सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

२० वर्ष आधीच लाला लजपतराय यांनी फाळणीची शक्यता बोलून दाखवली होती.

स्वातंत्र्याच्या लढाईतले अग्रदूत ‘पंजाब केसरी’ लाला लजपत राय यांची २८ जानेवारीला १७५ वी जयंती आहे. लाला लजपत राय हे दूरदृटी असणारे नेते होते. भारताच्या फाळणीची शक्यता त्यांनी खूप आधीच वर्तवली होती.

भारत-पाकिस्तानच्या फाळणीला ७० वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात फाळणीवर आजही भाषणे, चर्चासत्रे होत असतात. अनेक जण महात्मा गांधीना फाळणीसाठी जबाबदार धरतात. तर काही लोक मोहंमद अली जिना यांच्या हटवादी भूमिकेमुळे भारताची फाळणी झाली असे म्हणतात ज्याला इतिहासाची जोड देखील आहे.

पण आपण लक्ष्यात घ्यायला पाहिजे कि फाळणी सारखी घटना होण्यासाठी तशी पार्श्वभूमी तयार असावी लागते. त्यामुळे फाळणी जरी १९४७ ला झाली असेल पण त्यासाठी पार्श्वभूमी खूप आधीच तयार झाली होती. इतिहासात त्याचे दाखले मिळतात.

मोहंमद अली जीनांचा आग्रह असल्यामुळेच फाळणी करावी लागली..

सुरुवातीला काँग्रेस मध्ये काम केल्यावर ‘कायदे आजम मोहमद अली जिनानी’ त्यांची वेगळी चूल मांडली. काँग्रेस हिंदू धर्माची संघटना झाली असल्याचा आरोप केला. देश स्वतंत्र झाला तरी मुस्लिम हिंदू धर्मीय नेत्यांचे गुलामच राहतील असा ते प्रचार करत. मुस्लिम लोकांना त्यांचे हक्क अबाधित ठेवायचे असतील. तर हिंदूंचा एक आणि मुसलमानांचा एक असे दोन वेगळे देश हवेत अशी त्यांनी ‘द्विराष्ट्राची’ थेअरी मांडली. त्यामुळे भारत स्वतंत्र होत असताना महात्मा गांधी यांनी मोहंमद अली जिना याना भारताचे पंतप्रधान पद द्यायला तयारी दाखवली होती. पंतप्रधान पद मिळत असताना देखील त्यांनी ती संधी नाकारलीं. मोहंमद अली जिना यांच्या हटवादी भूमिकेमुळेच भारताची फाळणी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. १९४७ च्या जून मध्ये ‘सिरील रॅडक्लीफ’ यांच्या अध्यक्षतेखाली फाळणीची समिती स्थापन झाली होती.

१९२५ मधेच लाला लाजपतराय यांनी हिंदू मुस्लीम एकत्र राहणे अवघड असल्याचे बोलले होते.

मोहंमद अली जिना पाकिस्तानच्या मागणीसाठी देशभर वातावरण तयार करत होते. भारतातल्या मुस्लीमांनी त्यांच्या पाकिस्तानच्या कल्पनेला पाठिंबा द्यावा म्हणून ते देशभर सभा करत. १९४० ला पाकिस्तानच्या ‘लाहोर’ शहरात सभेत भाषण करताना जिना यांनी लाला लजपतराय यांचे पत्र वाचून दाखवले. १९२५ सालचे ते पत्र होते. त्या साली काँग्रेसचे अध्यक्ष असलेले ‘चित्तरंजन दास’ याना ते पत्र लिहले होते. त्या पत्रात लाला लाजपत राय लिहतात,” मुस्लिम धर्माचा अभ्यास करून मला असे जाणवते आहे. भारतात मुस्लिम आणि हिंदू धर्मीय एकत्र राहणे अवघड आहे. दोन्ही धर्मामध्ये काही गट असे आहेत कि जे सौदर्य बिघडेल असे वागतात. कधी हिंदू धर्माचे काही लोक लोक दंगे भडकवण्याचा प्रयत्न करतात तर कधी मुस्लिम धर्मीय लोक असे करतात. ह्या अश्या वातावरणात हिंदू मुस्लिम एकता टिकवणं अवघड आहे. त्यामुळे अध्यक्ष या नात्याने तुम्ही यावर विचार केला पाहिजे. नाही तर आपल्याला भविष्यात फाळणीला सामोरे जाण्याची परिस्थिती येऊ शकते.”

लाला लजपत राय यांनी फक्त शक्यता वर्तवली होती. पण त्यांची शक्यता पुढच्या काळात खरी ठरली. स्वातंत्र्यानंतर भारताची फाळणी झाली. मोहंमद अली जिना यांच्या विचाराला मानणाऱ्या लोकांनी पाकिस्तान नावाचा देश बनवला.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.