सप्टेंबर 19, 2024

MarathiMirror

Marathi Mirror | मराठी बातम्या, कथा, घटना, पुस्तके, भ्रमंती, लेख असं बराच काही मराठी भाषेमध्ये आपल्या समोर आणणे हेच धेय्य. | Marathi News, Marathi stories, Books, Cinema, Travelling, Amazing Places Reviews and articles in Marathi Language.

बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बुद्ध स्विकारण्या मागची ही तीन कारणे आहेत

आज डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे. सर्वाना मराठी मिरर कडून जय भीम ! जयंतीच्या निम्मिताने सर्व जण आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबासाहेब म्हणजे विशाल समुद्र आहेत. समुद्राला संपूर्ण समजून घेणं शक्य नाही. किमान एक-दोन लेखामध्ये तर नाहीच नाही. त्यामुळे आंबेडकरांची आपल्याला एक एक घटना समजून घ्यावी लागेल. डॉक्टरांच्या आयुष्यात सर्वात महत्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे त्यांचं बौद्ध धर्म स्वीकारणं. अनेक अभ्यासकांनी बाबासाहेबानी बौद्ध धर्म का स्वीकारला याचे कारणे दिली आहेत. त्या सर्व कारणापैकी सर्वात महत्वाचे तीन कारणे आहेत. ते एक एक करून बघू

१ ) राजकीय प्रतिक्रिया म्हणून

आंबेडकरी अभ्यासक सांगतात कि बाबासाहेबानी हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय घेतला तो राजकीय प्रतिक्रिया म्हणून. तर झालं असं भारतातल्या दलित लोकांना वेगेळे मतदार संघ मिळायला हवे अशी बाबासाहेबांची मागणी होती. लंडन मध्ये झालेल्या इंग्रजांसोबतच्या चर्चांमध्ये बाबासाहेबांनी अशी मागणी केली होती. वेगेळे मतदार संघ असल्याशिवाय दलिताना प्रतिनिधित्व मिळणार नाही असं आंबेडकरांचं मत होतं. इंग्लिश सरकार आंबेडकरांच्या मागणीवर खुश होते. दलिताचं वेगळं प्रतिनिधित्व त्यांना मान्य होत. इंग्रजांनी दलितांसाठी वेगेळे मतदार संघ देण्याची तयारी दाखवली होती नव्हे तसा निर्णय झाला होता.
दलितांना वेगळे मतदार संघ दिले तर ते हिंदू धर्मापासून वेगळे होतील आणि दोन समाजामध्ये दरी वाढेल अशी महात्मा गांधींची भूमिका होती. त्यामुळे पुण्याच्या येरवडा जेल मध्ये महात्मा गांधी दलितांच्या वेगळ्या मतदार संघाच्या निर्णयाविरोधात उपोषण करायला लागले. महात्मा गांधींचं उपोषण खूप दिवस चालले. उपोषणामुळे आंबेडकरांवर दबाव आला आणि त्यांची मागणी मागे घ्यावी लागली.
१९३२ मध्ये पुण्याच्या येरवडा जेल मध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचे प्रतिनिधी म्हणून मदन मोहन मालवीय यांच्यात पुणे येथे करार झाला. पुणे करार झाला तेंव्हापासून बाबासाहेब निराश झाले होते. हिंदू धर्मात राहून आपल्याला लढता येणं कठीण काम आहे त्यांच्या लक्षात आलं. दलितांना त्यांच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर नवीन मार्ग निवडावा लागेल याची जाणीव आंबेडकरांना झाली होती. त्यामुळेच पुढे १९३६ मध्ये त्यांनी “मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नसल्याचं जाहीर केलं”. बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या घोषणेकडे अभ्यासक एक राजकीय प्रतिक्रिया म्हणून बघतात. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्यामागे हे एक कारण आहे.

२ ) हिंदू धर्माचे चटके त्यांनी स्वतः अनुभवले होते

हिंदू धर्मतल्या जाती व्यवस्थेचे चटके बाबासाहेब आंबेडकरांनी लहान वयातच अनुभवले होते. प्राथमिक शाळेत असताना पासूनच त्यांना जातीच्या भेदभावामुळे अन्याय सहन करावा लागला. पुढच्या काळात बाबासाहेब उच्चशिक्षित होऊन देखील त्यांच्या वाट्याचा अन्याय कमी झाला नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्मबद्दल फार आस्था नव्हती. जी खूप साहजिक होती. एकदा मुंबईच्या सभेत आंबेडकर म्हणाले होते ,”हिंदू धर्म कधीही दलितांना न्याय देऊ शकणार नाही पण जर आपण हा धर्म सोडला तर एक झटक्यात आपल्याला न्याय मिळेल.”
हिंदू धर्मात राहून बाबासाहेबांनी संघर्ष केला पण त्यांना त्यात यश येईल असं वाटतं नव्हतं म्हणून त्यांनी नवा मार्ग निवडला. दक्षिणेतले गौरी विश्वनाथ सारखे दलित योद्धे १२ व्या शतकात होऊन गेले. दलितांच्या साठी संघर्ष करताना त्यांनी नवे मार्ग अवलंबले. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आदर्श मानून त्यांचा मार्ग निवडला. कलिंगा जिंकून बौद्ध स्वीकारणारा अशोक देखील बाबासाहेबांचा आदर्श होता. त्याने देखील बौद्ध धर्म स्वीकारला असल्यामुळे आंबेडकरांनी बौद्ध धर्माची निवड केली. हिंदू धर्मात झालेला अन्याय देखील बाबासाहेबानी हिंदू धर्म सोडण्यामागचं एक कारण होत.

३ ) बुद्ध दलितांना सामावून घेईल

मी हिंदू धर्म सोडणार असल्याची घोषणा करण्याच्या आधीपासूनच बाबासाहेब इतर धर्मांचा अभ्यास करत होते. सर्व धर्मांचा अभ्यास केल्यावर डॉक्टरांच्या लक्षात आलं कि बौद्ध धर्म सोडला तर इतर धर्मांमध्ये जास्त फरक नाही. इतर धर्मांपेक्षा बौद्ध धर्म विज्ञानाची संगत करतो. अंधश्रद्धा कमी मानतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बौद्ध धर्मात जातीच्या उतरंडी नाहीत म्हणजे भविष्यात लोक वाटले जाणार नाहीत याचा असा विश्वास बाबासाहेबांना वाटला.
या सर्व गोष्टींचा विचार करून डॉक्टरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. फक्त बौद्ध धर्मच जागाच कल्याण करू शकतो असं बाबासाहेबांचं मत होत. दलितांना सामावून घेण्याची क्षमता बौद्ध धर्मामध्ये असल्याचं बाबासाहेबांनी विवेचन केलं होत. आंबेडकरी अभ्यासक धर्मांतराचे वेग वेगळे विवेचन करतात पण धर्मांतराच्या मागे हे तीन मुख्य विचार असल्याचं सगळ्यांनी मान्य केलं आहे.

कॉपी नाही होणार...!!डायरेक्ट शेअर करायचं.