीसाठी प्रयत्न चालूच ठेवला. प्रयत्नाला यश आलं. या दोघांच्या गाठी भेटी वाढल्या. अनिल आणि टीना एकमेकांना पसंद करायला लागले. शेवटी गोष्ट घरापर्यंत गेली. घरच्यांना मुलगा वाया गेला असं वाटलं. ज्या घरात मुलगा ऐकत नाही तो वायाच गेलेला असतो या भारतीय परंपरेला जागत अंबानी कुटुंबांनी दोघांना जबरदस्ती वेगळं व्हायला सांगितलं. अनिल आणि टीना जवळपास दोघांनीही मान्य केलं होतं कि आता काही होऊ शकत नाही. दोघांनी एकमेकांना भेटणं टाळलं. बोलणंही कमी झालं. इथे लव्ह स्टोरी संपली असं समजू नका अजून भूकंप झाला नाही .
अमेरिकेत लॉस एंजिल्स मध्ये १९८९ ला भूकंप आला. यावेळेस टीना मुनिम अमेरिकेतच होती. अनिल अंबानी मधला आशिक जागा झाला. अनिल अंबानीला टीनाची काळजी वाटू लागली. काही करून अनिलने टीनाचा संपर्क क्रमांक शोधला. अंबानींच्या लेकराला टीनाचा नंबर शोधणे काही अवघड नाही पण त्याच्या प्रेमापुढे टीना भाळली. दोघांचं बोलणं परत सुरु झालं. एकदा एकमेकांपासून दूर होऊन पुन्हा एकत्र आले म्हणल्यावर प्रेम वाढतं असं कोणीतरी म्हणून गेलंय. अनिलने निर्धार करून घरच्यांना पटवलं. शेवट अनिलच्या हट्टापुढे अंबानी कुटुंब नमले. आणि अंबानी कुटुंबाला टीना अंबानी सून मिळाली.
टीनाने ३५ हून अधिक बॉलिवूड चित्रपट केले आहेत पण लग्नानंतर तिने बॉलिवूड आणि ग्लॅमरस आयुष्य सोडले. पती अनिलच्या व्यवसायाचा ती भाग बनली. Reliance समूहातील अनेक सामाजिक संस्थांचा ती महत्वाचा भाग आहे. टीनाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की तिचा पती अनिलने आजपर्यंत तिला कोणत्याही गोष्टीसाठी नकार दिला नाही आणि तिच्या आयुष्यात असे काहीही नाही जे तिला मिळवायचे होते आणि ते मिळवू शकले नाही. टीना मुनीम आणि अनिल अंबानी यांची कहाणी एखाद्या चित्रपटाला कमी नाही. टीना-अनिल यांना जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी अशी दोन मुले आहेत.
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?