सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

दोन मिनिटांचा व्हिडिओ प्रेम, माया आणि आयुष्य समजावून सांगतो.

सध्या वॅलेंटाईनचा आठवडा चालूय, ह्या आठवड्यात काय असत सांगायला नको. पण एकंदरीत काय तर प्रेम करायला शिकवणारा हा आठवडा. तर असो, वॅलेंटाईनच्या विषयाला जास्त हात घालत नाही. आम्ही जेंव्हा ट्विटर स्क्रोल करत होतो तेंव्हा एक व्हिडिओ पुढे आला. दोन मिनिटांचा व्हिडिओ. बघून आनंददायी धक्काच बसला. जगात असंही होत ? प्राणी माणसांवर प्रेम करतात असं ऐकलं होत. पण जे प्राणी दुसऱ्या प्राण्यांना मारून जगतात ते पण माणसानांवर प्रेम करतात हे बघून जरा मन हळवं झालं. इथं माणसं एकमेकांवर प्रेम करायला तयार नसताना प्राणी माणसांवर प्रेम करतायत म्हंटल्यावर त्यावर लिहलं पाहिजे कि नाही ? त्यात परत वॅलेंटाईनचा वीक त्यामुळे प्रेम करणार्यांना अर्प्रिसिएट करणं बनतच..वाचा आणि बघा चित्यांचं प्रेम.

भारतीय फॉरेस्ट ऑफिसर ‘प्रवीण कासवान’ यांनी व्हिडिओ शेयर केलाय….

तसं पाहायला गेलं तर व्हिडिओ पाहायला आम्हाला उशीरच झाला कारण ‘प्रवीण कासवान’ यांनी हा व्हिडिओ मागच्या वर्षी म्हणजे २०२० च्या जून महिन्यात शेयर केलाय.

व्हिडिओ मध्ये कसलाही आवाज नाही कि कोणी काही बोलत नाही. थंडी असल्याचं जाणवत , एक माणूस मस्त पैकी कंबल घेऊन झोपलेला आहे. दोन तीन चित्ते पण त्याच्या बाजूला आहेत. आपण पण आपल्या उदाहरणावरून सांगू शकतो थंडी पडल्यावर आपण कंबल मध्ये येऊ देतो का ? नाहीच येऊ देत बाकीचा लाड त्याच्या त्याच्या जागेवर पण थंडीत नो मजाक. तसेच त्यो माणूस पण गार झोपलेला आहे. थंडी जास्त झाल्यामुळे एक चित्ता उठतो आणि माणसाच्या जवळ जायला निघतो. तेवढ्यात ह्या गड्याला पण जाग येते आणि तो त्या चित्याला आपल्या जवळ घेतो. आपल्या आईने किंवा वडिलांनी आपल्याला जवळ घेऊन झोपी घालावे असं हे दृश्य आहे. ते दोघे झोपले कि बाकीचे चित्ते पण थंडी मुळे उठतात आणि यांच बघून त्यांच्या मध्ये जायचा प्रयत्न करतात. गडी उठतो आणि सगळयांना आपल्या अंथरुणात सामावून घेतो. आई जशी आपल्या पिल्याना कुशीत घेते अगदी तसंच चित्याना आपल्या अंथरुणात घेतलं आहे ह्या व्क्तीने. किती ते प्रेमळ दृश्य आहे.

खाली व्हिडिओ देतोय तुम्ही बघा मग तुम्हाला समजेल चित्या सारखा खतरनाक प्राणी पण किती प्रेमळ असतो ते. तुम्ही प्रेम करायला शिका मग प्राणी पण तुमच्यावर प्रेम करतात. नाही तरी कोण्यातरी मोठ्या माणसाने म्हणून ठेवलंय, “जो माणूस प्राण्यावर प्रेम करतो तो चांगला माणूस असतो पण ज्या माणसावर प्राणी प्रेम करतात त्यो ग्रेट माणूस असतो. “

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.