सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

दिवसभर काम करून आर्मी भरतीसाठी प्रदीप रात्री १० किलोमीटर धावतो

प्रदीप मेहरा या 19 वर्षीय मुलाची सध्या सोशल मीडियार जोरदार चर्चा आहे. दिग्दर्शक विनोद कापरींनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हीडिओनंतर प्रदीपच्या मेहनतीचं कौतुक होत आहे. भारतीय आर्मीत भरती होण्यासाठी प्रदीप दिवसभराचं काम संपल्यावर रोज रात्री 10 किलोमीटर धावतो. प्रदीपचा धावतानाचा व्हीडिओ विनोद कापरींनी बनवला आणि त्यात त्यांनी प्रदीपला काही प्रश्नही विचारले.

https://twitter.com/vinodkapri/status/1505535421589377025?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1505535421589377025%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.bbc.com%2Fmarathi%2Findia-60820451

प्रदीप दिल्लीच्या नोएडा मधील मॅकडॉनल्ड मध्ये काम करतो. नाईट शिफ्ट पूर्ण झाल्यानंतर प्रदीप घरी परतताना धावत निघाला असताना विनोद कापरींनी त्याला पाहिलं आणि त्याचं व्हीडिओ शूट करत धावण्याचं कारण विचारलं. यावेळी विनोद कापरींनी प्रदीपला गाडीनं घरी सोडण्याची ऑफरही दिली. मात्र, प्रदीपनं ती नाकारली आणि धावतच घरी जाणार असल्याचं सांगितलं.
‘ हे खरं सोनं आहे. नोएडाच्या रस्त्यावर काल रात्री 12 वाजता खांद्यावर बँग अडकवून धावणारा हा मुलगा दिसला. मला वाटलं, अडचणीत असेल, लिफ्ट दिली पाहिजे. वारंवर लिफ्ट देण्याची ऑफर दिली, मात्र त्यानं नकार दिला. त्याच्या नकाराचं कारण ऐकलंत तर तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल’ – या कॅप्शन सोबत विनोद कापरींनी प्रदीप मेहराचा व्हीडिओ ट्वीट केला.

विनोद कापरीच ट्विट खूप कमी वेळात प्रचंड वायरल झालं. २४ तासात व्हिडिओला सहा लाख व्हुस मिळाले आहेत. देशभरातून प्रदीपच्या मेहनतीला दाद मिळत आहे. सोशल मीडिया वर अनेक जण त्याला मदत करायची पण ऑफर देत आहेत. अभिनेता ‘आर माधवन’ आणि काजोल अग्रवालं यांनी देखील प्रदीपचं कौतुक केलं आहे.

दिग्दर्शक विनोद कापरीने प्रदीपला बघितले , त्याची विचारपूस केली, त्याचा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर टाकला म्हणून प्रदीपची मेहनत जनतेला कळली पण आपल्या देशात लाखो प्रदीप अशीच मेहनत करत आहेत. त्यांची खूप माफक अपेक्षा आहे कि दर वर्षी परीक्षा व्हावी पण सरकार ती पण करत नाही. सरकारने दर वर्षी आर्मी भरती करून त्यात पारदर्शकता आणली तर अनेक प्रदीपची मेहनत मार्गी लागेल नाही तर आज प्रदीप आहे उद्या दुसरा कोणी तरी एकलव्य असाच स्वप्नांचा पाठलाग करताना कोण्या विनोद कापरीला दिसेल आणि देश त्याचं कौतुक करेल. प्रदीपचं कौतुक जरूर करा पण त्याची मेहनत कशी कमी करता येईल यासाठी सरकारला प्रश्न पण विचारत चला.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.