९० च्या दशकातील बोल्ड आणि सुंदर म्हणून नावाजलेली अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. उर्मिलाचा ४ फेब्रुवारीला वाढदिवस असतो त्यानिमित्ताने तिच्या फिल्मी आयुष्यावर एक नजर टाकू. कमी काळात उर्मिलाला बॉलीवूडमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली. त्यावेळेस उर्मिलाच्या सौंदर्याचे दिवाने सामान्य प्रेक्षक तर होतेच पण अनेक दिग्दर्शक आणि अभिनेते देखील उर्मिलासाठी वेडे होते. हेच कारण झालं आणि उर्मिलाला नंतर चित्रपट मिळाले नाही.
१९८० ला उर्मिला मातोंडकरने ‘कलयुग’ चित्रपटातून करियरला सुरुवात केली. १९७७ च्या कर्म चित्रपटातून चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात तिने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. उर्मिलाला शेखर कपूर यांच्या ‘मासूम’ चित्रपटापासून तुफान प्रसिद्धी मिळाली. दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या १९९५ ला आलेल्या रंगीला चित्रपटापासून उर्मिलाला ‘रंगीला गर्ल’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या चित्रपटातून तिला जबरदस्त यश मिळाले. रंगीला चित्रपटानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मासोबत उर्मिलाचे नाव सतत चर्चेला येऊ लागलं. दोघांच्या नात्याची इंडस्ट्रीत कुजबुज चालू झाली. यानंतर उर्मिला राम गोपाल वर्माच्या प्रत्येक चित्रपटात दिसायला लागली. या चित्रपटानंतर ती राम गोपाल वर्माच्या ‘सत्या’, ‘भूत’ आणि ‘कौन’ सारख्या चित्रपटात दिसली. पुन्हा निमित्त झालं आणि त्यांच्या अफेअरच्या बातम्या इंडस्ट्रीत वेगाने पसरू लागल्या. उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांचे संबंध होते का का नव्हते हे अधिकृत त्यांनी कधी जाहीर केलं नाही. पण त्यावेळेच्या अनेक लोकांना खात्री होती कि राम गोपाल वर्मा यांना उर्मिला आवडत होती. या गोष्टीची पुष्टी तेव्हा झाली जेव्हा बातमी आली कि राम गोपाल वर्माने माधुरी दीक्षितला त्याच्या एका चित्रपटातून काढून टाकले आणि तिच्या जागी उर्मिलाला घेतले आहे. या प्रकरणामुळे मीडिया आणि चित्रपट रसिकांनी अनेक अंदाज लावले. पण या घटनेमुळे एक मोठं नुकसान झालं ते उर्मिलाचं !
राम गोपाल वर्मा नेहमी चर्चेत असणारे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांचे नाव जोडल्यामुळे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक उर्मिला पासून लांब राहिले. उर्मिला राम गोपाल वर्माच्या गटातील दिसत असल्याने ज्या लोंकांचे आणि राम गोपाल वर्माचे जमत नव्हते त्यांनी उर्मिलाला सुद्धा टाळायला सुरुवात केली होती. सलग राम गोपाल वर्माच्या चित्रपटात काम केल्यामुळे इतर दिग्दर्शक उर्मिला पासून लांबच राहिले. राम गोपाल वर्माच्या स्वभावाचा उर्मिलाला तोटा होऊ लागला होता. किमान राम गोपाल वर्माच्या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. पण जेव्हा तिला लक्षात आलं कि राम गोपाल वर्मा केवळ प्रेमापोटी तिला चित्रपटात घेत आहे यानंतर उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्यात वाद झाला. आधीच इतर दिग्दर्शकांचे चित्रपट मिळत नव्हते त्यात स्वतः राम गोपाल वर्माने सुद्धा उर्मिलाला चित्रपटात घेणे बंद केले. उर्मिलाचे काम एकदम थांबले नाही पण यामुळे तिचे चित्रपट कमी येऊ लागले. काही मराठी चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका केली होती. पण रंगीला सारखं तिला यश मिळालं नाही. उर्मिलाच्या फिल्मी आयुष्यात जे काही झालं असेल पण अभिनेत्री म्हणून उर्मिलाने प्रत्येक भूमिका चांगली वठवली आहे. या मराठमोळी अभिनेत्रीस दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा !
हे खास आपल्यासाठी
कोका कोलाच्या आधी पुण्यात कोल्ड ड्रिंकची सुरुवात झाली होती
पाकिस्तानचे विषय लय वेगळे असतेत त्यांनी जनतेला चहा कमी प्या असं सांगितलंय
युद्धात राणी लक्ष्मीबाईंच्या पाठीवर जे बाळ बांधले होते त्याचे पुढे काय झाले ?